मुंबई - राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळेत इयत्ता पहिलीपासून दहावीपर्यंत मराठी विषय शिकवणे सक्तीचे करण्यात येणार आहे. येत्या अधिवेशनात या बाबतचा कायदा करणार असल्याची महिती मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी दिली.
राज्यात इंग्रजी माध्यमांच्या शाळांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या राज्यात 25 हजारांपेक्षा जास्त इंग्रजी माध्यमांच्या शाळा आहेत. या ठिकाणी मराठी भाषा शिकवली जात नाही किंवा ऐच्छिक ठेवली जाते. अशा सर्व शाळांमध्ये मराठी विषय शिकवणे सक्तीचे केले जाणार आहे. गेल्या सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेले पुस्तकांचे गाव, रंगवैखरी(आंतरमहाविद्यालयीन नाट्याविष्कार स्पर्धा) इत्यादी उपक्रम यापुढेही सुरू राहतील. या अभिनव उपक्रमांची व्याप्ती वाढवण्यासाठी शासन प्रयत्न करेल, असे सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा - शासकीय कर्मचाऱ्यांना आता पाच दिवसांचा आठवडा, २९ फेब्रुवारीपासून अंमलबजावणी
बॉम्बे हायकोर्टचे नामांतर मुंबई उच्च न्यायालय करण्यासाठी केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. रंगभवन येथे मराठी भाषा भवन सुरू केले जाणार असल्याची माहिती देसाई यांनी दिली.