ETV Bharat / state

Children Abduction: 2 मुलांचे अपहरण केल्याप्रकरणी एका ४५ वर्षीय आरोपीला अटक - Kanjurmarg Police Station

Children Abduction: एका ४५ वर्षीय आरोपीने 2 मुलांचे अपहरण केल्याप्रकरणी कांजूरमार्ग पोलीसांनी आरोपीला अटक केली आहे. प्रकरणी एका महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे, असे एका पोलीस अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले आहे.

Children Abduction
Children Abduction
author img

By

Published : Dec 15, 2022, 10:39 AM IST

मुंबई: मुंबईतील कांजूरमार्ग परिसरातून 2 मुलांचे अपहरण केल्याप्रकरणी एका ४५ वर्षीय पुरुषाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी एका महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे, असे एका पोलीस अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले आहे. 5 वर्षांचा मुलगा आणि 1 वर्षाची मुलगी, या मुलांना कोणतीही इजा न करता वाचवण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

कांजूरमार्ग पोलीस ठाण्याच्या Kanjurmarg Police Station अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, अपहरण रविवारी झाले आणि नंतर मुलांच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून एफआयआर (प्रथम माहिती अहवाल) दाखल करण्यात आले आहे. आरोपींच्या शोधासाठी विशेष पोलिस पथके तयार करून कल्याण (मुंबईच्या हद्दीत), पुणे, कोल्हापूर, अहमदनगर आणि औरंगाबाद येथे रवाना करण्यात आल्याचे पोलिसांनी यावेळी सांगितले आहे.

त्यानंतर मध्य महाराष्ट्रातील औरंगाबाद येथील एका महिलेच्या (४०) तावडीतून अपहरण झालेल्या मुलांची सुटका करण्यात आली. आणि तिला ताब्यात घेण्यात आले आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या 45 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या अपहरणामागचा हेतू अद्याप समजू शकलेला नाही. पुढील तपास करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.