मुंबई - आम्हाला सुरक्षित घर द्या, या मागणीसाठी आज माहुलवासियांनी सेनाभवनावर गुलाबाची फुले नेत शुभेच्छा व निवेदन यात्रा काढत आगळे-वेगळे आंदोलन केले. सरकारने आम्हाला सुरक्षित घर दिले पाहिजे, आम्ही जीवन मरणाशी लढतो आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आम्हाला घर देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे हे सरकार नक्कीच आमचा प्रश्न सोडवणार, असाही विश्वासही यावेळी आंदोलकांनी व्यक्त केला.
हेही वाचा - घातवार; दिवसभरात तब्बल चार आत्महत्यांच्या घटना उघडकीस
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी माहुलवासियांना आमची सत्ता आल्यास तुमचा प्रश्न सोडवू, असे आश्वासन दिले होते. त्याची आठवण करून देण्यासाठी आम्ही आज सेनाभवनला आलो आहोत. हे सरकार आमच्या घराचा प्रश्न नक्की सोडवेल, असा विश्वास आंदोलकांनी व्यक्त केला.