ETV Bharat / state

वाहन चालकांनो सावधान! राज्य सरकारनं उचललं एक मोठं पाऊल

राज्यात गंभीर स्वरुपाचे अपघात घडण्याचे प्रमाण विचारात घेऊन परिवहन विभागाने ड्रिंक अँड ड्राइव्हचा दंड वाढवला आहे. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्यांना 10 हजार रुपये आणि विनापरवाना वाहन चालवणाऱ्यांना 5 हजार रुपयांचा दंड ठोठवण्याचा राज्य सरकारचा विचार आहे.

ड्रिंक अँड ड्राइव्ह
ड्रिंक अँड ड्राइव्ह
author img

By

Published : Jan 20, 2021, 2:33 PM IST

मुंबई - मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्याची संख्या जास्त आहे. त्यामुळे मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणाऱ्यांना चाप बसवण्यासाठी आणि रस्ते अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी राज्य सरकारनं एक मोठं पाऊल उचललं आहे. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्यांना 10 हजार रुपये आणि विनापरवाना वाहन चालवणाऱ्यांना 5 हजार रुपयांचा दंड ठोठवण्याचा राज्य सरकारचा विचार आहे.

राज्यात दिवसेंदिवस रस्ते अपघात वाढत चालले आहेत. हे अपघात रोखण्यासाठी सरकारकडून पावले उचलली जात आहेत. वाहनांच्या वेगावर नियंत्रण असावे, असे वारंवार सांगून सुद्धा त्याकडे वाहनधारक दुर्लक्ष करतात. मद्यधुंद अवस्थेत वाहने चालविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यात गंभीर स्वरुपाचे अपघात घडण्याचे प्रमाण विचारात घेऊन परिवहन विभागाने ड्रिंक अँड ड्राइव्हचा दंड वाढवला आहे.

टॅक्स आणि रिक्षाचे नवे परवाने देणे बंद -

मद्यधुंद गाडी चालकांना 10 हजार तर विना परवाना गाडी चालवणाऱ्यांना 5 हजार रुपये दंड करण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले. तसेच लवकरच टॅक्स आणि रिक्षाचे नवे परवाने देणेही काही काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असेही परब यांनी सांगितलं.

नियम न पाळण्याची मानसिकता -

भारतात होणाऱ्या अपघातांमागील काही महत्वाची कारणे आहेत. त्यात नियमांची पूर्ण माहिती नसणे आणि ते माहिती असतील तर ते पाळण्याची तसदी कुणी घेत नाही. दुचाकी वाहनधारकांना हेल्मेट वापरण्याची सक्ती सर्वोच्च न्यायालयाने केली होती. मात्र, नियम झुगारुन देण्याची किंवा नियम न पाळण्याची मानसिकता अद्याप कायम आहे.

हेही वाचा - तेलंगणा मराठा मंडळाने घेतली मेहबुबनगरच्या मराठमोळ्या जिल्हाधिकाऱ्यांची सदिच्छा भेट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.