ETV Bharat / state

Measles Cases : राज्यात गोवरच्या रुग्णांची वाढ सुरूच; १४,४४० संशयित रुग्ण

author img

By

Published : Dec 9, 2022, 7:54 PM IST

गोवरच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली (Measles Cases Hike) आहे. राज्यात आतापर्यंत १४ हजार ४४० गोवरचे संशयित रुग्ण (Measles Cases in Maharashtra) आढळून आले आहेत. त्यापैकी ९४० रुग्णांना निश्चित गोवर झाल्याचे निदान झाले आहे.

Measles
गोवर

मुंबई - राज्यात गेल्या ३ वर्षापेक्षा यंदा गोवरच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. राज्यात आतापर्यंत १४ हजार ४४० गोवरचे संशयित रुग्ण (Measles Cases in Maharashtra) आढळून आले आहेत. त्यापैकी ९४० रुग्णांना निश्चित गोवर झाल्याचे निदान झाले आहे. तर १७ बालकांचा गोवरमुळे मृत्यू झाला (Measles Cases) आहे. राज्यात मुंबई, मालेगाव, भिवंडी, ठाणे, पिंपरी चिंचवड हे जिल्हे गोवरचे हॉटस्पॉट ठरले आहेत. राज्यात गोवरमुळे मुंबईत सर्वाधिक मृत्यू नोंदवण्यात आले आहेत.

१४,४४० संशयित रुग्ण, १७ मृत्यू -राज्यात २०१९ मध्ये १३३७, २०२० मध्ये २१५०, २०२१ मध्ये ३६६८ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. तर यावर्षी ८ डिसेंबरपर्यंत १४ हजार ४४० संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. ९४० निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत तर १७ मृत्यू झाले आहेत. त्यापैकी मुंबईत ११, भिवंडीत ३, ठाण्यात २ तर वसई विरार येथे १ मृत्यू झाला आहे. एकूण १७ मृत्यूंपैकी ० ते ११ महिन्याच्या ४, १२ ते २४ महिन्याच्या १०, २५ महिने ते ६० महिने म्हणजे ५ वर्षाच्या २ तसेच ५ वर्षावरील १ बालकाचा मृत्यू झाला आहे. १८ मृत्यूंपैकी ८ मुली तर ९ मुलगे आहेत.

जिल्हानिहाय गोवरचा प्रसार - मुंबईत ४७९३ संशयित रुग्ण असून ४४२ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत तर ११ जणांचा मृत्यू झाला आहे. मालेगाव मनपा येथे ९२२ संशयित रुग्ण असून ७१ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत. भिवंडी मनपा येथे ९७८ संशयित रुग्ण असून ५३ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत तर ३ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे मनपा येथे ७५६ संशयित रुग्ण असून ५० निश्चित निदान झाले आहेत तर २ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे जिल्हा येथे १५६ संशयित रुग्ण असून २७ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत. वसई - विरार मनपा येथे २६८ संशयित रुग्ण असून २४ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत तर १ जणांचा मृत्यू झाला आहे. पनवेल मनपा येथे १९५ संशयित रुग्ण असून ७ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत. नवी मुंबई मनपा येथे २७५ संशयित रुग्ण असून १२ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत. औरंगाबाद येथे १६५ संशयित रुग्ण असून १५ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत. पिंपरी चिंचवड येथे ३४४ संशयित रुग्ण असून ८ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत. बुलढाणा येथे ७२ संशयित रुग्ण असून ५ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत. मीरा भाईंदर येथे १८२, संशयित रुग्ण असून ४ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत. रायगड येथे १३८ संशयित रुग्ण असून १४ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत. जळगाव पालिका येथे १६९, संशयित रुग्ण असून ४ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत. धुळे पालिका येथे ६९ संशयित रुग्ण असून ९ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत. धुळे येथे ९२ संशयित रुग्ण असून ७ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत. उल्हासनगर येथे ७७ संशयित रुग्ण असून २ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत.

१६ लाख ९७ हजार घरांचे सर्व्हेक्षण -राज्यात गोवर प्रभावित विभागात १२२८ सर्व्हेक्षण पथके नियुक्त करण्यात आली आहेत. १६ लाख ९७ हजार ६०२ घरे सर्वेक्षण करण्यात आली आहेत. ४६ हजार ३६७ बालकांना व्हिटामिन ए चा डोस देण्यात आला आहे. गोवर रुबेलाचा १९,८४५ बालकांना पहिला तर १०,८७९ बालकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. राज्यात नोव्हेंबर अखेरपर्यंत एकूण १३ लाख ५३ हजार ८२० लसींचा साठा आहे.

सरकारच्या सूचना - देशभरात बिहार, गुजरात, हरियाणा, झारखंड, केरळ आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये गोवरचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने परिस्थितीनुसार लसीकरणाचा निर्णय घ्यावा तसेच ६ महिन्यावरील बालकांना अतिरिक्त लसीचा डोस द्यावा अशा सूचना केल्या आहेत. तर ९ महिने ते ५ वर्षापर्यंतच्या बालकांना गोवरची लस द्यावी असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.