नागपूर : राज्याच्या उपराजधानीत कुत्र्याशी लैंगिक संबंध (Sex With Dog ) ठेवल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक (Dog sex accused arrested ) करण्यात आली आहे. नागपुरातील हुडकेश्वर परिसरात ही घटना घडली. भटक्या कुत्र्यावर लैंगिक अत्याचार (Sexual abuse of a stray dog) केल्याच्या आरोपाखाली 40 वर्षीय व्यक्तीला शुक्रवारी अटक करण्यात आली. पोलीस अधिकाऱ्याने याविषयी माहिती दिली.
आरोपी बालाघाटी : शाहू नगर परिसरातील एका बागेत या व्यक्तीने हे कृत्य केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. शुक्रवारी सकाळी एका गुप्त माहितीवरून त्याला ताब्यात घेण्यात आले. तो मूळचा मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील असून येथे मजूर म्हणून काम करतो," हुडकेश्वर पोलिस ठाण्याचे निरीक्षक ललित वर्टीकर यांनी सांगितले.
गुन्हा दाखल : आरोपीविरुद्ध कलम ३७७ (निसर्गाच्या आदेशाविरुद्ध शारीरिक संबंध), २९४ (अश्लीलता) आणि इतर गुन्ह्यांतर्गत भारतीय दंड संहिता आणि क्रौर्य प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणात प्राणी कायद्याचेही कलम जोडण्यात आले आहे.