मुंबई- शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सर्व आमदार एकत्र येऊन आज सांताक्रूझ येथील ग्रँड हयात हॉटेल मधील मुख्य हॉलमध्ये शक्ती प्रदर्शन करणार आहे. सध्याकाळी ७ वाजता वरील तिन्ही पक्षाच्या आमदारांकडून शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे.
हॉटेलमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीनही पक्षांचे आमदार आणि समर्थक पक्ष, अपक्ष आमदारही उपस्थित राहणार आहेत. या शक्ती प्रदर्शनात महाआघाडीचे १६२ आमदारांचे एकत्र फोटोसेशन आणि ओळख परेड होणार आहे. राज्यपालांच्या कार्यालयात आम्हाला सत्ता स्थापनेसाठी बोलवावे, असे १६२ आमदारांचे सह्या असलेले पत्र माहाआघाडीने राज्यापालांच्या कार्यालयात दिले होते.
हेही वाचा- विदर्भ पाटबंधारे सिंचन घोटाळ्यातील चौकशीच्या फाईली 'नस्तीबंद'