मुंबई : रविकुमार मोटकुरी (वय 46) यांच्यावर शनिवारी मालमत्तेच्या वादातून त्यांच्या दोन लहान भावांनी आणि त्यांच्या पत्नींनी हल्ला केला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यानंतर पोलिसांनी रविवारी रात्री मृताचे दोन भाऊ जितेंद्र मोटकुरी (वय ४३) आणि महेंद्र मोटकुरी (वय ४०) यांना अटक केली. एमआयडीसी पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३०४ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. मुंबईच्या जोगेश्वरी भागात मालमत्तेच्या वादातून दोन भाऊ आणि त्यांच्या पत्नींनी त्यांचा मोठा भाऊ रविकुमार मोटकुरी याची हत्या केली. ही घटना शनिवारी सायंकाळी अंधेरी परिसरात घडली.
मालमत्तेच्या मालकी हक्कावरून भांडणे : मृताच्या पत्नीने दिलेल्या जबानीवरून एमआयडीसी पोलिसांनी भादंवि 304 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल केला. मारहाण करणारा लहान भाऊ जितेंद्र मोटकुरी आणि महेंद्र मोटकुरी यांना अटक केली, असे एमआयडीसी पोलिसांनी सांगितले. दरम्यान, रविकुमारच्या पत्नीने आरोप केला आहे की, आपल्या पतीला आपल्या भावांनी आणि त्यांच्या पत्नींनी ती आणि तिच्या दोन मुलांसमोर मारले आहे. पोलिसांनी मृताच्या पत्नीचा जबाब नोंदवला आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या मालमत्तेबाबत न्यायालयात खटला सुरू आहे. त्या मालमत्तेच्या मालकी हक्कावरून भाऊ अनेकदा भांडले आहेत.
लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण : एमआयडीसी पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता तीन भावांमध्ये मालमत्तेच्या वादावरून वाद सुरू झाला होता. नंतर त्याचे रुपांतर मारामारीत झाले. मोठा भाऊ रविकुमार मोटकुरी याची त्याच्या दोघा भावांनी हत्या केली. लहान भाऊ, जितेंद्र राजन्ना मोटकुरी आणि महेंद्र राजन्ना मोटकुरी आणि त्यांच्या पत्नी प्रियंका आणि भाग्यश्री हे सर्व मारहाणीत सहभागी होते. महेंद्र मोटकुरी यांनी मृत रविकुमारला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. रविकुमारला जवळच्या रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलीस आता पोस्टमॉर्टम रिपोर्टची वाट पाहत आहेत. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गुन्हयाची हकिकत : मृत रवीकुमारचे कुटुंब तसेच त्याचे दोन भाऊ महेंद्र, जितेंद्र व दोघांचे कुटुंब असे सर्वजण जोगेश्वरी या ठिकाणी एकत्र राहतात. राहत्या रूमच्या मालकीवरून तिघांमध्ये वाद आहे. दिवाणी कोर्टामध्ये केस चालु आहे. मृत रवीकुमार हा आजारी असुन त्यास हृदय विकाराचा त्रास होता. त्यास मारहाण केल्यास त्याचा मृत्यु होवु शकतो, याची जाणीव असताना 18 फेब्रुवारीला 4 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी दोन धाकट्या भावंडांनी त्यांच्या पत्नीसह प्राॅप्रर्टीच्या कारणावरून भांडण उकरून काढले. त्यांनी संगनमताने सपना यांच्या पतीस लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यास सोफ्यावर ढकलले. त्यामुळे ते चक्कर येवुन बेशुध्द पडले. त्यास उपचाराकरिता होली स्पिरीट हाॅस्पिटल, अंधेरी येथे नेले असता डाॅक्टरांनी तपासुन दाखलपुर्व मयत घोषित केले. फिर्यादी सपनाने मयताच्या मृत्युसंबधी संशय व्यक्त केला होता. डाॅ. इंगळे यांनी मयत इसमाचे शवविच्छेदन केले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सविता थोरात आणि पोलीस निरीक्षक आरडेकर हे करत आहेत.