ETV Bharat / state

राज्यात कोरोना योद्धेच मोठ्या प्रमाणावर संसर्गाच्या विळख्यात - कोरोना योद्धेच संसर्गाच्या विळख्यात

डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय आणि पोलीस कर्मचारी, एसटी महामंडळाचे कर्मचारी कोरोना योद्धे म्हणून काम करत आहेत. मात्र, या प्रत्येक विभागातील कर्मचाऱ्यांना कोरोनाचा प्रसार रोखताना संसर्ग झाल्याचे दिसून आले. पोलीस दलातील कोरोना योद्धे सर्वाधिक बाधित झाले आहेत. कोरोनाबाधित होऊनही बरे झाल्यानंतर पुन्हा एकदा कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभागी होण्याचा निर्धार कोरोना योद्ध्यांनी केल्याचे दिसून येते. राज्यातील कित्येक कोरोनामुक्त झालेले पोलीस कर्मचारी पुन्हा एकदा सेवेत रुजू झाले आहेत.

corona warriors corona infected
कोरोना योद्ध्यांना सर्वाधिक कोरोना संसर्गाचा विळखा
author img

By

Published : Jul 19, 2020, 1:36 PM IST

मुंबई - देशात सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या असलेल्या महाराष्ट्रामध्ये कोरोना योद्धे मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित झाले आहेत. कोरोना संसर्ग झालेल्यांमध्ये डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय आणि पोलीस कर्मचारी, एसटी महामंडळाचे कर्मचारी यांचा समावेश आहे. कोरोना संसर्गाच्या सुरुवाती काळापासून कोरोना योद्ध्यांचे कौतुक जरी होत असला तरी त्यांना सामाजिक अवहेलना सहन करावी लागले. अनेक गृहनिर्माण संस्थांमध्ये कोरोना योद्ध्यांना येण्या जाण्यावरही प्रतिबंध घालण्यात आले होते.

मुंबई बाहेरून वसई,ठाणे, कल्याण आणि इतर भागातून डॉक्टर, पोलीस, प्रशासकीय कर्मचारी रोज मुंबई मध्ये येत होते आणि पुन्हा संध्याकाळी त्यांच्या घरी परत जात होते. यामुळे त्यांना आणि त्यांच्या परिवाराला कोरोनाचा धोका संभवतो अशा कर्मचाऱ्यांना मुंबई तात्पुरती निवासस्थानाची सोय करावी, अशी मागणी उच्च न्यायालयात याचिकेद्वारे करण्यात आली होती.

कोरोनाच्या संकटाच्या काळात व्यक्तिगत हिता पेक्षा सार्वजनिक हित पाहणे महत्त्वाचे आहे. कोरोना योद्धे संकट असताना अत्यावश्यक सेवेत असल्याने कामावर यावे लागते. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन सर्व पातळीवर प्रयत्न करत आहे. कोरोना योद्धेही स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करत आहेत. त्यांच्या कुटुंबियांना देखील त्यांची काळजी आहे आणि ते त्यासाठी खबरदारी घेत आहेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कुटुंबापासून वेगळे ठेवणे सध्याच्या घडीला योग्य नाही. निडरपणे आणि प्रतिबंध न करता त्यांना काम करू द्यावे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले होते.

पाच हजारांपेक्षा जास्त पोलीस कोरोनाबाधित

सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत.तसेच कोरोनाबाधितांमध्ये पोलिसांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. धक्कादायक बाब म्हणजे रोज मोठ्या संख्येने पोलीस कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे राज्यात एकूण पाच हजार पेक्षा जास्त पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी सात जणांचा मृत्यू झाला असून चार हजार पेक्षा जास्त पोलिसांना उपचारांनंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कोरोनाविरुद्ध आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी यांच्याप्रमाणे पोलीस फ्रण्ट लाईनवर लढत आहेत. परंतु या कोरोना योद्ध्यांमध्येच संसर्ग वाढला आहे. त्यात पोलिसांची संख्या सर्वाधिक आहे. कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये 901 कर्मचारी आणि 106 अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

सध्या कोरोनाबाधित रुग्णांची पाच गटांमध्ये वर्गीकरण करण्यात येऊ शकते. कोरोनाचा संसर्ग झालेला पहिला वर्ग, संसर्ग झाला असून ही लक्षणे नसलेला दुसरा वर्ग,लक्षणे असलेला तिसरा वर्ग, लक्षणे वाढून कोरोना बाधित ठरलेला चौथा वर्ग आणि गंभीर प्रकृती असलेला कोरोनाबाधित यांचा पाचवा वर्ग.यामधील तिसरा गट हा जास्त धोकादायक ठरत आहे कारण या गटातील लोकांना साधा सर्दी-खोकला आहे ,असे समजून लॉकडाऊन असल्याने ते डॉक्टरांकडे जात नाहीत. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी ते बाहेर पडतात त्यामुळे त्यांच्याकडून संसर्गाची जास्त भीती आहे. त्यामुळे योग्य आणि अचूक असलेले किट विकसित करून दुसऱ्या आणि तिचा घटकापर्यंत पोहोचवणे आगामी काळात आव्हान ठरणार असल्याचे वैद्यकीय तज्ञ डॉ. रेवत काविंदे यांनी म्हटले आहे.

देशभरात 99 डॉक्टरांनी गमावला जीव

इंडियन मेडिकल असोसिएशनने एक आकडेवीरी जाहीर केली आहे. त्यानुसार कोरोना रुग्णांवर उपचार करताना देशातील 99 डॉक्टरांना आपला जीव गमवावा लागल्याचे म्हटले आहे. आयएमएच्या आकडेवारीनुसार कर्तव्यावर असताना 1302 डॉक्टरांना कोरोना संसर्ग झाला होता. 99 डॉक्टरांचा मृत्यू झाला त्यापैकी 73 डॉक्टर वय वर्षे 50 वरील होते. 19 डॉक्टरांचे वय 35 ते 50 वर्षे होते. 7 डॉक्टरांचे वय 35 पेक्षा कमी होते असेही सांगण्यात आले आहे. कोरोना संसर्ग झालेल्या 1302 डॉक्टरांमध्ये 586 प्रॅक्टिसिंग डॉक्टर आणि 566 रेसिडेंट डॉक्टर आणि 150 सर्जन असल्याची माहिती आयएमएने दिली आहे.

206 एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग

कोरोना योध्दे म्हणून लढत असलेले विविध वर्गातील कर्मचारी कोरोना संसर्गाला बळी पडल्याचे दिसून येत आहे.घराची ओढ लागलेल्या परप्रांतीयांना टाळेबंदीच्या काळात राज्याच्या वेशीपर्यंत पोहचविणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना देखील करोनाची लागण होत चालली आहे. आतापर्यंत 206 एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला, तर पाच कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. एसटीच्या मुंबई, ठाणे विभागातच सर्वाधिक 150 रुग्ण आहेत. याच भागातून सर्वाधिक परप्रांतीय मजुरांची वाहतूक एसटीने केली होती. कर्मचाऱ्यांची संख्या एकीकडे वाढत असताना त्यांची आरोग्य तपासणी, सुरक्षा उपाययोजना यांकडे मात्र एसटी महामंडळाने साफ दुर्लक्ष केले आहे.

एसटीतील एकूण बाधित कर्मचाऱ्यांमध्ये 150 कर्मचारी मुंबई विभागातील मुंबई सेन्ट्रल, परळ, कुर्ला नेहरु नगर, उरण आणि पनवेल आगारातील, तसेच ठाणे विभागातील खोपट, वंदना आगार, शहापूर, कल्याण, विठ्ठलवाडी आगारातील आहेत.

केईएम रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता आणि कोरोना प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने नेमलेल्या तज्ज्ञ समितीचे सदस्य डॉ. अविनाश सुपे म्हणाले की, काही आठवड्यांत कोरोना संक्रमणाची ॲक्टिव्ह प्रकरणे कमी होतील अपेक्षा आहे. “देशातील एकूण संक्रमणाच्या तुलनेत महाराष्ट्राचे आकडे दिवसेंदिवस कमी होत आहेत.; धारावी सारख्या संक्रमण नियंत्रणाची जागतिक आरोग्य संघटनेने दखल घेतली आहे. गेल्या काही आठवड्यांतही मुंबईतील सक्रिय रुग्णांच्या संख्येबाबत दिलासादायक स्थिती आहे. पुढील काही आठवड्यात ती आणखी कमी होईल, अशी आमची अपेक्षा आहे. ”

कोरोनातून बरे होऊन पुन्हा लढण्याचा निर्धार

पुढील काळामध्ये कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन वाढीच्या उपाय योजना विविध जिल्ह्यांमध्ये विविध महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येत आहेत. या कामांमध्ये कोरोना योद्ध्यांचे योगदान हे महत्त्वपूर्ण ठरत आहे.गेले चार महिने मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून अन्न वाटप, पावसाळी कामातील वृक्षांचे नियोजन आणि तातडीच्या अत्यावश्यक सेवेसाठी तत्पर असलेले मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी शेवटच्या टप्प्यात कोरोनाबाधित झाले आहे. संकट संपलेले नाही त्यामुळे पुढील काळात बरे होऊन पुन्हा संकटाच्या कामात झोकून द्यायचे, असे त्यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.

सक्रिय रुग्णांपेक्षा जास्त कोरोनामुक्त

महाराष्ट्र राज्यातील रुग्णसंख्या 3 लाख 937 वर गेली आहे. यातील एकूण 1 लाख 23 हजार 678 केसेस ॲक्टिव्ह आहेत. तर 1 लाख 65 हजार 663 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. राज्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 15 लाख 22 हजार 564 नमुन्यांपैकी 3 लाख 937 नमुने पॉझिटिव्ह (19.76 टक्के) आले आहेत. राज्यात 7 लाख 40 हजार 884 लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत. सध्या 45 हजार 552 लोक संस्थात्मक क्वारंटइनमध्ये आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.