ETV Bharat / state

Mahavikas Aghadi Mahamorcha : विराट मोर्चासाठी महाविकास आघाडीची जय्यत तयारी - Mahavikas Aghadi Mahamorcha

महापुरुषांबाबत होणाऱ्या वादग्रस्त वक्तव्याच्या मुद्द्यावरून ( Controversial statement from BJP ) 17 डिसेंबरला होणाऱ्या महाविकास आघाडीचा विराट मोर्चाची ( Maha Vikas Aghadi Mahamorcha ) जय्यत तयारी तीनही पक्षांकडून सुरू झाली आहे. वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान ते आझाद मैदान असे जवळपास साडेपाच किलोमीट हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

Mahavikas Aghadi Mahamorcha
Mahavikas Aghadi Mahamorcha
author img

By

Published : Dec 11, 2022, 8:27 PM IST

मुंबई - 17 डिसेंबरला होणाऱ्या महाविकास आघाडीचा विराट मोर्चाची ( Maha Vikas Aghadi Mahamorcha ) जय्यत तयारी तीनही पक्षांकडून सुरू झाली आहे. हा विराट मोर्चा यशस्वी ठरवा यासाठी तिन्ही पक्षाचे ज्येष्ठ नेते यामध्ये लक्ष घालत असून या मोर्चाच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षाला इशारा देण्याचे काम महाविकास आघाडी ( Maha Vikas Aghadi ) करणार आहे.

महापुरुषांबद्दल भाजपचे वादग्रस्त विधान - भारतीय जनता पक्ष ( Bharatiya Janata Party ) , शिंदे गटाकडून सातत्याने महापुरुषांबाबत होणाऱ्या वादग्रस्त वक्तव्याच्या मुद्द्यावरून ( Controversial statement from BJP ) मोर्चा काढण्यात येणार आहे. राज्यातून बाहेर जाणारे उद्योगधंदे तसेच नुकताच उभारलेला महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी 17 डिसेंबरला महामोर्चाचा इशारा राज्य सरकारला दिला आहे.

राज्य सरकारला महामोर्चाचा इशारा - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ( Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray ) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, विधानसभा विरोधी पक्ष नेते अजित पवार ( Assembly Opposition Leader Ajit Pawar ), काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण, ( Senior Congress leader Ashok Chavan ) बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत मोर्चाच्या घोषणेबाबत दोन दिवसापूर्वी बैठक पार पडली होती. त्या बैठकीतून 17 डिसेंबरला भायखळा येथील जिजामाता जिजाबाई भोसले उद्यान ते आझाद मैदान महामोर्चाचा इशारा राज्य सरकारला देण्यात आला आहे.

शरद पवार या मोर्चात सामील होणार का? या बैठकीला तीनही पक्षाचे प्रमुख नेते वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान ते आझाद मैदान असा जवळपास साडेपाच किलोमीटरचे अंतर चालत जाणार आहेत. त्या मोर्चात ठाकरे गटाकडून खुद्द उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, अरविंद सावंत, विनायक राऊत हे नेते असणार आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, छगन भुजबळ त्यासोबतच काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात अशोक चव्हाण नाना पटोले भाई जगताप असे महत्त्वाचे नेते उपस्थित असणार आहेत. तसेच तिनेही पक्षाचे आमदार खासदार देखील या मोर्चात सामील होणार आहेत. यासोबतच समाजवादी पक्ष, जयंत पाटील यांचा शेतकरी कामगार पक्ष हा देखील सामील होणार आहे. मात्र अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार या मोर्चात सामील होणार का? याबाबत स्पष्टता नाही.

हे आहेत महामोर्चाचे मुख्य मुद्दे -
१ राज्यपाल भगतसिंह कोशारी आणि भाजप नेत्यांकडून सातत्याने महापुरुषांवर होणारे वादग्रस्त वक्तव्य
२ कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची महाराष्ट्र विरोधी विधाने, तसेच सीमा भागात राहणाऱ्या गावांचे इतर राज्यांमध्ये समाविष्ट करण्याचे कट कारस्थान
३ सत्ताधारी पक्षाची नेत्यांचे महिला तसेच इतर नेत्यां बाबत बेताल वक्तव्य
४ महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यामध्ये घेण्याचे कटकारस्थान

विरोधी पक्ष आक्रमक - महाविकास आघाडीकडून महामोर्चाबाबतचे हे चार मुद्दे देण्यात आले आहेत. या चारही मुद्द्यांवर विरोधी पक्ष आक्रमक झाला असून, राज्य सरकारला धारेवर धरण्यासाठी या महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सातत्याने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून महापुरुषांबाबत झालेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राज्यपालांना पदावरून हटवा, अशी मुख्य मागणी महाविकास आघाडीच्या या मोर्चाची आहे. मात्र 17 डिसेंबर पर्यंतच्या कालावधीत राज्यपालांना केंद्र सरकारने हटवलं तरीही, हा मोर्चा 17 डिसेंबरला निघणारच असा इशारा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिला आहे.

राज्यभरातून आमदार खासदार येणार - राज्यातील तीनही महत्त्वाच्या पक्षाची महत्त्वाची नेते 17 डिसेंबरला होणाऱ्या मोर्चात सहभागी होणार असल्यामुळे राज्यभरातून त्या पक्षाचे आमदार, खासदार हे देखील त्या दिवशी मुंबईत दाखल होणार आहेत. महाविकास आघाडीकडून या मोर्चासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. उद्या होणाऱ्या बैठकीनंतर सर्व आमदार खासदारांना याबाबत सूचना देण्यात येणार आहेत. तसेच मोर्चाला पोलीस विभागाची परवानगी मिळावी यासाठी उद्या होणाऱ्या बैठकीनंतर त्याबाबतची कायदेशीर पूर्तता करण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्न करणार आहेत. लोकशाहीत शांततेत निघणाऱ्या मोर्चाला पोलिसांकडून परवानगी दिली पाहिजे. मात्र पोलिसांकडून जर परवानगी मिळाली नाही तरी, महाविकास आघाडीचा हा मोर्चा काढला जाईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष महबूब शेख यांनी दिला आहे.

काँग्रेसकडून 17 तारखेच्या महामोर्चाची तयारी सुरू - तसेच 17 तारखेला होणाऱ्या महाविकास आघाडीच्या मोर्चा बाबत मुंबई काँग्रेसने देखील मुंबईतील नेत्यांची बैठक बोलावली आहे. राज्य सरकारमधील नेत्यांची महापुरुषांबाबत असलेली बेताल वक्तव्य राज्यातून बाहेर जाणारा उद्योग, महाराष्ट्राचा सीमा प्रश्न या सर्व वादांवर एकत्रित रित्या काँग्रेस मैदानात उतरणार आहे. 17 तारखेच्या महामोर्चाला काँग्रेसकडून जास्तीत जास्त कार्यकर्ते नेते यावेत यासाठीच आयोजन या बैठकीत होणार असून, याबाबतची तयारी सुरू झाली असल्याची माहिती काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी दिली आहे.

तीनही पक्षाकडून महत्त्वाच्या नेत्यांवर मोर्चाची जबाबदारी - 17 तारखेला महाविकास आघाडीचा होणारा विराट मोर्चा न भूतो न भविष्य असा असेल असे संकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले होते. मुंबईत ठाकरे गटाची ताकत अधिक आहे. त्यामुळे या मोर्चाला विराट स्वरूप प्राप्त व्हावं याची खास जबाबदारी ठाकरे गटावर आहे. उद्धव ठाकरे यांनी यासाठीची खास जबाबदारी आमदार सचिन अहिर, खासदार अरविंद सावंत, आमदार सुनील प्रभू, आमदार अनिल परब यांच्यावर दिली आहे. या मोर्चातून मुंबईतून प्रत्येक कार्यकर्ता यावा यासाठी विशेष नियोजन केलं जाणार आहे. ठाकरे गटाकडून जवळपास एक लाख कार्यकर्ते मुंबई, राज्यातून आणण्याचा प्रयत्न ठाकरे गटात असणार आहे.

नियोजनात जेष्ठ नेत्यांचे लक्ष - राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षाकडून देखील या मोर्चासाठी जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. या मोर्चाच्या तयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्या सर्व नेत्यांना सूचना देण्यात आलेले आहेत. जयंत पाटील, अजित पवार छगन भुजबळ राष्ट्रवादीचे हे नेते या मोर्चाच्या नियोजनामध्ये लक्ष घालत आहेत. यासोबतच काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मुंबईचे प्रदेशाध्यक्ष भाई जगताप, ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांच्याकडून काँग्रेस कार्यकर्ते नेते, आमदार, खासदार या मोर्चात सामील होतील याबाबतची तयारी सुरू करण्यात आली आहे.

मोर्चाच्या माध्यमातून मुंबई मनपा निवडणुकीची तयारी - मुंबई महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुका या राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या ठरणार आहेत. भारतीय जनता पक्षाने आपली सर्व ताकद मुंबई महानगरपालिका निवडणुका जिंकण्यासाठी आतापासूनच लावली आहे. यासाठी "मुंबईचा जागर" या कार्यक्रमाची सुरुवात भारतीय जनता पक्षाने सुरू केली आहे. 17 तारखेला होणाऱ्या विराट मोर्चाच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे तीनही पक्ष आपली ताकद दाखवतील. अद्याप होऊ घातलेल्या निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवल्या जाणार का? याबाबत स्पष्टता आलेली नाही, मात्र या मोर्चाच्या माध्यमातून तिन्ही पक्ष एकत्र आहेत हा संदेश सत्ताधाऱ्यांना दिला जाणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.