मुंबई - लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. मतदान करण्यासाठी मतदार सज्ज झाले आहेत. माहिम मतदारसंघ येथील पहिल्याच यादीत नाव असणारे पाटील कुटुंब या निवडणुकीत उमेदवार पारखूनच मतदान करण्याचा पवित्रा घेतला आहे. निवडणुकीत प्राथमिक गरजा, रोजगार, वैद्यकीय, शिक्षण सेवा, झोपडपट्टी पुनर्वसन या समस्या जो उमेदवार सोडवेल त्यालाच मतदान करू, असे या कुटुंबांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.
देशाच्या हितासाठी व विकासासाठी मतदान करणे आवश्यक आहे. लोकशाही बळकटी करणासाठी मतदारांनी निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. त्यामुळेच आता आगामी निवडणूक आहे. एका मतावर काही उमेदवाराचे अस्तित्व अवलंबून असते त्यामुळे निवडणूकीच्या निकालादिवशी समोर एका मताची किंमत काय असते? याचा अंदाज लावता येतो. हे पाहता माहिम मच्छिमार कॉलनी येथे झोपडपट्टी राहणाऱ्या पाटील कुटुंबियांकडे १५ ते १६ मतदार आहेत व त्यांचा कुटुंबासह शेजारी राहणारे ५ कुटुंबं संलग्न आहेत. त्यात एकूण १०० एक मत आहेत. हे सर्व मतदार आहेत आणि निवडणुकीच्या निकालाची हवा पालटून टाकण्याची क्षमता त्यांच्या कुटुंबात आहे.
कुटुंब अरविंद पाटील १९६७ सालापासून माहीम मतदारसंघात स्थायिक आहेत. आज त्यांची तिसरी पिढी येथे वास्तव्यास आहे. तसेच त्यांचे नातेवाईकही आहेत. ते येणाऱ्या निवडणुकीत प्राथमिक गरजा तसेच, रोजगार, वैद्यकीय सेवा, शिक्षणाची सेवा, झोपडपट्टी पुनर्वसन अशी जे काही समस्या आहेत, त्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारालाच मतदान करू, असे कुटुंबाकडून सांगण्यात आले. गेल्या वर्षी निवडून आलेले विभागात फिरकले नाहीत आमच्या समस्या जाणल्या नाहीत, त्यामुळे यावर्षी आम्ही उमेदवार पारखून मतदान करू. असे कुटुंबाकडून सांगण्यात आले.