ETV Bharat / state

Maharashtra Tableau 2022 : यंदा राजपथावर महाराष्ट्राचा चित्ररथ दाखवणार 'जैवविविधता'

भारत हा देश जैवविविधता संपन्न असून महाराष्ट्रातील चार प्रमुख भागांमध्ये जैवविविधता दिसून येते. वातावरणातील होणाऱ्या बदलांचा विचार करता पर्यावरणाच्या संरक्षणासाठी महाराष्ट्र आघाडीवर आहे. याच अनुषंगाने यंदाच्या प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत होणाऱ्या संचलनात ‘महाराष्ट्रातील जैवविविधता मानके’ या विषयावर आधारित चित्ररथ सहभागी होणार आहे.

Maharashtra Tableau 2022
महाराष्ट्राचा चित्ररथ
author img

By

Published : Jan 22, 2022, 7:18 PM IST

मुंबई - प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली ( Republic Day 2022 ) येथे होत असलेल्या संचलनात महाराष्ट्र राज्याचे सादर केलेल्या विविध विषयांमधून यावर्षी महाराष्ट्राची जैवविविधता व मानके या विषयाची केंद्र शासनाकडून निवड करण्यात आली असून महाराष्ट्र राज्यासहित एकूण १२ राज्यांची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक राज्यांच्या चित्ररथांना दरवर्षी ठराविक निकषांच्या आधारे संधी दिली जाते. त्यानुसार महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारा चित्ररथ ( Maharashtra Tableau 2022 ) यंदा राजपथावर पाहायला मिळणार आहे.

महाराष्ट्रातील जैवविविधता मानके -

भारत हा देश जैवविविधता संपन्न असून महाराष्ट्रातील चार प्रमुख भागांमध्ये जैवविविधता दिसून येते. वातावरणातील होणाऱ्या बदलांचा विचार करता पर्यावरणाच्या संरक्षणासाठी महाराष्ट्र आघाडीवर आहे. याच अनुषंगाने यंदाच्या प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत होणाऱ्या संचलनात ‘महाराष्ट्रातील जैवविविधता मानके’ ( Biodiversity in Maharashtra ) या विषयावर आधारित चित्ररथ सहभागी होणार आहे.

चित्ररथाला परवानगी नाकारली नाही -

सद्यस्थितीत राष्ट्रीय रंगशाळा नवी दिल्ली येथे संरक्षण मंत्रालयाच्या देखरेखीखाली चित्ररथाची बांधणी सुरू असून हे काम अंतिम टप्प्यात आहे. महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारल्याबाबत कोणतीही सूचना संरक्षण मंत्रालयाकडून प्राप्त झालेली नाही, असे स्पष्टीकरण सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून दिले गेले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव महाराष्ट्रातील चित्ररथाला परवानगी नाकारली, अशा बातम्या मागील काही दिवसापासून येऊ लागल्या होत्या.

महाराष्ट्रातील जैवविविधता चित्ररथाच्या माध्यमातून -

युनेस्कोने मान्यता दिलेल्या सूचीमध्ये महाराष्ट्रातील ‘कास पठार’चा समावेश आहे. तसेच राज्य शासनाने राज्यातील प्राणी, पक्षी तसेच अन्य जीवांसाठी राष्ट्रीय स्तरावर अभयारण्य राज्य शासनाने राखीव ठेवले आहे. अनेक दुर्मीळ वनस्पती तसेच प्राण्यांच्या प्रजाती या महाराष्ट्रात आढळतात. ‘शेकरू’ हा महाराष्ट्राचा राज्यप्राणी आहे. ‘हरियाल’ हे विशेष असलेले कबुतर राज्यपक्षी म्हणून घोषित करण्यात आले आहे. ‘ब्लू मॉरमॉन’ या विशेष प्रजातीची राज्य फुलपाखरू म्हणून घोषणा करणारे महाराष्ट्र हे प्रथम राज्य आहे. महाराष्ट्रातील हीच जैवविविधता चित्ररथाच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहे. तसेच दुर्मीळ माळढोक पक्षी, महाराष्ट्रात नव्याने सापडलेली खेकड्याची प्रजाती, नव्याने सापडलेला मासा, वाघ, आंबोली झरा, तसेच फ्लेमिंगो, मासा, गिधाड, घुबड पक्ष्यांच्या ४ ते ५ फूट उंचीच्या प्रतिकृती आहेत. तसेच रचनात्मक व सुंदर कलात्मक दृष्टिकोन ग्राह्य धरून अनेक जैवविविधता दिसतील, असे देखावे तयार केले आहेत.

या चित्ररथाची संकल्पना, सांस्कृतिक कार्य संचालनालयाची असून त्यावर अनेक कलाकार काम करीत आहेत. महाराष्ट्रातील वैविध्यपूर्ण जैव वारसा कवितेच्या व मधुर संगिताच्या रूपात मांडण्यात आलेला आहे.

असा आहे चित्ररथ -

  1. दर्शनी बाजूस भव्य ‘ब्लू मॉरमॉन’ फुलपाखराची ८ फूट उंचीची देखणी प्रतिकृती
  2. दीड फूट दर्शविणारे राज्यफूल ‘ताम्हण’ याचे अनेक गुच्छ आणि त्यावर इतर छोट्या फुलपाखरांच्या प्रतिमा
  3. १५ फूट भव्य असा ‘शेकरू’ राज्यप्राणी
  4. कास पठाराची प्रतिमा
  5. दर्शनी भागात कास पठारावर आढळणारा सरडा ‘सुपारबा’ ३ फूट उंच, त्यामागे राज्यपक्षी हरियालची प्रतिमा
  6. चित्ररथाच्या अंतिम भागात वृक्षाच्या फांदीवर बसलेल्या राज्यप्राणी शेकरूची प्रतिमा व त्यामागे सुमारे १४ ते १५ फूट उंचीपर्यंत राज्यवृक्ष आंबा वृक्षाची प्रतिमा

हेही वाचा - Jayant Patil : विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीत घोडेबाजार करता येणार नसल्याचे भाजपला दु:ख : जयंत पाटील

महाराष्ट्राचा चित्ररथ दरवर्षी ठरतो आकर्षणाचा केंद्र -

प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजपथावर होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ दरवर्षी आकर्षणाचा विषय असतो. २०१५ पासून दोन वेळा महाराष्ट्राच्या चित्ररथांना सर्वोत्तम चित्ररथ म्हणून पहिले पारितोषिक मिळाले आहे. २०१५ मध्ये ‘पंढरीची वारी’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ साकारण्यात आला होता, तर २०१८ मध्ये ‘शिवराज्याभिषेक’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ तयार करण्यात आला होता. या दोन्ही चित्ररथांना प्रथम क्रमांक मिळाला होता.

याशिवाय १९८० मध्येही ‘शिवराज्याभिषेक’ याच संकल्पेनेवर आधारित चित्ररथाने बाजी मारली होती. तर १८८३ साली ‘बैलपोळा’ आणि १९९३ ते १९९५ सलग तीन वर्षे अनुक्रमे गणेशोत्सव, शताब्दी, हापूस आंबे आणि बापू स्मृती या चित्ररथांना प्रथम क्रमांकाने गौरवण्यात आले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.