ETV Bharat / state

Actress Alka Kubal : ट्रॅजेडी क्वीन अलका कुबल आणि कॉमेडी क्वीन निर्मिती सावंत ‘आलंय माझ्या राशीला' मधून एकत्र! - आलंय माझ्या राशीला मराठी चित्रपट

ट्रॅजेडी क्वीन अलका कुबल आणि कॉमेडी क्वीन निर्मिती सावंत ‘आलंय माझ्या राशीला' या मराठी चित्रपटाद्वारे एकत्र बघायला मिळणार आहेत. अलका कुबलच्या इमोशन्स व निर्मिती सावंत यांच्या कॅामेडीचा 'आलंय माझ्या राशीला' मध्ये सुरेख संगम बघायला मिळणार आहे. 'आलंय माझ्या राशीला' हा चित्रपट १० फेब्रुवारीला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Marathi Actress Alka Kubal
अलका कुबल
author img

By

Published : Feb 5, 2023, 7:35 PM IST

मुंबई : प्रेक्षकांना चित्रपटांमध्ये नेहमीच नवनवीन जोड्या बघायला आवडतात. हिरो-हिरॉईन च्या अनोख्या जोड्यांप्रमाणेच कसदार कलाकारांच्या जोड्याही त्यांना भावतात. आता मराठी प्रेक्षकांसाठी एक पर्वणी आहे ‘आलंय माझ्या राशीला’ चित्रपटामध्ये. ट्रॅजेडी क्वीन अलका कुबल आणि कॉमेडी क्वीन निर्मिती सावंत ‘आलंय माझ्या राशीला' मधून एकत्र आलेल्या त्यांना बघायला मिळणार आहे. त्या प्रथमच एकत्र येत असून अनोखी अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

आलंय माझ्या राशीला चित्रपट : राशी आणि भविष्य जाणून घेणे हे मानवी स्वभावाचे नेहमीच आकर्षण राहिले आहे. यामुळेच वर्तमानपत्रात, मासिकात किंवा कॅलेंडरमध्ये मागच्या पानावर असो, प्रत्येकालाच आपल्या राशीत काय लिहिले हे जाणण्याचा मोह असतो. राशींच्या याच अनोख्या विश्वात गाजलेले नाव म्हणजे आनंद पिंपळकर. प्रसिद्ध वास्तुतज्ज्ञ असलेले ज्योतिर्विद आनंद पिंपळकर यांची निर्मिती असलेला 'आलंय माझ्या राशीला' हा मराठीतील मल्टिस्टारर चित्रपट खऱ्या अर्थानं वेगळेपण जपणारा असून, उत्सुकता वाढवणारा आहे. 'आलंय माझ्या राशीला' हा चित्रपट १० फेब्रुवारीला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

मनोरंजन विश्वातील महाराण्या एकत्र : आलंय माझ्या राशीला चित्रपटातून ते बारा राशींच्या अनोख्या गोष्टी घेऊन आले आहेत. आनंदीवास्तू आणि साईकमल प्रोडक्शन निर्मित आणि फिल्मास्त्र स्टुडिओ प्रस्तुत 'आलंय माझ्या राशीला' या चित्रपटाचे निर्माते आनंद पिंपळकर आणि अश्विनी पिंपळकर आहेत. दिलीप जाधव सहनिर्माते असून, दिग्दर्शन अजित शिरोळे यांनी केले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अलका कुबल आणि निर्मिती सावंत या मनोरंजन विश्वातील महाराण्या एकत्र आल्या आहेत.

पडद्यामागचे बॉडिंग घट्ट : निर्मिती सावंत आणि अलका कुबल यांचं मनोरंजन विश्वात मोठे नाव आहे. दोघींनीही अभिनयापासून निर्मितीक्षेत्रापर्यंत विविध विभागांमध्ये स्वत:ला सिद्ध केले आहे. या दोघींचे पडद्यापलीकडे एक अनोखे नाते आहे. अलका नेहमी निर्मिती यांना ‘वहिनी’ म्हणून संबोधतात. त्यामागील रहस्य त्यांनी 'आलंय माझ्या राशीला' या चित्रपटाच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने उलगडले. आपल्या निर्मिती वहिनीबाबत अलका म्हणाल्या की, “निर्मिती वहिनींसोबत पहिल्यांदाच सिनेमात काम करत आहे. यापूर्वी मी त्यांच्यासोबत कधी काम केलं नाही, पण त्यांच्या प्रोडक्शनच्या 'आपलं माणूस' या नाटकात काम केलं आहे. 'आलंय माझ्या राशीला' या चित्रपटाच्या निमित्तानं निर्मिती वहिनींसोबत काम करण्याचा योग जुळून आला. आमचं पडद्यापलीकडचं बाँडींग खूप छान आहे. मी महेश सावंत यांना ‘महेशभैय्या’ म्हणायचे, त्यामुळे ती ‘माझी वहिनी’ आहे. ती सर्वांची ‘निर्मितीताई’ असली तरी मी तिला ‘वहिनीच’ म्हणते, असे आमचे खरेच वेगळे नाते आहे.”

यामुळे चित्रपटात एंट्री : त्या पुढे म्हणाल्या, “या चित्रपटात एंट्री करण्याबाबत सांगायचं तर, आनंद पिंपळकर हे वास्तुतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत. आपल्या राशी काय सांगतात ते अत्यंत नेमकेपणाने सांगत असल्यानं ते काय सांगतात याबद्दल उत्सुकता असते. आपल्या राशीत काय आहे हे वाचायला सर्वांनाच आवडतं. या चित्रपटासाठी दिलीप जाधवांनी कॅाल करून सांगितलं की 'आलंय माझ्या राशीला'मध्ये एका राशीचं कॅरेक्टर तुला करायचं आहे. कॅरेक्टर ऐकल्यावर खूप आवडलं. मी जरी मेलोड्रामा खूप केला असला तरी असे काही वेगळे येते तेव्हा वेगळा हुरूप येतो. ही कथा आताच्या काळातील आहे. माझी कथा पाहताना प्रेक्षकांच्या डोळ्यांत टचकन पाणी येईल. यात सर्व राशींचे सर्व गुण आहेतच, पण हा एक परिपूर्ण मनोरंजक चित्रपट आहे. अजित शिरोळेंसोबत प्रथमच काम करत आहे.”

चित्रपटात यांचा असणार समावेश : ज्योतिष आणि भविष्याबद्दल सांगणाऱ्या 'आलंय माझ्या राशीला' या चित्रपटाचं लेखन हेमंत एदलाबादकर यांनी केले आहे. यात चिन्मय मांडलेकर, मोहन जोशी, अतुल परचुरे, प्रसाद ओक, मंगेश देसाई, उषा नाईक, भार्गवी चिरमुले, अश्विनी कुलकर्णी, पौर्णिमा अहिरे, दिगंबर नाईक, संग्राम चौगुले, स्वप्निल राजशेखर‌, प्रणव पिंपळकर, सिद्धार्थ खिरीड आदी मराठीतील आघाडीची स्टारकास्ट आहे. ओंकार माने, प्रणव पिंपळकर या चित्रपटाचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहेत. गीतरचना गुरु ठाकूर, अभय इनामदार, कौतुक शिरोडकर यांनी लिहिल्या असून, पार्श्वसंगीत मिलिंद मोरे यांनी दिले आहे. छायांकन कृष्णा सोरेन यांचे तर संकलन विजय खोचीकर यांचे आहे. नृत्यदिग्दर्शन सुजितकुमार, नरेंद्र पंडित, प्रितम पाटील यांनी केलं आहे. अकबर शरीफ यांनी साहसदृश्ये, वासू पाटील यांनी कलादिग्दर्शन, तर श्रेयस केदारी, रितेश पवार यांनी व्हीएफएक्सची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे.
हेही वाचा : Sid kiara wedding : सिड कियाराच्या शाही विवाहात 'नो फोन पॉलिसी'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.