ETV Bharat / state

विक्रोळीत पार्किंगमधल्या कारमध्ये आढळला युवकाचा मृतदेह - युवकाचा मृतदेह आढळून आला

विक्रोळी पार्क साईट येथील कैलास कॉम्प्लेक्स ९० फूट रोड जवळील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारमध्ये  एका युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. सुरेश डबरे (40) असे त्या मृत युवकाचे नाव आहे.

घटने चे छायाचित्र
author img

By

Published : Jun 13, 2019, 8:25 PM IST

Updated : Jun 13, 2019, 8:32 PM IST

मुंबई- विक्रोळी पार्क साईट येथील कैलास कॉम्प्लेक्स ९० फूट रोड जवळील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारमध्ये एका युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. सुरेश डबरे (40) असे त्या मृत युवकाचे नाव आहे. या घटनेची माहिती होताच परिसरात एकच खळबळ उडाली.

घटने बद्दल सांगतांना पोलीस उपायुक्त अखिलेश कुमार सिंग

पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एम.एच-४५ ८२६३ कारमधून दुर्गंधी येत असल्याने आसपासच्या लोकांना शंका आली. त्यामुळे त्यांनी पार्क साईट पोलिसांना या बाबतीत माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ धाव घेऊन कारची तपासणी केली. त्यावेळी त्यांना कारमध्ये युवकाचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर त्याचा मृतदेह पुढील तपासणीसाठी राजावाडी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

सुरेशने आज सकाळी १० च्या दरम्यान गाडीतील वातानुकूलीत यंत्रणा चालू करून झोपल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सुरेश हा पार्कसाईट येथील रहिवासी आहे. ही गाडी त्याचीच असून तो दोन दिवसांपासून घरी आला नसल्याचेही प्राथमिक माहितीत समोर आले आहे. ही गाडी ज्या ठिकाणी पार्क करण्यात आली होती, त्याच ठिकाणी नुकताच एक टँकर अपघातही झाला होता.

Intro:विक्रोळी पार्क साईट येथे पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या कार मध्ये युवकाचा शव आढळून

विक्रोळी पार्क साईट येथील कैलास कॉम्प्लेक्स 90 फूट रोड जवळील मनपा शाळेच्या बाजूला पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या कार मध्ये सुरेश डबरे वय 40 यांचा शव आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहेBody:विक्रोळी पार्क साईट येथे पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या कार मध्ये युवकाचा शव आढळून

विक्रोळी पार्क साईट येथील कैलास कॉम्प्लेक्स 90 फूट रोड जवळील मनपा शाळेच्या बाजूला पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या कार मध्ये सुरेश डबरे वय 40 यांचा शव आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आज सकाळी 10 च्या दरम्यान कैलास कॉम्लेक्स मनपा शाळेच्या बाजूच्या पार्किंग मध्ये पार्क साईट येथील रहिवासी सुरेश डबरे या युवकांचा गाडीत वातानुकूलित यंत्रणा चालू करून झोपी गेला असल्याने मृत्यू झाल्याचे प्राथमिक माहिती मिळत आहे.मयत हा पार्कसाईट येथील रहिवासी आहे.ही गाडी त्याचीच असल्याचे व तो दोन दिवस झाले घरी आला नसल्याचे प्राथमिक माहीती मिळत आहे.
ही गाडी ज्या ठिकाणी पार्किंग करण्यात आली ते ठिकाण नुकत्याच टँकर अपघात झालेल्या पार्किंग मध्ये ही mh 45 8263 वागनर कार उभी होती. त्या गाडीतून दुर्गंधी येत असल्याने लोकांना शंका आली त्यावेळी पार्क साईट पोलीस यांना याची माहिती देण्यात आली. व गाडी खोलून शव राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पोलीस उपायुक्त अखिलेश कुमार सिंग

एक शव गाडीत मिळाले असून त्याची ओळख पटली आहे शव राजावाडी रुग्णालतात पाठवले आहे.
या ठिकाणची पार्किंग समस्या यावर आम्ही महानगर पालिका व वाहतूक विभाग यांना पत्रव्यवहार केला आहे. व या ठिकाणी रस्त्यावरील वीज पुरवठा लवकर सुरू केला जाईल .Conclusion:
Last Updated : Jun 13, 2019, 8:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.