ETV Bharat / state

Pratap Sarnaik : आमदार प्रताप सरनाईकांची तब्बल साडेसात कोटींची फसवणूक; काय आहे प्रकरण? - प्रताप सरनाईक

प्रताप सरनाईक हे शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट) आमदार आहेत. प्रताप सरनाईक यांनी मीरा रोड येथे एका जमिनीचा व्यवहार केला होता. त्या व्यवहारात सरनाईक यांची तब्बल 7 कोटी 66 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात मात्र वेगळीच माहिती समोर येत आहे.

आमदार प्रताप सरनाईक
आमदार प्रताप सरनाईक
author img

By

Published : Jul 28, 2023, 3:00 PM IST

मुंबई : शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार प्रताप सरनाईक यांची तब्बल 7 कोटी 66 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. एका जमीन व्यवहारात सरनाईकांची फसवणूक झाल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी प्रताप सरनाईक यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. परंतु या व्यवहारात आपली फसवणूक झाली नाही, तर बँकेची फसवणूक झाल्याची प्रतिक्रिया प्रताप सरनाईक यांनी 'ईटीव्ही भारत - मराठी'शी बोलताना दिली. आपण जमिनीचा व्यवहार केला हे खरे, पण यात आपली फसवणूक झाली नसल्याचे ते म्हणाले. आता नेमके काय आहे हे प्रकरण प्रश्न पडला असेल तर चला जाणून घेऊ..

काय आहे प्रकरण : हे प्रकरण 2021 मधील आहे. प्रताप सरनाईक यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी मीरा रोड येथे मालमत्ता विकत घेतली होती. त्याचा मोबदला सुमारे साडे सात कोटी रुपये जागेच्या मालकाला दिले. जागेच्या मालकाबरोबर रीतसर करारनामा झाला. त्यातल्या मसुद्यानुसार मूळ जागामालकाने आयकर विभाग, भाडेकरु आदी थकबाकी मूळ जागामालकाने भरणे अपेक्षित होते. मूळ जागामालकाने बॅंकेकडून 1 कोटी 85 लाख रुपये कर्ज घेतले होते. त्याचे हप्ते बँकेजवळ भरले नाहीत. ही बाब सरनाईक यांना सहा ते आठ महिन्यांनी कळली. त्यानंतर त्यांनी तातडीने एओडब्ल्यूला यासंदर्भात पत्र लिहून गुन्हा चौकशी करण्याची मागणी केली. चौकशीअंती आता संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

फसवणूक झाली, पण माझी नाही: फसवणूक झाल्याप्रकरणी योग्य माहिती मिळवण्यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांच्याशी 'ईटीव्ही भारत-मराठी'ने संपर्क केला. यावर बोलताना सरनाईक म्हणाले की, माझी फसवणूक झालेली नाही.पण बँकेची झाली आहे. आम्ही दोन वर्षापूर्वी मीरारोडला एक प्रॉपर्टी घेतली होती. प्रॉपर्टी घेत असताना जमीन मालकाबरोबर आपण करारनामा करत असतो. त्यात आपण लिहितो की, जुने काही थकबाकी असेल. भाडेकरूचे देणे काही असेल किंवा महानगरपालिकेची काही थकबाकी असेल,आयकर विभागाचे काही थकबाकी असेल. हे सर्व क्लिअर करुन देण्याची जबाबदारी तुमची. आम्ही त्याविषयीही नोंदणी केली होती. सर्व गोष्टी योग्य वाटल्यानंतर आम्ही साडेसात कोटी रुपये त्या जमीन मालकाला दिले. परंतु आम्हाला 6 ते 8 आठ महिन्यानंतर कळले की, त्यांने बँकेचे काही कर्ज घेतले होते. ते कर्ज त्यांनी 1 कोटी 85 लाख रुपयात सेटलमेंट केले होते. परंतु बँकेकडे तपास केला तेव्हा बँकेने सांगितले की, त्यांचे कर्ज क्लिअर झालेले नाही. त्याने पैसे भरलेले नाहीत. आर्थिक गुन्हे शाखेला आमच्या वकिलांकडून एक पत्र दिले होते. या पत्रातून त्यांना चौकशी करण्यास सांगितले होते. त्यानंतर त्यांनी सत्यता तपासली. आर्थिक गुन्हे शाखेचे कायदा सल्लागार जे असतात, त्यांनी सांगितले ही बँकेची फसवणूक झाली आहे. त्यामुळे गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे. सर्व थकबाकी क्लिअर करण्यासाठी आम्ही आम्ही सर्व पेमेंट दिले होते. परंतु त्याने बँकेला भरले नाहीत. आम्ही जे पैसे दिले त्यातून त्याने बँकेची काही थकबाकी क्लिअर केली होती. दरम्यान आपण बँकेला त्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यास सांगितल्याचे सरनाईक यावेळी म्हणाले. जमीन मालकाने बँकेच्या कर्जाची थकबाकी दिली नसल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेचे पैसे बुडवल्याने बँक त्याच्याकडून पैसे वसूल करेल. परंतु आम्ही दिलेले पैशातून आमची फसवणूक झाली नाही.

एका वृत्तपत्राने याबाबतीत चुकीच्या माहितीवर आधारित बातमी छापल्याचा दावा सरनाईक यांनी केला.

हेही वाचा-

  1. 'आ देखे जरा, किस में कितना है दम'; नरेंद्र मेहतांचे प्रताप सरनाईक यांना खुले आव्हान
  2. MLA Pratap Sarnaik: प्रताप सरनाईक पुन्हा येणार अडचणीत न्यायालयात होणार सुनावणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.