ETV Bharat / state

खाते वाटपासाठी महाआघाडीत खलबते, तिन्ही पक्ष नेत्यांची बैठक

मंत्रीमंडळातील खातेवाटपासाठी सध्या महाविकास आघाडीच्या नेत्यांची मुंबईतील सह्याद्री अथितीगृहात बैठक सुरू आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
author img

By

Published : Jan 1, 2020, 2:01 PM IST

मुंबई - महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यास जवळ-जवळ दीड महिन्यांचा अवधी, मंत्री मंडळ विस्ताराला महिनाभर, आता खाते वाटपासाठी आघाडीत खलबते सुरू असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आघाडीच्या नेत्यांची बैठक होत आहे. सह्याद्री अतिथीगृहात ही बैठक होत असून बैठकीचा पहिला टप्पा पार पडला आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात अंतिम शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री अनिल परब आणि आदित्य ठाकरे उपस्थित होते. तर काँग्रेसकडून मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि नितीन राऊत उपस्थित होते. आता बैठकीचा दुसरा टप्पा मंत्रालयात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ठाकरे मंत्री मंडळात राष्ट्रवादीचा वरचष्मा असून आता काँग्रेसनेही महत्त्वाच्या खात्यांवर भर दिला असल्याने खाते वाटपाचा तिढा अजूनही कायम असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. राष्ट्रवादीकडे गृह, जलसंपदा आणि अर्थ यासारखी महत्त्वाची खाती देण्यात येणार असल्याची माहिती आहे. तर काँग्रेसनेही आता ग्रामविकास किंवा कृषी खात्यावर जोर दिला आहे. मात्र, शिवसेना कृषी खाते सोडण्यास तयार नाही. दरम्यान, हा तिढा सोडवण्यासाठी महत्त्वाची बैठक होणार असल्याचे सूतोवाच काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते.

हेही वाचा - 'कचऱ्यावरील खर्च करणार तीन पट कमी'

Intro:खातेवाटतपासाठी आघाडीत खलबत, मुख्यमंत्र्यां सोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक...

मुंबई 1

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यास जवळ जवळ दीड महिन्यांचा अवधी , मंत्री मंडळ विस्ताराला महिनाभर आता खातेवाटपासाठी आघाडीत खलबत सुरू असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत आघाडीच्या नेत्यांची बैठक होत आहे. सह्याद्री अतिथीगृहात ही बैठक होत असून बैठकीचा पहिला टप्पा पार पडला आहे.त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात अंतिम शिक्का मोर्तब होणार असल्याची माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री अनिल परब आणि आदित्य ठाकरे उपस्तिथ होते. तर काँग्रेसकडून मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि नितीन राऊत उपस्तिथ होते. आता बैठकीचा दुसरा टप्पा मंत्रालयात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ठाकरे मंत्री मंडळात राष्ट्रवादीचा वरचष्मा असून आता काँग्रेस ने ही महत्वाच्या खात्यांवर भर दिला असल्याने खातेवतापचा तिढा गडद खला असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. राष्ट्रवादी कडे गृह, जलसंपदा आणि अर्थ या सारखी महत्वाची खातो देण्यात येणार असल्याची माहिती आहे.तर काँग्रेसने ही आता ग्रामविकास किंवा कृषी खात्यावर जोर दिला आहे. मात्र शिवसेना कृषी खाते सोडण्यास तयार नाही. दरम्यान हा तिढा सोडवण्यासाठी महत्वाची बैठक होणार असल्याचे सूतोवाच काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते. Body:....Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.