मुंबई : महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज विधानभवनात बैठक पार पडली विधानसभा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या दालनात ही बैठक पार पडली असून या बैठकीला खुद्द शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील उपस्थित होते.
बैठकीत ठरली रणनीती : राज्य सरकार, केंद्र सरकारला घेण्यासाठी महाविकास आघाडीने या बैठकीत रणनीती तयार केली असून महाविकास आघाडीचे नेत्यांची संयुक्त सभा महाराष्ट्रातल्या मुख्य शहरांमध्ये होणार आहे. या सभांचे नियोजन आखण्यासाठी ही बैठक पार पडली असून 15 मार्चला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडणार असून या होणाऱ्या सभांचे अंतिम नियोजन या बैठकीत ठरवला जाणार आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या सभा : महाविकास आघाडी कडून होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या सभांचा आयोजन करण्यात आलेला आहे. छत्रपती संभाजीनगर मुंबई पुणे कोल्हापूर अमरावती नाशिक आणि नागपूर अशा सात शहरांमध्ये या सभेचे आयोजन करण्यात आलेल आहे. दोन एप्रिल पासून 11 जून पर्यंत या सभांचा सपाटा सुरू होणार असून राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात तिन्ही पक्षांच्या महत्त्वाच्या नेत्यांचा आवाज बुलंद होणार आहे.
असे असणार सभांचे नियोजन : दोन एप्रिलला संभाजी नगर येथील पहिली सभा, 16 एप्रिलला दुसरी सभा नागपूरला, 1मे तिसरी सभा मुंबईत होणार, 14 मेला पुणे येथे चौथी सभा, 28 मे ला पाचवी सभा कोल्हापूरला, 3 जुन ला नाशीक् मध्ये सहावी सभा, 11 जुन आमरावती सातवी सभा होणार आहे.
तपशील - छत्रपती संभाजीनगर - अंबादास दानवे, उद्धव ठाकरे, पुणे - अजित पवार, राष्ट्रवादी, कोल्हापूर - सतेज पाटील, काँग्रेस, मुंबई - आदित्य ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, नाशिक - छगन भुजबळ, राष्ट्रवादी नागपूर - सुनील केदार, काँग्रेस, अमरावती - यशोमती ठाकुर काँग्रेस, 15 तारखेला होणाऱ्या बैठकित सभेची सविस्तर चर्चा होणार आहे.
हेही वाचा - Sachin Vaze : 100 कोटी भ्रष्टाचार प्रकरणाची आरोपी सचिन वाझे न्यायालयात हजर