ETV Bharat / state

काँग्रेसच्या नेत्यांनी मुंबईत घेतली शरद पवारांची भेट

बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सभागृह नेते म्हणून अजित पवार यांची निवड करण्यात आली. तर आज (गुरुवारी) काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षनेत्याची निवड केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर या बैठकीत दोन्ही पक्षांनी मिळून कोणती राजकीय भूमिका घ्यावी, याविषयी पवार यांच्याशी चर्चा करण्यात आली.

काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली शरद पवार यांची भेट (संग्रहित)
author img

By

Published : Oct 31, 2019, 12:35 PM IST

मुंबई - विधानसभेचा निकाल लागल्यानंतर अद्याप कोणत्याही पक्षाने सत्ता स्थापनेचा दावा राज्यपालांकडे केलेला नाही. त्यामुळे राज्यात निर्माण झालेली राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन आज (गुरुवारी) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी ही भेट झाली.

हेही वाचा - 'जोपर्यंत भाजपकडून लिखित प्रस्ताव नाही तोपर्यंत सेनेची भूमिका स्पष्ट नाही'

सत्तास्थापनेसाठी सेना आणि भाजप येत्या 2 दिवसात नेमकी काय भूमिका घेते, यावर वाट पाहण्याचा आणि त्यानंतर आपली भूमिका जाहीर करण्याचा विषय दोन्ही पक्षाकडून चर्चिला गेला असल्याचे सांगण्यात येते. बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सभागृह नेते म्हणून अजित पवार यांची निवड करण्यात आली. तर आज (गुरुवारी) काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षनेत्याची निवड केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर या बैठकीत दोन्ही पक्षांनी मिळून कोणती राजकीय भूमिका घ्यावी, याविषयी पवार यांच्याशी चर्चा करण्यात आली.

हेही वाचा - 'राम मंदिराच्या निकालानंतर काही शक्ती धर्माच्या नावार तेढ निर्माण करतील'

या बैठकीला शरद पवार यांच्यासह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष आमदार अशोक चव्हाण आदी नेते उपस्थित होते. ही बैठक केवळ काही वेळ चालली असली तरी या बैठकीमध्ये येत्या काळात दोन्ही पक्षाकडून कोणती राजकीय भूमिका घेतली जाईल, याविषयी पवार यांनी काही सूचना केल्या असल्याचे सांगण्यात येत आहे.

Intro:
काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली शरद पवार यांची भेट
mh-mum-01-ncp-cong-mitting-7201153

(..तोपर्यंत या साठी फाईल फुटेज वापरावेत)

मुंबई, ता. ३१:
विधानसभेचा निकाल लागल्यानंतर हे अद्याप कोणत्या पक्षाने सत्ता स्थापण्याचा दावा राज्यपालांकडे केला नाही त्यामुळे राज्यात निर्माण झालेली राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आज त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी झालेल्या बैठकीत सत्तास्थापनेसाठी सेना आणि भाजपा येत्या दोन दिवसात नेमकी काय भूमिका घेते यावर वाट पाहण्याचा आणि त्यानंतर आपली भूमिका जाहीर करण्याचा विषय दोन्ही पक्षाकडून चर्चिला गेला असल्याचे सांगण्यात येते. काल राष्ट्रवादी काँग्रेस कडून दोन्ही पक्षाचे सभागृह नेते म्हणून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांची निवड करण्यात आली तर आज काँग्रेसच्या विधिमंडळ पक्ष नेत्यांची निवड केली जाणार आहे या पार्श्‍वभूमीवर आज या बैठकीत दोन्ही पक्षांनी मिळून कोणती राजकीय भूमिका घ्यावी याविषयी पवार यांच्याशी चर्चा करण्यात आली.
या बैठकीला शरद पवार यांच्यासह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माजी प्रदेशाध्यक्ष आमदार अशोक चव्हाण आदी नेते उपस्थित होते हे बैठक केवळ काही वेळ चाललीे असले तरी या बैठकीमध्ये येत्या काळात कोणती राजकीय भूमिका दोन्ही पक्षाकडून घेतली जाईल याविषयी पवार यांनी काही सूचना केल्या असल्याचे सांगण्यात येते.

Body:काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली शरद पवार यांची भेटConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.