ETV Bharat / state

Maratha Vs OBC : मराठा-ओबीसी भांडण लावण्याचा शकुनी मामांचा डाव - वडेट्टीवार - Conflict in Maratha OBC

Maratha Vs OBC : मराठा ओबीसीत संघर्ष निर्माण करण्याचं काम शकुनी मामा करत आहेत. दोन समाजात आग लावणाऱ्या शकुनी मामाचा सरकारनं बंदोबस्त करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

Maratha Vs OBC
Maratha Vs OBC
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 8, 2023, 10:27 PM IST

मुंबई Maratha Vs OBC : मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. मात्र, इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यायला हवं, असं मत विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलंय. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. सरकार मराठा, ओबीसी आरक्षणाबाबत आपली भूमिका का जाहीर करत नाही, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलाय. तसंच काही शकुनी मामा मराठा-ओबीसी समाजात तेढ निर्माण करून आग लावण्याचं काम करीत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यांनी केलाय.

आरक्षणाबाबत सरकारची दुटप्पी भूमिका : विजय वडेट्टीवार यांनी आज विधानभवनात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलंय. वडेट्टीवार यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं की, सरकारमधील मंत्र्यांच्या भूमिका वेगवेगळ्या आहेत. त्यामुळं सरकारची दुटप्पी भूमिका आता जनतेसमोर आली आहे. त्याचबरोबर आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याची सरकारमध्ये हिंमत असेल, तर जातनिहाय जनगणना करावी, असं म्हणत त्यांनी शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल केलाय.

श्वेतपत्रिका प्रसिद्ध करा : महाराष्ट्रातील कुणबी जातीच्या नोंदी शोधण्याचं काम शिंदे समिती करत आहे. हे काम सुरू असताना इतर मागासवर्गीयांसह सर्व जातींचे रेकॉर्ड मागवून त्याची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्याची मागणी देखील वडेट्टीवार यांनी केलीय. तसंच तशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समितीला द्याव्यात, अशी भूमिका वडेट्टीवार यांनी जाहीर केलीय.

काही ओबीसी आरक्षणापासून वंचित : 1967 पूर्वी पुराव्याच्या नोंदी शोधताना ओबीसी समाजाला खूप मानसिक, आर्थिक त्रास सहन करावा लागला. त्यामुळं अनेक लोक इतर आरक्षणापासून वंचित राहिले. त्यामुळं शिंदे समितीनं कुणबी जातीच्या नोंदी शोधताना संबंधित कागदपत्रांमध्ये नमूद केलेल्या इतर मागासवर्गीयांमध्ये समाविष्ट असलेल्या जातींचीही नोंद घ्यावी. समितीनं शोधलेल्या इतर मागासवर्गीय नोंदींची संयुक्त श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.

हेही वाचा -

  1. Manoj Jarange On OBC : ओबीसी नेत्यांमुळे चाळीस वर्षे आमच्यावर अन्याय, तर मराठा नेत्यांमुळे नुकसान; मनोज जरांगेंचा हल्लाबोल
  2. Cabinet Meeting Today : मराठा आणि ओबीसी आरक्षण वाद सुटेना; आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणत्या मुद्द्यावर होणार चर्चा, वाचा सविस्तर
  3. chhagan bhujbal on Maratha reservation: 2 दिवसांत कुणबी नोंदीचा आकडा कसा वाढला-छगन भुजबळ यांचा मराठा आरक्षणावरून सवाल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.