ETV Bharat / state

Malegaon Bomb Blast Case : मालेगाव बाॅम्बस्फोट प्रकरणातील आरोपी प्रज्ञासिंह ठाकूर न्यायालयात उशिरा हजर, पुढील सुनावणी होणार 'या' तारखेला

Malegaon Bomb Blast Case : 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आज न्यायालयानं नियमित सुनावणी निश्चित केली होती. मात्र खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर न्यायालयात उशिरा दाखल झाल्या, तर काही आरोपी गैरहजर राहिले. त्यामुळं 313 कलम अंतर्गत जबाब नोंदवण्याबाबतची सुनावणी 3 ऑक्टोबर रोजी करण्याचे निर्देश न्यायमूर्ती ए. के. लाहोटी यांनी दिलेत. तर दैनंदिन आधीची सुनावणी उद्या देखील सुरू राहील, असे देखील त्यांनी निर्देश दिलेत.

Malegaon Bomb Blast Case
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 25, 2023, 5:16 PM IST

Updated : Sep 25, 2023, 5:26 PM IST

मुंबई Malegaon Bomb Blast Case : मालेगाव या ठिकाणी 2008 मध्ये बॉम्बस्फोट झाला होता. त्यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला, तर शेकडो लोक जखमी झाले. त्या खटल्याच्या संदर्भात साक्षीदारांची तपासणी पूर्ण झालीय. आता मुंबई बॉम्बस्फोट खटल्यासाठी स्थापन केलेल्या विशेष न्यायालयानं 25 सप्टेंबर रोजी यातील सर्वच आरोपींना हजर राहण्याचे निर्देश दिले होते. मात्र आरोपी आज वेळेत हजर नव्हते. त्यापैकी आरोपी क्रमांक एक प्रज्ञासिंह ठाकूर या उशिरा म्हणजे तब्बल दोन वाजेनंतर न्यायालयात हजर झाल्या. परिणामी न्यायालयानं त्यांना विचारणा केली. त्यावर तब्येत बिघडल्यामुळं उशीर झाल्याचं त्यांनी नमूद केलंय. माझ्या आजारपणाचा विचार करून योग्य ती तारीख द्यावी, अशी विनंती त्यांनी केलीय. (Bomb Blast Case accused Pragya Singh Thakur)

न्यायालयाची कडक शब्दात सूचना : विशेष न्यायाधीश लाहोटी यांनी हजर नसलेल्या आरोपींच्या संदर्भात देखील विचारणा केली. मात्र आरोपी सुधाकर द्विवेदीसह इतर आरोपी हजर नव्हते. त्यांच्या वकिलांना न्यायालयानं कडक शब्दात सूचना केली की, तीन ऑक्टोंबर रोजी सर्व आरोपींना हजर केलं पाहिजे. त्या दिवसापासून नियमित सुनावणी सुरू होईल. मात्र, आज सर्व आरोपी हजर नसल्यामुळं कलम 313 अंतर्गत आरोपींचे जबाब नोंदवणं, आरोपांवर त्यांचा प्रतिसाद नोंदवणं या बाबी न्यायालयानं केल्या नाहीत. तीन ऑक्टोंबरपासून त्याची सुनावणी नियमित सुरू होईल, तेव्हा जबाब नोंदवणे प्रक्रिया होईल, असं देखील न्यायालयानं आपल्या निर्देशात नमूद केलंय. (Malegaon Bomb Blast Case hearing)

300 पेक्षा अधिक साक्षीदारांची साक्ष : मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात 300 पेक्षा अधिक साक्षीदारांची साक्ष घेतली गेलीय. आता यापुढे ही साक्षीदारांची साक्ष तपासणी बंद करीत आहोत, असं राष्ट्रीय तपास संस्थेच्या वतीनं नुकत्याच झालेल्या सुनावणीमध्ये स्पष्ट केलं गेलं होतं. आता विशेष न्यायालयानं आज त्या संदर्भात सर्वच आरोपींना तीन ऑक्टोंबर 2023 रोजी हजर राहण्याचे आज निर्देश दिलेत. विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. के. लाहोटी यांच्या न्यायालयात ही सुनावणी पार पडणार आहे.

हेही वाचा :

  1. Malegaon Bomb Blast : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण, आरोपी खासदार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर संबंधित साक्षीदार फितूर
  2. Pragya Singh Thakur: प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर काँग्रेस आक्रमक, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
  3. साध्वी प्रज्ञासिंगविरोधात गुन्हा दाखल करण्याची सीआर संघटनेची मागणी
Last Updated : Sep 25, 2023, 5:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.