ETV Bharat / state

MD drugs Seized : आग्रीपाडा परिसरातील नायर रुग्णालयासमोरून एमडी ड्रग्ज जप्त - 267 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त कारवाई

मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथक वरळी युनिटने मोठी कारवाई करत आग्रीपाडा येथून एकास अटक केली आहे. त्याच्याकडून 267 ग्रॅम एमडी ड्रग जप्त करण्यात ( MD drugs Seized from agripada ) आले आहे.

MD drugs Seized
एमडी ड्रग्ज जप्त
author img

By

Published : Nov 25, 2022, 9:04 PM IST

मुंबई : शहरात ड्रग्ज विक्री करणारे, पुरवठा करणारे, साठा करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्याबाबत वरिष्ठांनी सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार अंमली पदार्थ विरोधी कक्ष वरळी युनिटने मुंबईचे पथक अमली पदार्थ विक्री करणारे पुरवठा करणारे व्यक्तींचा शोध घेत होते. 24 नोव्हेंबर रोजी गस्त घालत असताना मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून आग्रीपाडा परिसरातील नायर रुग्णालयासमोरून एका संशयास्पद हालचाल करणाऱ्या व्यक्तीस ताब्यात घेतले असता त्याच्याकडून 267 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त ( MD drugs Seized from agripada ) करण्यात आले.

एमडी ड्रग्स जप्त - त्यानंतर एनडीपीएस कायद्यातील तरतुदीनुसार दोन पंचांसमक्ष या व्यक्तीची चौकशी केली असता त्याच्याजवळ एमडी हा ड्रग्स आढळून आला. आंतरराष्ट्रीय बाजारभावाप्रमाणे त्याची किंमत अंदाजे रुपये 53 लाख 40 हजार इतकी आहे. आरोपी विरोधात अंमली पदार्थ विरोधी कक्ष येथे एनडीपीएस ऍक्ट 1985 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र सावंत हे करत आहेत.

आरोपीला पोलीस कोठडी - अटक आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला 30 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अटक करण्यात आलेल्या 46 वर्षीय हा आरोपी खडक डोंगरी येथे राहणारा आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.