मुंबई - मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याबरोबर कोरोना वॉर रूमच्या तक्रारीदेखील वाढताना दिसत आहेत. प्रत्येक वॉर्डमध्ये काय परिस्थिती आहे, हे जाणून घेण्यासाठी महापौर किशोरी पेडणेकर यांनी एस प्रभागात वॉररूमची पाहणी केली. वॉररूम संदर्भात अनेक तक्रारी येत असल्याने वॉररूमला भेट देऊन त्यांनी आढावा घेतला.
महानगरपालिका सर्व परिस्थिती हाताळण्यास समर्थ -
एस वॉर्डच्या वॉररूममध्ये काम चांगले सुरू आहे. 15 कर्मचारी तीन पाळीमध्ये येथे काम करतात. या ठिकाणी चांगल्यारीतीने रुग्णाचे फोन हाताळले जातात. तसेच नागरिकांनी आवडत्या रुग्णालयाची वाट न पाहता आम्ही सुचवलेल्या विलगीकरण केंद्रामध्ये जावे. थोडा फार त्रास होतो. मात्र, तो समजून घ्या. मात्र, औषध आणि जेवण व्यवस्था आणि एकदम योग्य असेल, असा विश्वास ही किशोरी पेडणेकर यांनी यावेळी व्यक्त केला. महानगरपालिका सर्व परिस्थिती हाताळायला तयार असल्याचेही त्या म्हणल्या.