मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर अद्याप एकही महाविकास आघाडी मधील नेत्यांची बैठक झालेली नाही. मात्र जवळपास चार महिन्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांची उद्या बैठक (meeting Mahavikas Aghadi will be held tomorrow) होणार आहे. विधानसभा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचा शासकीय निवासस्थान देवगिरी बंगल्यावर (Devagiri Bungalow Mumbai) उद्या मंगळवारी, सायंकाळी ही बैठकपार पडणार आहे. many leaders will be present
अनेक नेत्यांची उपस्थिती : या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे उपस्थित राहणार आहेत. तर काँग्रेस कडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, आणि ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण हे उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. यासोबतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अनिल देसाई, अनिल परब, अरविंद सावंत, सुभाष देसाई आणि आदित्य ठाकरे हे उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होणार होती. मात्र काही कारणास्त ही बैठक रद्द करण्यात आली होती.
निवडणुकांवर होणार चर्चा : राज्यामध्ये होऊ घातलेल्या महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे. या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी म्हणून लढण्याबाबत देखील या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे. राज्यामध्ये सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडणार असून; या बैठकीतून राज्य सरकार विरोधात तीनही पक्षांनी एकत्रित पणे मुद्दे समोर आणत, विरोधीकांना कोंडीत पकडण्याबाबत चर्चा होईल.
भारत जोडो यात्रेत वर चर्चा : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातून सात नोव्हेंबरला सुरू होणार आहे. या यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनी सामील व्हावं, यासाठी काँग्रेसकडून दोन्ही पक्षांना यात्रेमध्ये सामील होण्याच्या आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे सात तारखेपासून महाराष्ट्रात सुरू होणाऱ्या भारत जोडो यात्रेमध्ये महाविकास आघाडीचे कोणते नेते सामील होतील, याबाबत देखील या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.