ETV Bharat / state

Manoj Jarange Patil Mumbai Sabha : मनोज जरांगे पाटलांचं वादळ आता मायानगरीत धडकणार; 'या' ठिकाणी होणार सभा

Manoj Jarange Patil Mumbai Sabha : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मराठा समाज बांधव आक्रमक होत असल्याचं दिसत आहे. मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी समाजाचं नेतृत्व करत आहेत. जालना येथे मराठा समाजाची मोठी सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला प्रचंड प्रतिसाद लाभला होता. या सभेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मनोज जरांगे आता काय भूमिका घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना, लवकरच जरांगे पाटील मुंबईत येणार (Manoj Jarange Patil Visit Mumbai) असल्याचं सांगितलं जात आहे.

Manoj Jarange Patil
मनोज जरांगे पाटील
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 17, 2023, 9:21 PM IST

माहिती देताना संभाजी राजे दहातोंडे

मुंबई : Manoj Jarange Patil Mumbai Sabha : अंतरवाली सराटीच्या परिसरात लाखोंच्या संख्येने मराठा समाज ऐकवटला होता. मराठा समाजाच्या सभेत त्यांच्यातील वेदना, आग, आक्रोश आणि ऐकतेचा दर्शन पाहायला मिळाला. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन (Maratha Reservation) मराठा समाजाला एकत्र आणण्याचं काम मनोज जरांगे पाटील यांनी केलं. महाराष्ट्रभर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दौरे करून सभा घेतल्या. आता त्यांचा मोर्चा मुंबईकडे वळलेला आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर येत (Manoj Jarange Patil Visit Mumbai) आहेत. त्यांच्या मुंबईतील भेटीगाठीवर राजकीय वर्तुळात उत्सुकता लागून राहिली आहे.

दुसऱ्या टप्प्यातील दौरा सुरू : आरक्षणाच्या संदर्भात आम्ही सर्व निकष पूर्ण केले असून, सरकारला आरक्षण द्यावेच लागेल, अशा ठाम भूमिकेवर मनोज जरांगे पाटील आहेत. सरकारला दहा दिवसाची दिलेली मुदत 24 ऑक्टोबर रोजी संपत आहे. त्यामुळे 24 तारखेच्या आत सरकारला निर्णय घ्यायचा आहे, असा अल्टिमेटम त्यांनी 14 ऑक्टोबरच्या अंतरवाली सराटीतील सभेत सरकारला दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पहिल्या टप्प्यात राज्यातील ग्रामीण भागात दौरे केले. 18 तारखेपासून त्यांच्या दुसऱ्या टप्प्यातील दौऱ्याला सुरुवात होत आहे. यात मुंबई, बारामती, पुणे, मावळ, फलटण या ठिकाणी सभा देखील घेणार असल्याचं समजतंय.

सत्ताधारी-विरोधकांना डोकेदुखी : मराठा समाजाला आरक्षण दिलेच जावे, हवे तर त्यासाठी ओबीसीमधून आरक्षण देण्यात यावे, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील येत्या काळात सरकार पुढे डोकेदुखी ठरू शकतात. मराठा समाजाची जमेची बाजू म्हणजे सर्वोच्च न्यायालयानं आरक्षणावरील 'क्युरेटिव्ह पिटीशन' दाखल करून घेण्यास मान्यता दिली आहे.

शिवाजी नाट्य मंदिरमध्ये होणार सभा : मुंबईतील दौऱ्यामध्ये मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या वेगवेगळ्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. मुंबई दौऱ्यात मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्र्यांची भेट घेतील का? तसेच मराठा समाजाच्या राजकीय नेत्यांच्या भेटी घेणार का? हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जरांगे पाटील यांच्या टीमकडून मुंबईतील सभेसाठी मुंबई महानगरपालिकेकडे आझाद मैदान आणि शिवाजी पार्क मैदानासाठी विचारपूस करण्यात आली होती. मात्र, मुंबई महापालिकेकडून होकार मिळाला नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यातून मार्ग काढत आता दादरमधील शिवाजी नाट्य मंदिर येथे मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे.

मराठा सेवा संघाचा आरोप : मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी मुंबई महापालिकेकडून शिवाजी पार्क आणि आझाद मैदान देण्यास (Azad Maidan Shivaji Park) आडकाठी घातली गेली, यामुळे मराठा समाज नाराज झाला आहे. सत्तेत आणि विरोधात असलेल्या राजकीय पक्षांना मनोज जरांगे पाटील यांची मुंबईतील सभा डोकेदुखी ठरू शकते. याच कारणाने सरकारकडून दोन्ही मैदाने नाकारल्याचा आरोप मराठा महासंघाचे नेते संभाजी राजे दहातोंडे पाटील यांनी केला आहे. सत्ता जरी तुमची आता असली तर निवडणुकीच्या काळात मराठा समाज राज्यकर्त्यांना आपली जागा दाखवेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

सभेतून कोणाचा समाचार घेणार? : अनेक पक्षांच्या सभा या मुंबईत गाजल्या आहेत. मग शिवाजी पार्क असो किंवा आझाद मैदान असो. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची शिवाजी पार्क येथील दसरा मेळाव्याची सभा कायमच स्मरणात राहते. त्यामुळे अनेक राजकीय पक्षांकडून शिवाजी पार्कवरील सभेसाठी मुंबई महापालिकेकडे मागणी केली जात असते. मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना, मनोज जरांगे पाटील यांना शिवाजी पार्क मैदान सभेसाठी मिळाले नसल्यानं राजकारण तापू शकते. मनोज जरांगे पाटील मुंबईतील बंदिस्त सभेतून कोणाचा समाचार घेतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

हेही वाचा -

  1. Pravin Darekar On Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांचा बोलविता धनी कोण - प्रवीण दरेकर
  2. Manoj Jarange On OBC : 'ओबीसीमध्ये यायचं असेल तर...', नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील, वाचा सविस्तर
  3. Maratha Reservation: रात्री उशिरा जरांगे पाटील यांचा मुख्यमंत्र्यांशी फोनवरून संवाद...एकनाथ शिंदेंनी जरांगे पाटलांना काय सांगितलं?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.