मुंबई : अखिल भारतीय मराठा संघाचे अध्यक्ष शशिकांत पवार यांच्या पार्थिवावर दादर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.शशिकांत पवार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. ते ८२ वर्षाचे होते. रत्नागिरी मराठा उद्योजक फोरमच्या बैठकीसाठी ते मुंबईहून रत्नागिरीला गेले होते. तेथून परतत असताना वाटेत त्यांना हृदय विकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. शशिकांत यांच्या पश्चात त्यांच्यामागे पत्नी तसेच वीरेंद्र व योगेश पवार हे दोन मुलगे, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
राजकीय नेत्यांकडून शोकसंदेश : अप्पासाहेब पाटील यांच्या आकस्मित निधनावर राजकीय वर्तुळात देखील हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निधनाची माहिती मिळाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. "अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शशिकांत पवार यांच्या निधनाने अतीव दुःख झाले. मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी ते आयुष्यभर अविरतपणे कार्यरत राहिले. शशिकांत पवार यांच्या परिवाराच्या दुःखात सहभागी आहोत. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो हीच प्रार्थना." असे ट्विट मुख्यमंत्र्यांनी केले. तर काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही ट्विटरच्या माध्यमातून त्यांना आदरांजली दिली. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही "अ. भा. मराठा महासंघाचे नेते ॲड. शशिकांत पवार यांच्या निधनाने मराठा समाजाप्रति समर्पित नेता आपण गमावला आहे. अ.भा. मराठा महासंघाची स्थापना होत असताना स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या अतिशय जवळच्या सहकार्यांमध्ये त्यांचा समावेश होता" असे म्हणत त्यांना आदरांजली वाहीली.
मराठा समाजासाठी भरीव योगदान : शशिकांत पवार यांचे मराठा समाजासाठी भरीव योगदान राहील आहे. त्यांनी क्षत्रिय मराठा ज्ञाती समाज ही संस्था सुरू केली होती. अखिल मराठा महसंघासाठी शशिकांत पवार हे १९६४ सालापासून काम करत होते. अप्पासाहेब पाटील यांच्या निधनानंतर शशिकांत पवार यांनीच संस्थेची धुरा सांभाळली. संस्थेला वाढवण्यात त्याचे मोलाचे योगदान होते. मुंबई सेंट्रलच्या मराठा मंदिर या संस्थेमार्फतही त्यांनी राज्यभर अनेक उपक्रम राबवले होती. त्याचा मराठा समजला मोठा फायदा झाला. त्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमामुळे आखिल भारतीय मराठा महासंघ संस्थेचा वटवृक्ष झाला. अखिल भारतीय क्षत्रिय महासभा या संस्थेचे ते राज्य अध्यक्ष होते. तसेच गावदेवीला शारदा शिक्षण सेवा समितीची स्थापना केली.
हेही वाचा :Eknath Shinde : एकनाथ शिंदे छोटी आव्हान स्वीकारत नाही; आदित्य ठाकरेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार