ETV Bharat / state

'रेल्वेच्या प्रवाशांना तिकीटासोबत मास्क मोफत द्या'

author img

By

Published : Feb 23, 2021, 9:47 PM IST

रेल्वे प्रशासनाने लोकल तिकीटासोबत, प्रवाशांना मास्क देण्याची मागणी महाराष्ट्र रेल्वे महिला प्रवासी संघटनेकडून करण्यात आलेली आहे.

maharashtra women travel association Demands Give masks free for the passengers with train tickets
रेल्वेने प्रवाशांना तिकीटांबरोबर मास्क मोफत द्या, प्रवासी संघटनेची मागणी

मुंबई - विना मास्क प्रवास करणाऱ्या लोकल प्रवाशांवर रेल्वे प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत आहे. तरीसुद्धा अनेक प्रवासी विना मास्क प्रवास करत असल्याचं निदर्शनात येत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने लोकल तिकीटसोबत प्रवाशांना मास्क देण्याची मागणी, महाराष्ट्र रेल्वे महिला प्रवासी संघटनेकडून करण्यात आली आहे.

महाराष्ट्र रेल्वेमहिला प्रवासी संघटनेचे पदाधिकारी माहिती देताना...
रेल्वे प्रवाशांना मोफत मास्क वितरण -
सर्वसामान्य प्रवाशांना मर्यादित वेळेत लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. तेव्हापासून मुंबई आणि उपनगरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे महाराष्ट्र रेल्वे महिला प्रवासी संघटनेकडून विना मास्क प्रवास करणाऱ्या प्रवाशांना निशुल्क मास्क वाटप अभियान सुरू करण्यात आले आहे. प्रत्येक रेल्वे स्थानकावर महाराष्ट्र रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या महिला कार्यकर्ते विना मास्क प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोफत मास्क देत आहेत. तसेच त्या कोरोना विषाणूबद्दल जनजागृती करत आहेत, अशी माहिती महाराष्ट्र रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या अध्यक्षा वंदना सोनवणे यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली.
निवेदनाची दखल घेत नाही-
राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासन यांनी काटेकोरपणे कोविड-19 नियमांची अंमलबजावणी करावी, तसेच रेल्वे स्थानकाच्या एक्झिट पॉईटवर आणि लोकल डब्यात सॅनिटायजर मशीन बसवावी, तसेच सतत लोकल डब्यांना निर्जंतुकीकरण करण्यात यावे. या संबंधित आम्ही रेल्वेला अनेकदा निवेदने दिली आहेत. तरीसुद्धा या निवेदनाची दखल घेतली जात नाही. आता गेल्या काही दिवसापासून कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे विना मास्क प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यात येत आहे. मात्र त्याच प्रवाशांना रेल्वे प्रशासनाने तिकीटासोबतच मास्क द्यावेत. जेणेकरून गोरगरीब प्रवाशांना फायदा होईल, अशी मागणी वंदना सोनवणे यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.