मुंबई : पुण्यातील कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघात लागलेल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये चांगलीच रसिकेत पाहायला मिळते. गेल्या दोन दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांच्या बैठका सातत्याने होत आहेत. पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत ठाकरे गटाचा उमेदवार उभा करता यावा यासाठी शिवसेनेकडून चाचण्या सुरू झाल्या आहेत.
महाविकास आघाडीची बैठक : याबाबतची प्राथमिक बोलणी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत देखील झालेली आहे. तर कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही आहे. त्यामुळे या सगळ्या संदर्भात येत्या दोन फेब्रुवारीला महाविकास आघाडी मधील ज्येष्ठ नेत्यांची बैठक होणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. कसबा पेठ विधानसभा निवडणूक गेल्या 25 वर्षापासून काँग्रेस लढवत असल्याची आठवण नाना पटोले यांनी करून दिली. दादरच्या टिळक भवन प्रदेश कार्यालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी बैठक होण्याबाबत ची माहिती दिली आहे.
वंचित बाबत अद्याप चर्चा नाही : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी पक्ष या दोन्ही पक्षाची युती झाली आहे. त्यामुळे युतीमध्ये या दोन्ही पक्षांमध्ये काय ठरले आहे. याबाबत आपल्याला अद्यापही कल्पना नाही. कारण प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी पक्षाबाबत अद्याप तरी, काँग्रेस सोबत कोणतीही चर्चा झालेली नाही. वंचित बहुजन आघाडी अद्याप महाविकास आघाडीचा घटक पक्षात नसल्यामुळे त्याबाबत चर्चा करण्यात आलेली नसल्याचा ही नाना पटोले यांनी यावेळी सांगितले.
पहाटेचा झालेला शपथविधीची घटना चांगली नव्हती : अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी युती करत पहाटेचा शपथविधी घेतला होता. मात्र, हा शपथविधी शरद पवार यांनीच राष्ट्रपती राजवट हटवण्यासाठी ती खेळी केली होती असे, विधान जयंत पाटील यांनी केले. यावर बोलताना नाना पटोले म्हणले की, या मुद्यावर आपल्याला कोणतीही प्रतिकिर्या द्यायची नाही. मात्र, ही घटना घडली ती घडायला नको होती असे, नाना पटोले म्हणाले आहेत.
नगर जिल्ह्याची कार्यकारणी बरखास्त : नाशिकच्या पदवीधर मतदारसंघात सुधीर तांबे यांनी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज न भरता त्यांच्या मुलाला म्हणजेच सत्यजित तांबे यांना अपक्ष उमेदवारी दिली. याबाबत काँग्रेसने कठोर पावले उचलत दोन्हीही पिता-पुत्रांना निलंबनाची कारवाई केली आहे. या कारवाईनंतर अहमदनगर जिल्ह्याचे काँग्रेस अध्यक्ष सतीश साळुंखे यांचे निलंबन केले आहे आणि त्यांच्या निलंबना सोबतच अहमदनगर जिल्ह्याची पूर्ण कार्यकारणी समितीत बरखास्त करण्यात आली असल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली. सत्यजित तांबे यांनी काँग्रेस सोबत बंडखोरी केल्यानंतरही सत्यजित तांबे यांच्या वतीने सतीश साळुंखे यांच्याकडून प्रसार माध्यमांमध्ये चुकीची माहिती पसरवल्यामुळे ही कारवाई करण्यात आला असल्याचे नाना पटोळे यांनी सांगितला आहे.
हेही वाचा - Congress Committee Dissolved : अहमदनगर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी बरखास्त