ETV Bharat / state

मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग; विखे-पाटील कृषीमंत्री होण्याची शक्यता - radhakrushna vikhe patil

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मंत्रीमंडळ विस्ताराच्या हालचाली वाढल्या आहेत. राधाकृष्ण विखे-पाटील यांचे नाव चर्चिले जात असून त्यांची कृषीमंत्रीपदी वर्णी लागणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

मंत्रालय
author img

By

Published : Jun 5, 2019, 8:16 PM IST

मुंबई - गेले अनेक महिने मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा होत आहे. मात्र, आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मंत्रीमंडळ विस्ताराच्या हालचाली वाढल्या आहेत. राधाकृष्ण विखे-पाटील यांचे नाव चर्चिले जात असून त्यांची कृषीमंत्रीपदी वर्णी लागणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय अन्न पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली आहे.

येत्या तीन दिवसांत विखे-पाटील यांचा भाजप प्रवेश होणार असून याच दरम्यान त्यांना मंत्रिपद दिले जाण्याची शक्यता आहे. भाजपच्या अनेक आमदारांना मंत्रिमंडळात संधी मिळेल अशी अशा होती, त्यामुळे गेले अनेक महिने मंत्रिमंडळ विस्ताराकडे इच्छुक आमदारांचे लक्ष लागले होते. नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट लोकसभेवर निवडून गेल्याने हा विभाग रिक्त आहे. तसेच दिवंगत भाजप नेते पांडुरंग फुंडकर यांच्या निधनाने कृषीमंत्री पदाचा अतिरिक्त भार चंद्रकांत पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे.

शिवसेनेकडे आरोग्यमंत्री पद आहे. मात्र, दीपक सावंत यांच्या राजीनाम्यानंतर या विभागाचा अतिरिक्त कार्यभार सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी पक्षांर्तगत कुरबुरी टाळण्यासाठी वारंवार मंत्रिमंडळ विस्तार लांबवला होता. मात्र, आता विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनीच थेट भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचा उचित सन्मान करण्यासाठी तसेच इतर पक्षातून येणाऱ्यांना सकारात्मक संदेश देण्यासाठी विस्तार केला जात असल्याचे भाजपच्या गोटात सांगण्यात येत आहे.

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कालच शिवसेना-भाजपच्या विधानसभा जागावाटपाबाबत तसेच मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अमित शाह यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही शहा यांच्यासोबत चर्चा केली असल्याचे चर्चिले जात आहे. मात्र, या विस्तारात भाजपच्या नेत्यांना संधी मिळणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, विखे-पाटील यांच्या सोबतच राष्ट्रवादीचे नेते आमदार जयदत्त क्षीरसागर यांनीही सत्ताधारी पक्ष शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेच्या कोट्यातील एक मंत्रिपद अजूनही शिल्लक आहे. या मंत्रिपदावर क्षीरसागर यांची वर्णी लागेल का? याबाबत सेनेतही कुजबुज सुरु आहे.

Intro:मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग , विखे पाटील कृषीमंत्री होण्याची शक्यता

मुंबई ५

गेले अनेक महिने मंत्री मंडळ विस्ताराची चर्चा होत आहे . मात्र आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मंत्रीमंडळ विस्ताराच्या हालचाली वाढल्या असून एकीकडे जेष्ठ नेते चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय अन्न पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली आहे . या भेटीत मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा झाली असून यात सर्वात आघाडीवर राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव चर्चिले जात असून त्यांची कृषी मंत्री पदी वर्णी लागणार असल्याची जोरदार चर्चा आहे . येत्या तीन दिवसात विखे पाटील यांचा भाजप प्रवेश होणार असून याच दरम्यान त्यांना मंत्रिपद दिल जाण्याची शक्यता आहे .

भाजपच्या अनेक आमदारांना मंत्रिमंडळात संधी मिळेल अशी अशा होती ,त्यामुळे गेले अनेक महिने मंत्रिमंडळ विस्ताराकडे इच्छुक आमदारांचे लक्ष लागले होते . ऍन आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट लोकसभेवर निवडून गेल्याने हा विभाग हि रिक्त आहे .तसेच दिवंगत भाजप नेते पांडुरंग फुंडकर यांच्या निधनाने कृषी मंत्री पदाचा अतिरिक्त भर चंद्रकांत पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे . शिवसेनेकडे आरोग्यमंत्री पद आहे ,मात्र दीपक सावंत यांच्या राजीनाम्या नंतर याविभागाचा अतिरिक्त कार्यभार ही सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आला आहे . मुख्यमंत्र्यांनी पक्षांर्तगत कुरबुरी टाळण्यासाठी वारंवार विस्तार लांबवला होता . मात्र आता विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीच थेट भाजप मध्ये प्रवेश केल्या नंतर त्यांचा उचित सन्मान करण्यासाठी तसेच इतर पक्षातून येणाऱ्यांना सकारात्मक संदेश देण्यासाठी विस्तार केला जात असल्याचे भाजपच्या गोटात सांगण्यात येतंय . महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कालच शिवसेना -भाजप च्या विधानसभा जागावाटपाबाबत तसेच मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अमित शहा यांच्याशी चर्चा केली होती . त्यांनंतर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही शहा यांच्यासोबत चर्चा केली असल्याचे चर्चिले जात आहे . मात्र या विस्तारात भाजपच्या नेत्यांना संधी मिळणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान विखे पाटील यांच्या सोबतच राष्ट्रवादीचे नेते आमदार जयदत्त क्षीरसागर यांनीही सत्ताधारी पक्ष शिवसेनेत प्रवेश केला आहे . शिवसेनेच्या कोट्यातील एक मंत्रिपद अजूनही शिल्लक आहे .या मंत्रिपदावर क्षीरसागर यांची वर्णी लागेल का ? याबाबत सेनेतही कुजबुज सुरु आहे . Body:....Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.