मुंबई : आयआयटी मुंबई येथील रसायनशास्त्र अभियांत्रिकी प्रथम वर्षाचे शिक्षण घेणारा दर्शन सोळंखी याने आत्महत्या केली. त्यामुळे उच्च शिक्षण संस्थांमध्ये होणाऱ्या आत्महत्यांच्या संदर्भात शिक्षण वर्तुळात चर्चा सुरू झाली. आयआयटी मुंबईसारख्या अत्यंत प्रगत शिक्षण संस्थेमध्ये या प्रकारच्या घटना घडतात. किंवा कोणत्याही महाविद्यालय किंवा उच्च शिक्षण संस्थेमध्ये अशा घटना या मन हेलावून टाकणाऱ्या आहेत. महाराष्ट्र अशा घटनांमध्ये भारतामध्ये अव्वल आहे. आणि राज्यात तरुणांच्या आत्महत्यांमध्ये 13.5 टक्के इतके प्रमाण आहे. देशामध्ये सर्वाधिक आत्महत्याचे प्रमाण महाराष्ट्रात आहे. त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्राची मान शरमेने खाली जावी अशी ही स्थिती आहे.
गुजरातमध्ये राहणारा दर्शन सोळंखी हा दलित समूहातून आलेला आहे. आई वडील गावी होते. तो वसतिगृहात राहत होता. याआयटी मुंबईमध्ये तो रसायनशास्त्र विषयात प्रथम वर्ष अभियांत्रिकी शिक्षण घेत होता. याआधी त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. दुसऱ्या खेपेस मात्र आत्महत्या झाली. आणि त्याचे जीवन त्याने संपवलं. यासंदर्भात आयआयटी मुंबईमधील विद्यार्थ्यांनी नाव न सांगता प्रतिक्रिया दिली, की त्याला दलित असल्या कारणामुळे छळ सोसावा लागला. तसेच, आयआयटी बॉंम्बेच्या आंबेडकर पेरियर स्टडी सर्कल या विद्यार्थ्यांच्या संघटनेने एक प्राथमिक पाहणी केली. त्यामध्ये देखील त्यांना काही विद्यार्थ्यांनी असे सांगितले की, त्याला दलित समूहातून आलेला असल्यामुळे भेदभावाची वागणूक दिली गेली. त्यामुळे तो तणावाखाली होता. तर काही विद्यार्थ्यांनी तो अभ्यासामुळे आणि इतर अशा अनेक गोष्टींमुळे तणावाखाली होता असे म्हटले आहे.
आयआयटी मुंबई कोरोना महामारीच्या आधी अनिकेत अंभोरे या दलित विद्यार्थ्याने देखील आत्महत्या केली होती. मध्यमवर्गीय कुटुंबातील अनिकेतच्या पालकांनी त्याबाबत पुढे फारच न्यायालयीन खटला लढवला नाही. त्यामुळे ती केस पुढे काय झाले ते समजू शकले नाही. मात्र, चार वर्षात ही दलित विद्यार्थ्याने आत्महत्या करण्याची दुसरी घटना आयआयएटी मुंबईत घडलेली आहे.
केवळ तीन वर्षांमध्ये आयआयटी मुंबई दोन दलित विद्यार्थ्यांनी आत्महत्या करणे हे चिंताजनकच आहे. याबाबत महाराष्ट्रामध्ये स्थिती अशी आहे. की देशामध्ये महाराष्ट्र आत्महत्येच्या बाबतीत प्रथम क्रमांक आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी संस्था नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो यांच्या 2021 मधील अहवालानुसार महाराष्ट्रामध्ये 22 हजार 260 आत्महत्या झालेल्या आहे. त्यानंतर दक्षिण भारतातील तामिळनाडूमध्ये 18,925 म्हणजे दुसरा क्रमांक आणि तिसरा क्रमांक महाराष्ट्राच्या खेटून असलेल्या मध्यप्रदेशचा म्हणजे 14,965 व्यक्तींच्या आत्महत्या झाल्याचे केंद्र शासनाच्या अहवालात नमूद आहे.
फुले शाहू आंबेडकर यांच्या महाराष्ट्रासारख्या प्रगतिशील अशा राज्यामध्ये 2019 ते 2020 या एका वर्षाच्या काळात 13.5 टक्के आत्महत्या नोंदवल्या गेल्या होत्या त्यामुळे महाराष्ट्राचे स्थान भारतामध्ये यामध्ये अव्वल आहे. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे की शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र अग्रेसर राहिलेला आहे. महाराष्ट्र मध्ये शासकीय व अनुदानित तसेच खाजगी विना अनुदानित अशा तिन्ही प्रकारच्या उच्च शिक्षण संस्था आहे .गेल्या 30 वर्षांमध्ये विनाअनुदानित खाजगी उच्च शिक्षण संस्था देखील वेगाने फोफावल्या. आणि त्यामधील बेसुमार फी वाढ ही सुद्धा अनेक विद्यार्थ्यांचं भविष्य अंधकारात ढकलणारी देखील असल्याचं अनेक घटनांमधून समोर आलेले आहे. मात्र आता आत्महत्यांमुळे उच्च शिक्षण संस्था पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आलेल्या आहेत.
यासंदर्भात डॉक्टर सिमरंजीत सिंग बैसस अर्थशास्त्राचे प्राध्यापक जालंदर, पंजाब विद्यापीठातील त्यांचा अभ्यास देखील असं सांगतो की," महाराष्ट्रामध्ये 2004 ते 2013 या काळामध्ये सर्वाधिक आत्महत्या करण्याच्या घटना घडल्या. त्या दहा वर्षाच्या काळामध्ये अशा आत्महत्या च्या घटना एक लाख 53 हजार 104 इतक्या झालेल्या आहे." त्यामुळे मागच्या पाच वर्षाच्या काळामध्ये आत्महत्येच्या घटना जरी कमी झाल्या तरी मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात आत्महत्या होतात हे प्रत्यक्ष आकडेवारीवरून सिद्ध होते.
शिक्षण चळवळीतुन प्रतिक्रिया : यासंदर्भात अखिल भारत शिक्षा अधिकार माणसाचे कार्यकर्ते आणि नेते अक्षय पाठक यांनी ईटीवी भारत सोबत संवाद साधताना सांगितले की, लेखिका सिमरन शर्मा यांनी जानेवारी 2022 मध्ये एक शोध अभ्यास केला होता, त्यांच्या म्हणण्यानुसार नॅशनल क्राइम ब्युरो रेकॉर्ड भारत यांच्या आत्महत्येच्या घटनांमध्ये एकसारखी वाढ होत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्या या 21 टक्क्यांपेक्षा अधिक वाढत आहे. तसेच, या घटनांमध्येही वाढ (2019) या वर्षापासून अधिक झालेली आहे. याचा अर्थ प्रगतिशील महाराष्ट्र हा म्हणायला आहे. मात्र, प्रत्यक्षात उच्च शिक्षणामध्ये जातीच्या नावाने होणारे भेदभाव किंवा आर्थिक स्तरावर होणारे भेदभाव किंवा इतर अभ्यासात मागे पडत असल्यामुळे केला जाणारा भेदभाव, अशा अनेक कारणांनी विद्यार्थी आत्महत्या करतात. हे केंद्र आणि राज्य शासनाने व उच्च शिक्षण संस्थांनी गंभीरपणे मनावर घेऊन त्यावर उपाययोजना शोधल्या पाहिजे असही ते म्हणाले आहेत.
समाजातील समाजशास्त्रज्ञांनी शोधण्याची गरज आहे : पन्नास वर्षापूर्वी आत्महत्येच्या घटना बिलकुल होत नव्हत्या. मात्र, जागतिकीकरणाच्या काळात विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रगत होत आहे. मानव त्याला आपलंसं करत आहे. दुनिया आपल्या मोबाईलमुळे जवळ येतं आहे असे म्हटले जाते. या काळात असा कोणता इतका खोलवर ताण-तणाव किंवा भेदभाव विद्यार्थ्यांना या घटनेपर्यंत ओढून घेऊन जातो. ते खरोखरच समाजातील समाजशास्त्रज्ञांनी शोधण्याची गरज आहे. असे महाराष्ट्र स्टुडंट युनियनचे विकास शिंदे म्हणतात.
हेही वाचा : थोडी जास्त ताकत लावा, विजय पक्का; जिंकल्यानंतर पेढे घेऊन मी परत येतो - खासदार गिरीश बापट