मुंबई : माजी आमदाराला मनिषा कायंदेंनी ब्लॅकमेल केल्याचा आरोप शेवाळेंनी ( Manisha Kayande Blackmailed A Former MLA ) केला आहे. आरोप केलेले हे प्रकरण २०११ मधील ( Allegation of MP Rahul Shewale ) असून, मनिषा कायंदे यांच्याकडून एका माजी आमदाराला ब्लॅकमेलिंग केल्याचा आरोप शेवाळेंनी पत्रात केला ( MLA Manisha Kayande Demanded in Legislative Council ) आहे. एका गुंडामार्फत कायंदे यांनी धमकी दिल्याचा आरोप करीत या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी शेवाळे यांनी फडणवीसांकडे केली आहे.
मनिषा कायंदे यांनी माजी आमदाराकडे मागितली खंडणी मनिषा कायंदे यांनी या माजी आमदाराकडे खंडणी मागितल्याचा आरोपही शेवाळे यांनी केला आहे. डी. के. रावमार्फत या धमक्या दिल्याचे शेवाळे यांनी म्हटले आहे. एका ज्येष्ठ नेत्यासोबत २००७ मध्ये लग्न करूनही २०११ साली लैंगिक शोषणाचा आरोप केला आणि संबंधित नेत्याला ब्लॅकमेल केल्याचा आरोप खासदार शेवाळे यांनी फडणवीसांना लिहिलेल्या पत्रातून केला आहे.
कायंदे यांची चौकशी होणार का घर, वडिलांचा दवाखाना आणि दुकानांचे फर्निचर कायंदे यांनी ज्येष्ठ नेत्याकडून करून घेतल्याचा आरोप शेवाळेंनी पत्रात केला आहे. त्यामुळे आता फडणवीस कायंदेंची चौकशी करणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.