मुंबई - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यात अक्षरश: थैमान घातले होते. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात अनेक ठिकाणी कडक निर्बंध लागू केले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. याचमुळे राज्यातील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
काल (शुक्रवारी) मध्यरात्री राज्यसरकारने आदेश काढला. या आदेशात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील रुग्णसंख्या पाहता पाच स्तरांमध्ये अनलॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी 7 जूनपासून राज्यात हे आदेश लागू होणार आहेत.
कशा असणार आहेत स्तर (लेव्हल) ?
- पहिला स्तर - जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी रेट पाच टक्के पेक्षा कमी, तसेच ऑक्सिजन बेड 25 टक्क्यांपेक्षा कमी भरलेले
- दुसरा स्तर - जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के, ऑक्सिजन बेड्स 25 ते 40 टक्क्यांदरम्यान भरलेले
- तिसरा स्तर - जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी रेट 5 ते 10 टक्के असावा, ऑक्सिजन बेड्स हे 40 टक्क्यांपेक्षा जास्त भरलेले
- चौथा स्तर - जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी रेट 10 ते 20 टक्के एवढा, तसेच ऑक्सिजन बेड 60 टक्क्यांच्यावर भरलेले
- पाचवा स्तर - जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी रेट 20 टक्क्यांवर आणि ऑक्सिजन बेड हे 75 टक्क्यांपेक्षा जास्त भरलेले
हेही वाचा - राज्यात नव्या 14 हजार 152 रुग्णांची नोंद