ETV Bharat / state

लसीकरणात महाराष्ट्र अग्रेसर; एकाच दिवशी ४ लाख ६२ हजार नागरिकांना डोस

राज्यात १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरणाला सुरूवात झाली. लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी ३ लाखांहून अधिक जणांना लस देऊन राज्याने उच्चांक गाठला होता.

लसीकरणात महाराष्ट्र अग्रेसर
लसीकरणात महाराष्ट्र अग्रेसर
author img

By

Published : Apr 4, 2021, 1:39 PM IST

मुंबई - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी दुसरीकडे कोविड प्रतिबंधात्मक लसीचा वेग ही वाढला आहे. शनिवारी एकाच दिवशी राज्यात सुमारे ४ लाख ६२ हजार ७३५ नागरिकांनी लस घेतली. दरम्यान, गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश या राज्यांना मागे टाकत महाराष्ट्र लसीकरणात अग्रेसर ठरला आहे. आतापर्यंत सुमारे ७३ लाख ४७ हजार ४२९ जणांनी यावेळी लसीकरण केल्याची माहिती राज्य शासनाने दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत आरोग्य यंत्रणेचे अभिनंदन केले आहे.

हेही वाचा - वाशिममध्ये रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा

राष्ट्रीय विक्रमाची बरोबरी

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्र पहिल्यापासूनच अग्रसेर राहीला आहे. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात लसीकरणाला वेग देण्यासाठी सध्या होत असलेल्या लसीकरणाच्या दुप्पट संख्येने लसीकरण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. यंत्रणेच्या प्रभावी कामगिरीमुळे आणि नागरिकांकडून मिळत असलेल्या प्रतिसादामुळे शनिवारी महाराष्ट्राने राष्ट्रीय विक्रमाची कामगिरी बजावली आहे. अशाच पद्धतीने लसीकरणाला वेग दिल्यास लवकरच राज्यात दिवसाला सहा लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट गाठता येईल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

आत्तापर्यंतची उच्चांक संख्या

राज्यात १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरणाला सुरूवात झाली. लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी ३ लाखांहून अधिक जणांना लस देऊन राज्याने उच्चांक गाठला होता. शनिवारी ३ एप्रिल रोजी राज्यभर ४१०२ लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून आतापर्यंतची सर्वोच्च संख्या पार करीत ४ लाख ६२ हजार जणांना लस देण्यात आली. पुणे जिल्ह्याने राज्यात सर्वाधिक ७६ हजार ५९४ जणांना लसीकरण करून राज्यात अग्रस्थान कायम राखले आहे. त्यापाठोपाठ मुंबई उपनगर (४६ हजार ९३७), नागपूर (४१ हजार ५५६), ठाणे (३३ हजार ४९०) या जिल्ह्यांनी लसीकरणात आघाडी घेतली असल्याची माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली.

हेही वाचा - उद्रेक.. राज्यात शनिवारी कोरोना रुग्णांची संख्या ५० हजाराच्या उंबरठ्यावर, २७७ जणांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.