मुंबई - लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबईतून महायुतीचे उमेदवार मनोज कोटक हे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करत आंबधाम मंदिरात दर्शन घेऊन मुलुंड पश्चिम येथील सेवालय या कार्यालयापासून रॅलीला सुरुवात केली आहे.
यावेळी महिला पुरुष मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले आहेत. पुणेरी ढोल पथक आणि राजस्थानी ढोलक पथक यांनी रॅली रंगात आली आहे. महिला कार्यकर्त्या हातात कमळाचे फुल घेऊन नाचत आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या वेशभूषा करून तरुण सहभागी झाले आहेत. यात मंत्री प्रकाश मेहता, प्रवीण छेडा सहभागी झाले आहेत. मोदी आणि कोटक यांच्या घोषणेने मुलुंड पश्चिम दणाणून गेला आहे. सर्वत्र भाजप आणि शिवसेनेच्या झेंडे आणि पताका हातात घेऊन परिसर भगवामय झाला आहे.