ETV Bharat / state

Maharashtra Weather Update: बळीराजाला मोठा दिलासा; 'या' तारखेपासून मेघगर्जनेसह मान्सून धडकणार- हवामान खात्याचा अंदाज - पावसाची शक्यता

अरबी समुद्रात आलेल्या चक्रीवादळामुळे रखडलेला मान्सून लवकरच महाराष्ट्रात दाखल होणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या तीन दिवसांत ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मान्सून दाखल होईल. उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांसह चातकाप्रमाणे डोळे लावून बसलेल्या बळीराजाला मोठा दिलासा मिळणार आहे.

Maharashtra Weather Update
हवामान खात्याचा अंदाज
author img

By

Published : Jun 22, 2023, 9:13 AM IST

मुंबई : यंदा अर्धा जून महिना संपला तरी मान्सूनचा पत्ता नाही. पाऊस लांबल्याने उकाडा वाढला आहे. मुंबई, पुणे या शहरांत कडाक्याच्या उन्हामुळे अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत. चिडचिडेपणा आणि बेचैनीत वाढ झाली. कोकणात मृग नक्षत्रात बळीराजा भात पेरणी करतात. परंतु, मान्सूनने पाठ फिरवल्याने हताश झालेल्या बळीराजाने मान्सूनच्या आगमनाच्या प्रतिक्षेत आहे. अनेक भागात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. सर्वजण पाऊस केव्हा पडणार, या प्रतिक्षेत आहेत.

लवकरच मान्सून राज्यात : तलावांनी देखील तळ गाठायला सुरुवात केली आहे. त्यात पाऊस उशिरा दाखल होणार असल्यामुळे पेरण्या खोंळबल्या आहेत. मात्र, आता लवकरच मान्सून राज्यात धडकेल आणि जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सर्वत्र दाखल होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. येत्या 23 जूनपासून तळकोकणातील काही भागात मान्सून सक्रीय होईल. मान्सून मेघगर्जनेसह धडकणार असा अंदाज हवामान खात्याने दर्शविला आहे.

हवामान खात्याचा अंदाज : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात देखील पावसाची शक्यता आहे. सातारा, सांगली, नाशिक, अहमदनगर, बीड, नांदेड, जालना, बुलढाणा, सोलापूर, लातूर या जिल्ह्यांत 24 आणि 25 जूनपासून पावसाचा जोर वाढेल. मेघगर्जनेसह मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. भारतीय हवामान शास्त्र पुणे विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला.

उष्णतेच्या झळा, यलो अलर्ट : राज्यात मान्सून लांबल्याने अनेक भागात उष्णतेच्या झळा सोसाव्या लागत आहेत. यवतमाळ, गडचिरोली, वाशिम, अमरावती आणि चंद्रपूर जिल्ह्यांत उष्णतेत वाढ झाली आहे. नागरिकांना उन्हामुळे त्रास सहन करावा लागेल, हवामान खात्याने यामुळे या भागात येलो अलर्ट दिला आहे. नागरिकांनी त्यामुळे घराच्या बाहेर पडताना हवामान खात्याचा अंदाज जाणून घ्यावा. त्यानंतरच घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा :

  1. Monsoon 2023 : हुश्श ! केरळात मान्सून दाखल, विदर्भात पुढील तीन दिवसात पावसाची शक्यता
  2. Monsoon Update : महाराष्ट्रात 'या' तारखेपर्यंत मान्सून होणार दाखल; शेतकऱ्याने पेरणीची घाई करू नये
  3. Maharashtra Weather Update: पुढील आठवडाभर राज्यातील विविध ठिकाणी तुरळक ठिकाणी मेघगर्जन व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता....

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.