ETV Bharat / state

Mumbai Crime News: तपास संस्थांकडून छोट्या राजनला मोठा धक्का, फायनान्स हँडलर सावंतला सिंगापूरहून घेतले ताब्यात

केंद्रीय तपास यंत्रणेने अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला मोठा झटका दिला आहे. छोटा राजनचा जवळचा असलेला गुंड अबू सावंतला सिंगापूरमधून भारतात प्रत्यार्पण करण्यात आले आहे. 2000 मध्ये संतोष उर्फ ​​अबू सावंतच्या प्रत्यार्पणाबाबत सिंगापूरमध्ये कागदोपत्री प्रक्रिया सुरू झाली. त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही जारी करण्यात आली होती. भारतीय तपास यंत्रणेला दोन दशके प्रयत्न सुरु होते. त्याला आता यश मिळाले आहे.

फायनान्स हँडलर सावंतला सिंगापूरहून घेतले ताब्यात
Abu Sawant brought to India from Singapore
author img

By

Published : Apr 19, 2023, 1:53 PM IST

मुंबई - भारतीय तपास यंत्रणेला परदेशात लपलेल्या आणखी एक मोठ्या गुंडाला भारतात आणण्यात मोठे यश मिळाले आहे. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा अत्यंत जवळचा गुंड आणि फायनान्स हँडलर संतोष सावंत उर्फ ​​अबू सावंत याला सिंगापूरमधून हद्दपार करून भारतात आणण्यात आले आहे. केंद्रीय यंत्रणा आणि मुंबई गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईनंतर त्याला सिंगापूरमधून हद्दपार करून दिल्लीत आणण्यात आले. सीबीआयने अबू सावंतला दिल्लीतून ताब्यात घेतले आहे. गेल्या दोन दशकांपासून छोटा राजनचा हा गुंड फरार होता. त्याच्यावर मोक्कासह अनेक गुन्हे दाखल आहेत.

2000 मध्ये संतोष उर्फ ​​अबू सावंतच्या प्रत्यार्पणाबाबत सिंगापूरमध्ये कागदोपत्री प्रक्रिया सुरू झाली. त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही जारी करण्यात आली होती. भारतीय तपास यंत्रणा यांनी दोन दशकांहून अधिक काळ मेहनत केल्यानंतर त्याला हद्दपार करण्यात आले. सिंगापूरमध्ये राहत असताना अबू सावंत हॉटेल व्यवसायाच्या नावाखाली अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनसाठी काम करत होता. मुंबई क्राइम ब्रँचसह सीबीआयनेही त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल केले आहेत. गँगस्टर डी. के. रावनंतर छोटा राजन टोळीत संतोष सावंत हा नंबर २चा गुंड होता.

काळ्या पैशावर नजर ठेवायची होती जबाबदारी-2000 मध्ये छोटा राजनवर हल्ला झाला. त्यानंतर रवी पुजारी, हेमंत पुजारी, बंटी पांडे, संतोष आणि विजय शेट्टी, एजाज लकडावाला असे त्याचे जवळचे मित्रही त्याला सोडून गेले. पण अंडरवर्ल्डमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करणारा संतोष सावंत, डी. के. राव हे छोटा राजन याच्या खांद्याला खांदा लावून उभा राहिले. लवकरच त्याचा जवळचा मित्र बनले. डी. के. राव याच्याकडे टोळीचा बंदोबस्त करण्याचे काम होते. तर छोटा राजनने अबू सावंतवर त्याच्या आणि टोळीच्या काळ्या पैशावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सोपवली होती.

हे आहेत आरोप- संतोष सावंत यांचे वडील व्यवसायाने रिअल इस्टेट व्यावसायिक होते. अशा परिस्थितीत त्यांना प्रॉपर्टी डीलिंग आणि फायनान्सची चांगली समज होती. छोटा राजनच्या कंपनीचे प्रॉपर्टी डीलिंग आणि फायनान्स हाताळणीचे काम त्याने पूर्णपणे आपल्या ताब्यात घेतले होते. त्याच्यावर प्रामुख्याने धमकावणे, खंडणी आदी आरोप आहेत. मुंबईसह संपूर्ण देशात टार्गेट ठरवणे, त्यांच्याशी संपर्क साधून धमकावणे, प्रोटेक्शन मनीच्या नावाखाली पैसे उकळणे, हे सर्व काम केवळ सावंत याच्या मदतीने सुरू होते.

हेही वाचा-Nandurbar Fire News : शोरूमला भीषण आग लागल्याने 20 पेक्षा अधिक ट्रॅक्टर जळून खाक, कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा अंदाज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.