ETV Bharat / state

Devendra Fadnavis in Delhi : राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न, देवेंद्र फडणवीस अमित शाह यांची दिल्लीत घेणार भेट - देवेंद्र फडणवीस अमित शाह दिल्ली भेट

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने राज्यात कायदा सुव्यवस्था पूर्णपणे निष्फळ ठरली आहे. या परिस्थितीत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्ली येथे त्यांच्या निवास्थानी भेट घेणार आहेत.

Devendra Fadnavis in Delhi
Devendra Fadnavis in Delhi
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 2, 2023, 2:04 PM IST

मुंबई - मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अतिशय चिघळली आहे. मुख्यमंत्री, गृहमंत्री तसेच स्वतः मनोज जरांगे पाटील यांनीही जनतेला शांततेचं आवाहन करून सुद्धा परिस्थिती हाताबाहेर जात आहे. राज्यात अनेक ठिकाणी जाळपोळ, तोडफोड रस्ता रोको अशा घटना सातत्याने वाढत आहेत.

मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी मराठा नेत्यांसोबत बैठक, सर्वपक्षीय बैठक, मंत्रिमंडळ उपसमितीची विशेष बैठक यासारखे प्रयत्न करून झाले. परंतु त्यातूनही मनोज जरांगे पाटील सरसकट मराठा आरक्षणावर ठाम आहेत. आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानं सरकार हतबल झाले आहे. अशा परिस्थितीत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत आज दुपारी साडेतीन वाजता केंद्रीय गृहमंत्री, अमित शाह यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत.

फडणवीस बुधवारपासून दिल्लीत देवेंद्र फडणवीस हे दिल्लीतील भाजपा मुख्यालयात झालेल्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीसाठी दाखल झाले आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली व पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वात भाजपा निवडणूक समितीची बुधवारी बैठक पार पडली. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस हे दिल्लीतच आहेत. राज्यात सुरू असलेले मराठा आंदोलन आता अधिक हिंसक झाल्याने सरकारची डोकेदुखी वाढली आहे. अशात हे आंदोलन शांत करण्यासाठी सरकारचे सर्व प्रयत्न अपयशी ठरत आहेत. त्यातच या आंदोलनात काही अदृश्य शक्ती काम करत असल्याचेही समोर आले आहे. त्याचाही छडा लावण्याचे काम सुरू आहे. आमदार, मंत्री, नेते यांनाही टार्गेट केले जात आहे. हे आंदोलन पूर्णतः हाताबाहेर जात चालल्यानं केंद्रीय गृहमंत्रालयानं यात जातीनं लक्ष घालावं, या मागणीसाठी देवेंद्र फडणवीस हे अमित शाह यांच्याकडे मागणी करणार आहेत.

फडणवीसांची कसोटी- मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील बिघडत असलेली कायदा सुव्यवस्था बघता देवेंद्र फडणवीस यांनीही आक्रमक पवित्रा घेतला आहे. आतापर्यंत १६८ लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर अनेक जणांवर ३०७ अंतर्गत गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. हे आंदोलन भडकवण्यामागं इतर पक्षातील काही नेते, कार्यकर्त्यांचाही समावेश असल्याचा दावा गृहमंत्री फडणवीस यांनी केला. राज्यातील कायदा सुव्यस्था बिघडवण्याचा जो कोणी प्रयत्न करेल, त्याला सोडले जाणार नाही, फडणवीस यांनी इशारा दिला. जोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील, तोपर्यंत पोलिसांना योग्य ती कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे आंदोलन भडकवण्यामागे नक्की कोण आहे? याचा तपास घेतला जात असताना नेत्यांची घरं, गाड्या, कार्यालयात जाळपोळ तोडफोड करण्याचं काम कोण करत आहे? कारण मंत्री, हसन मुश्रीफ यांच्या मंत्रालयाबाहेर उभ्या असलेल्या गाडीची तोडफोड करण्यामागे कोण होते? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

केंद्राकडून उचलली जाणार पावले- एकीकडं आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेतला असला तरी मराठा आंदोलकांवरील दाखल गुन्हे मागे घेण्यासाठीही मागणी होत आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण दिले जात नाही, तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचं जरांगे पाटील यांनी जाहीर केले. दिवसेंदिवस मराठा आंदोलन अधिक तीव्र होत असल्यानं कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत राज्यातील एकंदरीत परिस्थिती व मराठा आरक्षणासाठी सरकारकडून होत असलेले प्रयत्न याची माहिती फडणवीस हे अमित शाह यांना देणार आहेत. तसेच मराठा समाजाला सरसकट आरक्षण दिल्यास इतर समाजाकडून होणारा उठाव याबाबतही अमित शाह यांना अवगत केले जाणार आहे. भेटीनंतर मराठा आरक्षणासंदर्भात केंद्राकडून कशा पद्धतीची पावलं उचलली जातात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

हेही वाचा-

  1. Maratha Reservation Live Updates: मनोज जरांगे पाटील यांचे नवव्या दिवशी उपोषण सुरूच, राज्य सरकारचे शिष्टमंडळ घेणार भेट
  2. Maratha Reservation : आज तोडगा निघणार? राज्य सरकारचे शिष्टमंडळ आज घेणार मनोज जरांगेंची भेट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.