ETV Bharat / state

Maratha Protest : मराठा आरक्षणाचं लोन मंत्रालय आणि विधानभवनापर्यंत; दगाफटका होण्याची शक्यता - सुप्रिया सुळे - मराठा आंदोलन

Maratha Protest : मराठा आरक्षणाचा मुद्दा (Maratha reservation issue) तापला आहे. त्यातच मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी (CM Eknath Shinde) सर्व पक्षीय आमदारांची बैठक बोलावली आहे. तर दुसरीकडे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवावं यासाठी आमदारांनी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला टाळं ठोकलंय. यासह शरद पवार गटाच्या नेत्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून निदर्शनं केली. अर्थातच मराठा आरक्षणाचं लोन आता मंत्रालय आणि विधान भवनात पोहोचलयं.

Maratha Protest
मराठा आंदोलन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 1, 2023, 4:02 PM IST

मराठा आंदोलनावर बोलताना सुप्रिया सुळे

मुंबई Maratha Protest : मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी राज्यात आंदोलनं, निदर्शनं केली जात आहेत. काही ठिकाणी आंदोलनाला गालबोट देखील लागलं आहे. पक्षाच्या नेत्यांना, आमदारांना आणि खासदारांना अनेक ठिकाणी गावबंदी करण्यात आली आहे. (meeting of all party MLAs) नकळतच आमदारांवरती मराठा समाजाचं आरक्षणावरून दबाव वाढल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतयं. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याच्या मागणीसाठी 22 आमदारांनी आज मंत्रालयाच्या मुख्य द्वाराला टाळं ठोकलं. (demonstrations on steps of Vidhan Bhavan) तब्बल तीन तास मंत्रालयाच्या मुख्य द्वाराला कुलूप असल्याने मंत्रालय प्रशासनाची भंबेरी उडाली. मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, 'एक मराठा लाख मराठा' अशा प्रकारच्या घोषणा आमदारांकडून देण्यात आल्या. विशेष अधिवेशन संदर्भात मुख्यमंत्री स्वतःहून ते जाहीर करत नाही तोपर्यंत आपण पायऱ्यांवरून उठणार नाही अशा प्रकारचा पवित्रा आमदारांनी घेतला होता. सरकारच्या वतीने मंत्री संजय बनसोडे आणि मंत्री अनिल पाटील यांनी आमदारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; मात्र ते निष्फळ ठरले. त्यानंतर पोलिसांनी धरणे आंदोलन करणाऱ्या आमदारांना ताब्यात घेतलं.

विधानभवनातही आमदारांकडून निदर्शनं: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार आणि ठाकरे गटाचे आमदार यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नी विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी केलीय. शरद पवार गटाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे, नेते जितेंद्र आव्हाड, ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर, नरेंद्र दराडे उपस्थित होते. यावेळी ठाकरे गटाचे आमदार आणि शरद पवार गटाच्या आमदारांकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना घेराव घालण्याचा प्रयत्न करत विशेष अधिवेशन बोलवा अशी मागणी केली.

अजित पवार गटाने सांभाळून राहावं: मनोज जरांगे पाटील ज्या पद्धतीनं बोलताहेत की, त्यांच्यासोबत दगा फटका होऊ शकतो हे अगदी बरोबर असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. त्यांना ज्या पद्धतीनं दगा फटका केला आहे तशाच प्रकारे सगळ्यांसोबत केला असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. राज्य शासनानं मराठा समाज, लिंगायत समाज, ओबीसी समाज, मुस्लिम समाज सर्वांना धोका दिला असल्याचा खळबळजनक आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे. कोण सुरक्षित आहे या राज्यामध्ये? याला पूर्णपणे जबाबदार राज्याचे गृहमंत्री आहेत. उपमुख्यमंत्री सातत्याने ते खोटं बोलत आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सरकारनं विशेष अधिवेशन बोलवावं: मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला तर त्यांना विधान परिषदेवर घेऊ. म्हणजे त्यांना माहित आहे की, आमदार अपात्र होणार आहे. म्हणजे त्या आमदारांसोबत देखील दगा फटका झाला आहे, म्हणजे शिंदेंना देखील दगा फटका केला. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांना देखील दगफटका केला तर स्वतःच्या घटक पक्षाला देखील दगाफटका करत आहे. भाजपा, जुमला पार्टी पासून सावध राहा, असं आवाहन सुप्रिया सुळे यांनी केलंय. तसेच सरकारनं विशेष अधिवेशन बोलवावं असं देखील आवाहन त्यांनी केलंय.

मंत्रालयीन कामकाज सुरू ठेवावं लागेल: राज्यातील बहुतेक सर्वच आमदारांची मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूने मागणी केली आहे. ह्या सर्व आमदारांची मागणी विशेष अधिवेशन बोलवण्याची आहे. मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर कुलूप लावल्याने मंत्रालयीन कामकाजात कोणताही व्यत्यय येऊ नये यासाठी मंत्रालय कामकाज सुरू ठेवण्यासाठी आपण आपलं धरणे आंदोलन पाठीमागे घ्यावे, अशी विनंती ह्या सर्व आमदारांना केली आहे. तसेच त्यांच्या सर्व भावना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे पोचवणार आहे, असं मंत्री अनिल पाटील म्हणाले.

हेही वाचा:

  1. Manonj Jaragne Patil News: मराठ्यांना आतापर्यंत सर्वांनी फसवलं, आजपासून पाणीही सोडणार - मनोज जरांगे
  2. Maratha Reservation All Party Meeting: आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानं सर्वपक्षीय बैठकीत नाराजी, एकमतानं 'हा' केला ठराव
  3. MLAs Agitation at Mantralaya : मराठा आरक्षणासाठी मंत्रालयाच्या गेटला ठोकलं टाळं, आमदारांना नेलं पोलीस स्थानकात!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.