ETV Bharat / state

संवाद हवा..! महाविकास आघाडीचे सरकार ५ वर्ष चालेल, पुढच्या निवडणुकाही एकत्रच लढू - शरद पवार मुलाखत संजय राऊत

एक शरद, सगळे गारद या शिर्षकाखाली शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली, त्यावेळी पवार यांनी महाविकास आघाडी सरकारबाबत मत व्यक्त केले आहे. याबरोबरच त्यांनी या मुलाखती वेळी सत्ता स्थापनेच्या राजकारणात विरोधकांकडून केलेल्या आरोपांचे खंडणही केले आहे. तसेच केंद्रसरकारची व विशेष करून भाजपच्या ऑपरेशन कमळ वरून निशाणा साधला आहे.

sharad pawar
शरद पवार
author img

By

Published : Jul 13, 2020, 8:25 AM IST

मुंबई - महाराष्ट्रात तीन पक्षांचं सरकार आहे. तिघांत संवाद असणं महत्त्वाचं आहे. मुख्यमंत्र्यांनी हा संवाद ठेवला तर कोणतेही ऑपरेशन फोल ठरेल. तसेच महाविकास आघाडी सरकारचे भविष्य हेच आहे की, हे सरकार पाच वर्षे चांगलं चालेल आणि तशी व्यवस्थित आम्ही काळजी घेतली तर, पुढच्या निवडणुकाही आम्ही एकत्र लढवू, असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुलाखतीच्या अंतिम भागात व्यक्त केला आहे.

एक शरद, सगळे गारद या शिर्षकाखाली शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली, त्यावेळी पवार यांनी महाविकास आघाडी सरकारबाबत मत व्यक्त केले आहे. याबरोबरच त्यांनी या मुलाखती वेळी सत्ता स्थापनेच्या राजकारणात विरोधकांकडून केलेल्या आरोपांचे खंडणही केले आहे. तसेच केंद्रसरकारची व विशेष करून भाजपच्या ऑपरेशन कमळ वरून निशाणा साधला आहे.

ठाकरेंच्या कामात उणीव नाही, मात्र संवादाचा अभाव-

महाविकास आघाडी सरकार बाबत बोलताना पवार म्हणाले, 'सध्याच्या सरकारमध्ये अडचण अजिबात नाही. सरकार आघाडीचे आहे. शिवसेनेसोबत आम्ही दोघेजण आहोत. आमच्या कामाची पद्धत ही नाही आणि आताचं जे सरकार आहे, ते एकटय़ाचं नाही. हे तिघांचं आहे आणि या तिघांच्या मध्ये दोघांची काही मतं असतील तर मतं जाणून घेण्याच्या संबंधीचीसुद्धा एक आवश्यकता आहे आणि म्हणून आमच्या लोकांची एक सूचना असते, आग्रह असतो की, आपण डायलॉग ठेवा.

संसदीय लोकशाहीमध्ये डायलॉग हा कायम ठेवला पाहिजे. तो डायलॉग ठेवला तर अशी चर्चासुद्धा होणार नाही. कारण ठाकरेंच्या कामाच्या पद्धतीमध्ये आम्हाला काही उणं दिसत नाही. फक्त डायलॉग दिसत नाही, असे स्पष्ट पवार यांनी यावेळी व्यक्त केले.

फडणवीसांचे आरोप फेटाळले, भाजपने दिली ऑफर-

पवार या मुलाखतीमध्ये बोलताना म्हणाले की, 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता स्थापनेसाठी भाजपबरोबर कधीच चर्चा केली नाही. शिवसेनेला दूर ठेवून आपण सरकार बनवू हे प्रपोजल भाजपनेच आणलं होते; पण आता ‘ठाकरे सरकार’ पाच वर्षे चालेल!” २०१४ मध्येच आम्हाला शिवसेना भाजप सोबत जाऊ नये असे वाटत होते, त्यासाठी आम्ही काही राजकीय चाली खेळल्या आणि भाजपला पाठिंबा दिला असल्याचे पवार यांनी यावेळी कबूल केले. मात्र, 2019 मध्ये भारतीय जनता पक्षाबरोबर सत्ता स्थापनेबाबत आम्ही कधीच चर्चा केली नाही. हे प्रपोजल घेऊन भाजपचे नेतेच अनेकदा चर्चेला आले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले..

भाजपच ऑपरेशन कमळ

‘ऑपरेशन कमळ’ याचा अर्थ सरळ सरळ सत्तेचा गैरवापर करून लोकांनी निर्माण केलेली सरकारं दुबळी करणं, डीस्टॅबिलाईज करणं आणि त्याच्यासाठी केंद्राच्या सत्तेचा पुरेपूर गैरवापर करणं. कर्नाटक, मध्यप्रदेश , आता राजस्थानमध्येही तेच सुरू असल्याचे पवार म्हणाले. विरोधी विचारांची सरकारे अस्थिर करणे हा सत्तेचा दुरुपयोग आहे. ‘ऑपरेशन कमळ’ हा त्याचाच भाग असून महाराष्ट्रात ते चालणार नसल्याचेही पवार यांनी ठाणपणे सांगितले.

पहिल्यांदा तीन महिन्यांत सांगत होते.. नंतर आता सहा महिने झाले… आता सहा महिने झाल्याच्या नंतर सप्टेंबरचा वायदा आहे. काही लोक ऑक्टोबरचा करतायेत. माझी खात्री आहे की, पाच वर्षे हे सरकार उत्तम रीतीने राज्याचा कारभार करेल आणि ऑपरेशन कमळ असो की आणखी काही, त्याचा काहीही परिणाम उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर होणार नसल्याचेही पवार म्हणाले.

तसेच महाराष्ट्रात तीन पक्षांचं सरकार आहे. तिघांत संवाद असणं महत्त्वाचं आहे. मुख्यमंत्र्यांनी हा संवाद ठेवला तर कोणतेही ऑपरेशन फोल ठरेल, असेही पवार म्हणाले.

क्षुद्रपणाचं राजकारण

तसेच भाजप सरकार क्षुद्रपणाचे राजकारण करत असल्याचेही टीका त्यांनी केली. पवार म्हणाले, 'आज काही राज्यं त्यांच्या बरोबर नाहीत, त्यांनी अशी टोकाची भूमिका कधी घेतली नाही. ते केंद्राशी जमवून घेत आहेत. मनमोहन सिंगांनी कधी आपल्यावर कोणी टीका केली म्हणून आकस बाळगला नाही. मोदी तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते. ते सातत्याने मनमोहन सिंगांवर टीका करीत. पण मनमोहन सिंगांनी कधी त्याचा राग गुजरातवर काढला नाही

हा सुसंस्कृतपणा नाही-

प्रियंका गांधी यांना राहत्या घरातून मोदी सरकारने बाहेर काढले. हा माणुसकीचाच पराभव आहे, असं नाही वाटतं? का असा प्रश्न विचारला असता पवार म्हणाले की, 'माझ्या हातात सत्ता आहे, त्या सत्तेचा गैरवापर करून तुम्हाला आम्ही त्रास देऊ शकतो, त्या सत्तेचा वापर तुमच्याविरुद्ध करू शकतो…यात काही शहाणपणा नाही. एका माजी पंतप्रधानाच्या मुलीला दिलेलं घर तुम्ही काढून घेता आणि त्यांना आता कुठेतरी लखनौला जाऊन राहण्याची वेळ आली. मला स्वतःला यात सुसंस्कृतपणा वाटत नसल्याची अप्रत्यक्ष टीका त्यांनी भाजपवर केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.