ETV Bharat / state

Sextortion Trap : सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकला 60 वर्षांचा निवृत्त शिक्षक, पावणे चार लाखांना गंडा घालणाऱ्यास राजस्थानहून अटक - trapping retired teacher in sextortion trap

Sextortion Trap : निवृत्त शिक्षकाला सेक्सटोरशनच्या जाळ्यात अडकवून पावणेचार लाखांचा गंडा घातल्या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

Sextortion Trap
Sextortion Trap
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 26, 2023, 10:42 PM IST

मुंबई Sextortion Trap : ग्रँड रोड परिसरात राहणाऱ्या साठ वर्षांच्या निवृत्त शिक्षकाला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवून पावणेचार लाखांचा गंडा घालण्यात आला होता. ही घटना 2 फेब्रुवारी 2023 ला घडली होती. याप्रकरणी तक्रारदार सेवा निवृत्त शिक्षकानं डी बी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याची उकल आता करण्यात आली असून पोलिसांनी राजस्थानला जाऊन आरोपीला अटक केली आहे. प्रेमचंद शर्मा वय 39 असं आरोपीचं नाव आहे. त्याला आज कोर्टानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

शिक्षकाला पावणे चार लाखांचा गंडा : 60 वर्षीय सेवानिवृत्त शिक्षकाला दोन फेब्रुवारीला रात्री साडेनऊच्या सुमारास व्हाट्सअपवर चॅटिंग सुरू असताना एका महिलेचा व्हिडिओ कॉल आला. नग्न अवस्थेत महिलेनं व्हिडिओ कॉल आल्यानं वृद्ध शिक्षक घाबरून गेला. त्यानंतर सेवानिवृत्त शिक्षकाकडं सायबर पोलीस असल्याचं सांगून हेमंत कुमार यानं तुमचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड न करण्यासाठी 32 हजार 400 रुपये मागितले. त्यानंतर ॲमेझॉन साइटवर अश्लील व्हिडिओ अपलोड करण्याची धमकी देण्यात आली. ॲमेझॉन साईटवरती व्हिडिओ अपलोड न करण्यासाठी 65 हजार 99 रुपये घेण्यात आले. दरम्यान फेसबुक इंस्टाग्राम या सोशल मीडियावर अश्लील व्हिडिओ अपलोड न करण्यासाठी 81 हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. अशा प्रकारे वेगवेगळ्या कारणानं शिक्षकाला पावणे चार लाखांना फसवण्यात आलं.

असा घडला प्रकार : राकेश अस्थाना नावाच्या व्यक्तीनं पीडित मुलीनं तक्रार दाखल केली असून ती मागे घेण्यासाठी दोन लाख रुपये उकळले. दरम्यान व्हाट्सअप व्हिडिओ कॉलवर नग्न अवस्थेत व्हिडिओ कॉल करणाऱ्या मुलीनं आत्महत्या केली आहे. याबाबत पोलीस कारवाई नको हवी असेल, तर आठ लाख रुपये द्यावे, लागतील अशी मागणी करण्यात आली. आठ लाखांची मागणी केल्यानंतर निवृत्त शिक्षकाला आपली फसवणूक होत असल्याचं लक्षात आलं. त्यामुळं शिक्षकानं थेट डी बी मार्ग पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार डी बी मार्ग पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम 419, 420 384, 34 आणि माहिती व तंत्रज्ञान कायदा कलम 66 डी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींनी गुन्हा करताना वापरलेला मोबाईल क्रमांक बंद येत असल्यानं पोलिसांना आरोपीचा शोध घेण्यासाठी बराच वेळ लागला.

विविध बॅंक खात्यात पैसे वळवले : तक्रारदार शिक्षकांन ज्या वेगवेगळ्या बँक अकाउंटवर पैसे पाठवले होते, ते पैसे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डद्वारे पैसे काढण्यात आले होते. आरोपींच्या बँक खात्याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. बँक खात्यात वळविण्यात आलेले रु. २,७८,४९९/- इतकी रक्कमेपैकी काही रक्कम पुहाना, हरियाणा राज्य येथून काढण्यात आलेली आहे. उर्वरित रक्कम पुढे यस बँकेच्या विविध खात्यामध्ये पाठवुन त्यातील काही रक्कम ही पुहाना, हरियाणा येथून काढण्यात आलेली. तक्रारदाराच्या खात्यातून वजा झालेल्या फसवणुकीच्या पुर्ण रक्कमेपैकी 2 लाख इतकी रक्कम एचडीएफसी बँकेत वळविण्यात आलेली होती. या खात्याची बँकेकडुन माहिती घेतली असता त्यातून फसवणुकीची १० हजार , 56 हजार, ३० हजार इतकी रक्कम राजस्थान राज्यातील भरतपूर येथून काढण्यात आल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली.

सापळा रचून आरोपीला अटक : या POS ट्रान्झेक्शनची माहिती मिळवून संबंधित खाते धारकाचे संपर्क क्रमांक मिळवून ट्रेस करण्यात आले. मोबाईल लोकेशन ट्रेस झाल्यानंतर डी बी मार्ग पोलीस ठाण्याच्या पाच पोलिसांचे पथक राजस्थान राज्यातील भरतपूर येथे गेलं. कामा गावात गेल्यानंतर पोलिसांवर दगडफेक केली जाते. त्यामुळं पोलिसांना खात्रीपूर्वक माहिती मिळाली की, आरोपी कामा गावाबाहेर येत आहे. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपी प्रेमचंद शर्मा याला अटक केली.

हेही वाचा -

  1. Silver Crown Theft : मंदिरात देवाचं दर्शन घेऊन चोरला चांदीचा मुकूट, पहा व्हिडिओ
  2. Thane Crime: दुर्गाडी पुलावरील डंपर चालकाच्या हत्येचा अखेर उलगडा, पळून जाणाऱ्या हल्लेखोरांना वांद्रे रेल्वे स्थानकातून अटक
  3. Whale fish Vomit : महाबळेश्वरात व्हेल माशाची साडेसहा कोटींची उलटी जप्त, माजी नगरसेवकासह चौघांना अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.