ETV Bharat / state

All Party Leaders Meeting : आंदोलकांच्या संतापानंतर मुंबईत सर्वपक्षीय मराठा आमदारांची गोपनीय ठिकाणी बैठक, काय घेणार निर्णय - All Party Maratha MLAs meeting

All Party Leaders Meeting : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असताना, राजकीय घडामोडीनांही चांगलाच वेग आलाय. यापार्श्वभूमीवर आज मराठा आरक्षणासाठी मुंबईत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक सकाळी 11 वाजता होणार आहे.

All Party Leaders Meeting
All Party Leaders Meeting
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 31, 2023, 10:40 AM IST

Updated : Oct 31, 2023, 1:13 PM IST

मुंबई All Party Leaders Meeting : राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनाला राज्यात अनेक ठिकाणी हिंसक वळण लागलंय. मराठा आरक्षणाचा लढा अधिक तीव्र होत असताना, मराठा आमदार, खासदारांनी राजीनामा दिल्यानंतर, आज मराठा आरक्षणासाठी मुंबईत सर्वपक्षीय मराठा आमदारांची बैठक सकाळी 11 वाजता होणार आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर मंगळवारी मराठा आंदोलकांकडून हल्ला करण्यात आला. तसंच भाजपा आमदार प्रशांत बंब यांचंही कार्यालय फोडण्यात आलं. दरम्यान आजही अनेक ठिकाणी आंदोलनं तसंच बंद पुकारण्यात आला. या पार्श्वभूमीवर बीड आणि धाराशिव जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आलीय. तर छत्रपती संभाजीनगर शहरातील स्मार्ट सिटी बस सेवा आज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

  • Maharashtra CM Eknath Shinde had a telephonic conversation with Manoj Jarange Patil (Maratha reservation activist). During the conversation, CM Shinde inquired about the health of Jarange Patil and there was a positive discussion between the two regarding providing reservation to…

    — ANI (@ANI) October 31, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

बैठकीत काय होणार? : मराठा आरक्षणासाठी राज्यातील काही आमदार, खासदारांनी वेगळी भूमिका घेत आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. मराठा आरक्षणासाठी मुंबईत सर्वपक्षीय मराठा आमदारांची बैठक होत आहे. ही बैठक सकाळी अकरा वाजता होणार आहे. या बैठकीचं ठिकाण अद्याप समोर आलेलं नाही. दरम्यान, या बैठकीत सरकारवर अधिक दबाव कसा टाकता येईल आणि सरकार आरक्षणासाठी लवकरात लवकर कसा निर्णय घेईल, यावर चर्चा आणि खलबत होणार असल्याचं कळतंय.

मराठा आरक्षणाच्या धर्तीवर राजकीय घडामोडींना वेग : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असताना, राजकीय घडामोडीनांही चांगलाच वेग आलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल रमेश बैस यांची राज्यभवनावर सोमवारी भेट घेतली. तर दुसरीकडं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भाजप नेत्यांची बैठक पार पडली. मराठा आरक्षणासाठी आमदार-खासदारांनी राजीनामे देण्यास सुरुवात केलीय. तसंच मराठा आरक्षणाचा लढा अधिक तीव्र होत असताना सरकारच्या विरोधात संताप वाढतोय. यामुळं सरकारच्या विरोधात वाढती नाराजी हे सरकारला परवडणारं नाही. त्याआधी सरकार काहीतरी पाऊलं उचलणार असल्याचं बोललं जातंय.

आरक्षणाबाबत मोठ्या घोषणेची शक्यता : आरक्षणावर शिंदे समितीचा अहवाल प्राप्त झाला असून तो आज कॅबिनेटमध्ये मांडला जाणार आहे. या अहवालानंतर आणि कॅबिनेट बैठकीतील चर्चेनंतर मुख्यमंत्री आज आरक्षणाबाबत मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. पण त्याआधी सर्वपक्षीय मराठा आमदारांची बैठकीतून हे नेते नेमकी कोणती भूमिका घेतात? कोणती घोषणा करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा :

  1. Maratha Reservation Protest : बीडनंतर आता धाराशिव जिल्ह्यातही संचारबंदी लागू, कर्नाटकची बस उमरग्यात पेटविली!
  2. Maratha Reservation Protest : बीडमध्ये संचारबंदीसह इंटरनेट सेवा बंदचा दुसरा दिवस, जिल्ह्यात तणावाची स्थिती
  3. Maratha Reservation Protest : राज्यात हालचालींना वेग! शिंदे-फडणवीसांची रात्री उशिरा वर्षा निवासस्थानी बैठक

Last Updated : Oct 31, 2023, 1:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.