ETV Bharat / state

Balveer Mantra Kurhe : रात्रीचा अथांग समुद्र पोहण्याचा भन्नाट विक्रम मराठी मुलीच्या नावे;पाहा खास रिपोर्ट - Record of Mantra Name in India Book Records

होमिओपॅथी डॉक्टर असलेल्या डॉक्टर तृप्ती मंगेश कुर्हे यांची कन्या तिचं नाव मंत्रा. मंत्राने मुंबईच्या समुद्रात पोहण्याचा (Marathi girl Mantra Kurhe amazing record) विक्रम केला आहे. आणि हा विक्रम एका मुलीने करणे हे तर मोठे साहसी पाऊल आहे. अथक परिश्रमाने हे पाऊल मंत्राने उचलले आणि जिद्दीने रात्रीच्या वेळी (swimming in deep sea at night) समुद्र पोहून पार केला, आणि अखेर गेट वे ऑफ इंडिया गाठलं. हा भारताच्या पातळीवर अनोखा विक्रम ठरला. Balveer Mantra Kurhe

Balveer Mantra Kurhe
मंत्रा कुर्हे
author img

By

Published : Nov 9, 2022, 7:19 PM IST

Updated : Nov 9, 2022, 9:09 PM IST

मुंबई : होमिओपॅथी डॉक्टर असलेल्या डॉक्टर तृप्ती मंगेश कुर्हे यांची कन्या तिचं नाव मंत्रा. मंत्राने कमी वयात अथक आणि मोठे दिव्य पार केलेले आहेत. आणि ते म्हणजे मुंबईच्या समुद्रात पोहण्याचा (Marathi girl Mantra Kurhe amazing record) विक्रम केला आहे. आणि हा विक्रम एका मुलीने करणे हे तर मोठे साहसी पाऊल आहे. अथक परिश्रमाने हे पाऊल मंत्राने उचलले आणि जिद्दीने रात्रीच्या वेळी (swimming in deep sea at night) समुद्र पोहून पार केला, आणि अखेर गेट वे ऑफ इंडिया गाठलं. हा भारताच्या पातळीवर अनोखा विक्रम ठरला. Balveer Mantra Kurhe

प्रतिक्रिया देतांना मंत्रा कुर्हे व कुटूंबिय

एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्येही नोंद - 12 वर्षे आणि 9 महिने वयाच्या मंत्रा मंत्राने 20 मार्च 2022 रोजी 12 वर्षांच्या वयात 7 तास 50 मिनिटे 40 सेकंदाच्या रेकॉर्ड ब्रेकिंग वेळेसह धरमतर ते गेट वे ऑफ इंडिया अंतर 38 किमी अंतर यशस्वीरित्या पोहून केले. खडबडीत समुद्र आणि रात्रीचा अंधार असूनही तिने न घाबरता हे लांब अंतर पोहले. रात्रीचा अंधार असूनही तिने न घाबरता ही सफर पार केली आणि आगळावेगळा विक्रम केला. इंडिया बुक रेकॉर्डसह एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्येही मंत्राच्या नावाची नोंद (Record of Mantra Name in India Book Records) झालेली आहे.

Balveer Mantra Kurhe
बालवीर मंत्रा कुर्हे

काय आहे तिचे स्वप्न - कोपरखैरणे या ठिकाणी असलेला फादर एगल्स स्विमिंग पूल क्लब हा इथल्या विद्यार्थ्यांना अत्यंत प्रेरणादायी आहे. याच ठिकाणी मंत्रा हिने पोहण्यासाठी या स्विमिंग पूल क्लबचे आभार मानते. ती म्हणते,' मला लहानपणापासूनच पोहण्याची आवड होती. आणि जसं जसं माझी आवड माझ्या आईच्या लक्षात आली तर आईने मला पाठीवर थाप दिली. मग मी या फादर एंगल्स स्विमिंग क्लबला यायला लागली. इथे सराव केला. दिवसाचे पाच सहा तास सुद्धा मी सराव करायचे. त्यानंतर खुल्या समुद्रात देखील मी सराव केला. आणि धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया हा प्रवास मी यशस्वी पणे पार केला. या समुद्रात जल फिश असतात त्याची भीती वाटली नाही का? या ई टिव्हीच्या प्रश्नाला उत्तर देताना तिने न डगमगता नाही असे सांगितले. थोडी सवय होती. जल फिश त्रास देतात; असं माहिती होतं. त्याची तयारी मी केलेली होती आणि जल फिशचा त्रास होऊ नये, यासाठी कसोशीने प्रयत्न केला होता आणि वेळेत गेटवे पर्यंत पोहोचली. त्यामुळे खूपच आनंद वाटला. आता इंग्लिश समुद्रात पोहण्याचे स्वप्न आहे, असे हिमतीने तिने ईटीव्ही सोबत संवाद साधताना सांगितले.'

समुद्र पोहण्याचा भन्नाट विक्रम
समुद्र पोहण्याचा भन्नाट विक्रम

मंत्राच्या आईची प्रतिक्रिया - मुलीने समुद्राची ही सफर करणे ती देखील दुर्मीळ बाब आहे. ही अवघड पोहण्याची धमक कशी काय मुलीने केली? ह्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्राची आई डॉ दीप्ती कुर्हे म्हणतात,'आम्ही मूळ जुन्नरचे पुणे जिल्ह्यातील. तिकडे गावी गेलो होतो. छोट्या तलाव जवळ बसलो आणि त्यात तिचा जरा तोल गेला. तेव्हा आजूबाजूला नातेवाईक सगळे होते. पटकन सर्वांनी हिला बाहेर काढले. एक मोठा मुलगा होता त्यांने तिचे निरीक्षण केले आणि म्हणाला, 'ही तर काही घाबरलेली वाटत नाही.' त्याचं निरीक्षण खरं निघालं. आम्ही साडे चार वर्षाची असताना मंत्रा हिला पोहण्याच्या सरावासाठी सुरुवात केली. तिचे गुरू गणेश कामत, अमित आवळे यांनी मेहनत घेतली. आपल्याकडे मुलं अनेकदा खाडी किंवा समुद्रात पोहत असतात, मात्र त्याचे रेकॉर्ड ठेवत नसत. इकडे ओपन वॉटर स्वामींग करिता चांगली सोय आहे. हिने देखील अत्यंत अवघड सराव केले. धरमतर ते गेट वे हा त्रिकोणी मार्ग आहे. अत्यंत खडतर आहे. पाण्याचा वाऱ्याचा वेग हा आव्हानात्मक असतो. मात्र हिने तो पार केला. धरमतर ते गेट वे ऑफ इंडिया प्रवासात एकदा तर पोहोताना हिच्या अंगावरून साप गेला. मात्र तिला त्याचे भान नव्हते. एकच लक्ष होतं की गेट वे गाठायचंच. अखेर 12 वर्षांच्या वयात पोरीने 7 तास 50 मिनिटे 40 सेकंदाच्या रेकॉर्ड ब्रेकिंग वेळेसह धरमतर ते गेट वे ऑफ इंडिया 38 किमी अंतर पार केलं.'

वडील व प्रशिक्षकांची प्रतिक्रिया - तिचे वडील मंगेश कुर्हे म्हणाले, 'मंत्रा ही जलप्रेमी बालक आहे आणि ती तिची छआवड बनली आहे. तिला एनडीएच्या माध्यमातून नौदल अधिकारी बनायचे आहे. 'तर तिचे शिक्षक गोकुळ कामत आणि अमित आवळे म्हणाले, 'तिने जो सराव केला आहे. त्यामुळेच ती ह्या विक्रमा पर्यन्त पोहोचू शकली.'

28 जुन 2022 ला रेकोर्ड केला तो दिवस मंत्रासाठी आणि तिच्या पाठीशी असणारी तिचे आई व तिचे वडील मंगेश कुर्हे यांच्यासाठी पण अत्यंत रोमहर्षक होता. त्रिकोणी समुद्र पोहणे हे जवळजवळ अशक्य, त्यातही मुलगी. त्यामुळे मनामध्ये एक काळजी होती. मात्र हिम्मत पालकांनी दाखवली आणि त्या हिमतीच पुढे चीज झालं. महाराष्ट्राची मान उंचावली. अथक परिश्रम अथांग समुद्रासारखे. हाच मंत्र मंत्राने दिला. आपण सगळ्यांनीच आपल्या आवडत्या विषयात हा मंत्र जपावा. Balveer Mantra Kurhe

Last Updated : Nov 9, 2022, 9:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.