ETV Bharat / state

Matheran mini train : पावसाळ्याच्या विश्रांतीनंतर 100 वर्षांहून जुनी 'माथेरानची राणी' पुन्हा धावणार, जाणून घ्या वेळापत्रक

Matheran mini train : मध्य रेल्वेच्या प्रशासनानं प्रवाशांना खुशखबर दिली आहे. नेरळ ते माथेरान या प्रवासासाठी उद्यापासून म्हणजेच ४ नोव्हेंबरपासून 100 वर्षांहून अधिक जुनी माथेरान मिनी ट्रेन सेवा सुरू होणार आहे.

Matheran mini train
माथेरानची राणी पुन्हा धावणार
author img

By PTI

Published : Nov 3, 2023, 10:52 AM IST

Updated : Nov 3, 2023, 1:01 PM IST

माथेरानची राणी

मुंबई : दिवाळीचा सण आला की सुट्ट्या येतात. अशा सुट्टीत अनेकांना पर्यटकांची दिवाळी गोड करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. माथेरान मिनी ट्रेन सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेन सेवा ४ नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू होत आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने वेळापत्रक जाहीर केलं.

सध्या अमन लॉज ते माथेरान अशी ही सेवा सुरू आहे. पावसाळ्यात नेरळ ते अमन लॉज ही सेवा बंद होती. मात्र आता ही सेवा पुन्हा सुरू करण्यात येत आहे. मुंबईपासून दोन तासांच्या अंतरावर माथेरान हे थंड हवेचं ठिकाण आहे. दिवाळीच्या सुटीत येथे अनेक पर्यटक येतात. हे जवळचे ठिकाण आहे जे मुंबईकरांना भेट देण्यासाठी अतिशय योग्य आहे.

नेरळ-माथेरान रेल्वे मार्ग 1907 मध्ये सुरू झाला : नेरळ-माथेरान मिनी ट्रेन 100 वर्षांहून अधिक जुनी रेल्वेसेवा आहे. नेरळ-माथेरान रेल्वे मार्ग 1907 मध्ये सुरू झाला. जो पीरभॉय कुटुंबाचा कौटुंबिक उपक्रम म्हणून बांधला गेला होता. आदमजी पीरभॉय वारंवार माथेरानला जायचे, तिथे पोहोचणं सोपं व्हावे म्हणून त्यांना रेल्वे बांधायची होती. माथेरान हिल रेल्वेसाठी हुसेनची योजना 1900 मध्ये तयार झाली. त्यानंतर 1904 मध्ये बांधकाम सुरू झालं. ही लाइन 1907 पर्यंत वाहतुकीसाठी खुली झाली. पर्यटकांना माथेरानला घेऊन जाणार्‍या वाहतुकीचं एकमेव साधन म्हणजे मिनी ट्रेन आहे. येथे मोटार वाहनांना परवानगी नाही.

अशी आहे 'या' ट्रेनची रचना : या चार ट्रेनमध्ये अत्याधुनिक सुविधा असतील. या ट्रेनमध्ये एकूण सहा डबे असतील. यात तीन द्वितीय श्रेणी, एक विस्टाडोम कोच आणि दोन द्वितीय श्रेणी कम लगेज व्हॅन असतील. त्यामुळे पर्यटकांना नेरळ ते माथेरान जाण्यासाठी ही मिनीट्रेन अतिशय सोयीची आहे. त्यामुळे ती बंद राहिल्यास पर्यटकांना माथेरानला जाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. मात्र ही सेवा पुन्हा सुरू झाल्यापासून पर्यटकांमध्येही उत्साह दिसून येत आहे.

असे आहे मिनी ट्रेनचे वेळापत्रक :

  • 52103 नेरळ येथून 8.50 वाजता सुटेल आणि 11.30 वाजता माथेरानला पोहोचेल.
  • 52105 ही दुसरी ट्रेन असेल. नेरळ येथून 10.25 वाजता सुटेल आणि 01.05 वाजता माथेरानला पोहोचेल. या दोन्ही गाड्यांची सेवा दररोज असेल.
  • ट्रेन 52104 माथेरानहून 02.45 मिनिटांनी सुटेल आणि 5.30 मिनिटांनी नेरळला पोहोचेल.
  • दुसरी ट्रेन 52106 माथेरानहून 04.00 वाजता सुटेल आणि 06.40 वाजता नेरळला पोहोचेल. या गाड्यांची सेवाही दररोज असेल.
  • रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, जून ते ऑगस्ट दरम्यान या मिनी ट्रेनमधून 1 लाख 13 हजार 887 प्रवाशांनी प्रवास केला आहे.

हेही वाचा :

  1. Ahmedabad Howrah Express : नांदुरा रेल्वे स्थानकावर हावडा-अहमदाबाद एक्सप्रेसवर दगडफेक; पाहा व्हिडिओ
  2. Garib Rath Express News : नागपूरहून निघालेली गरिब रथ एक्स्प्रेस पुण्याला पोहोचलीच नाही; प्रवाशाच्या पत्नीचा दाव
  3. Railway Services Disrupted : नर्मदा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ, रुळावर पाणी आल्यानं रेल्वे सेवा विस्कळीत

Last Updated : Nov 3, 2023, 1:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.