ETV Bharat / state

Mumbai Crime News: धक्कादायक! गाडी पार्किंगच्या वादात धक्का लागल्याने मृत्यू, डॉक्टर मुलाचे उपचारही ठरले निरर्थक

गाडी पार्किंगच्या वादात एका डॉक्टरला त्यांच्या वडिलांना कायमचे गमवावे लागले. हा प्रकार कांदिवली पश्चिम परिसरात घडला आहे. त्यानुसार त्यांच्या शेजारी राहणाऱ्या राजेश पाटील याच्या विरोधात चारकोप पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Mumbai Crime News
पार्किंगच्या वादात मृत्यु
author img

By

Published : Apr 24, 2023, 11:02 AM IST

मुंबई : कांदिवली येथे पार्किंगचा वाद इतका शिगेला पोहोचेल, असे स्वप्नातही डॉक्टर मुलाला वाटले नव्हते. कांदिवली येथे डॉक्टरच्या वडिलांचा त्यांच्या वादातून मृत्यू झाला आहे. याप्रकरणी चारकोप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गाडी पार्किंगवरून भांडण करणाऱ्या राजेश पाटील या शेजाऱ्यावर चारकोप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांदिवली पश्चिम येथे आशा सुभाष बोराडे ( वय ५७) या राहतात. त्यांचा मुलगा स्वप्नील ( वय ३७) हा भगवती हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात डॉक्टर म्हणून कार्यरत आहे. तसेच तळमजल्यावर एका कुरिअर कंपनीला त्यांनी गाळा भाड्यावर दिला आहे.

गाडी पार्किंगवरून भांडण केले : २१ एप्रिलला दुपारी भाडेकरूचा सुरक्षारक्षक रंजनकुमार याच्यासोबत शेजारी राहणाऱ्या पाटील यांनी गाडी पार्किंगवरून भांडण केले. त्याबाबत आशा यांनी पती सुभाष यांना फोन करून सांगितले. तेव्हा सुभाष यांनी पाटीलच्या विरोधात चारकोप पोलीस पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पाटील बाहेरून परत आल्यावर सुभाष त्यांना भांडणाचा जाब विचारण्यासाठी गेले. त्या दोघांमध्ये पुन्हा वाद होऊन हाणामारीवर गेले. या दरम्यान पाटील यांनी सुभाष यांना जोरात धक्का मारून खाली पाडले. सुभाष यांनी पोलीस नियंत्रण कक्षावर कॉल करत पुन्हा तक्रार दिली.

उपचारादरम्यान सुभाष यांचा मृत्यू : त्यादरम्यान ते खाली कोसळले. त्यांचा मुलगा डॉ. स्वप्नील यांनी त्यांना प्राथमिक उपचार देत तातडीने पोलिसांच्या मदतीने ऑस्कर रुग्णालयात दाखल केले. तिथे उपचारादरम्यान सुभाष यांचा मृत्यू झाला. क्षुल्लकच्या पार्किंगच्या वादातून डॉक्टरच्या वडिलांना आपला जीव गमावा लागला आहे. त्यामुळे कांदिवली येथील घडलेल्या घटनेमुळे सोसायटीत हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याचप्रमाणे चारकोप पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. अगदी किरकोळ वाद झाला होता. परंतु त्याचे रूपांतर हे अगदी धक्कादायक ठरले आहे.

हेही वाचा : Mentally Challenged Girl Raped : मुंबईत मतिमंद अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपी अटकेत, जेवणाच्या बहाण्याने घरी बोलवून करायचा अत्याचार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.