ETV Bharat / state

राज्यात 15 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवला, असे असतील पॉझिटीव्हीटी रेटनुसार नवीन नियम - महाराष्ट्र लॉकडाऊन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्रातील लॉकडाऊनचे नियम आणखी 15 दिवसांसाठी कायम करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यानुसार, कोरोना पॉझिटीव्हीटी दर 10 टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या जिल्हे व पालिकांसाठी नियम आणि पॉझिटीव्हीटी दर 20 टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या जिल्हे व पालिकांसाठीचे नियम जाहीर करण्यात आले आहेत.

mumbai
मुंबई
author img

By

Published : May 31, 2021, 12:10 AM IST

Updated : May 31, 2021, 1:24 PM IST

मुंबई - 'ब्रेक द चेन'चे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार लागू केले जाणार आहेत. १५ जून 2021 रोजीच्या सकाळी ७ वाजेपर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात आले आहेत. २९ मे २०२१ रोजीच्या आठवड्याच्या शेवटी असलेला पॉझिटिव्हीटी दर, आकडेवारी आणि तेथील ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता यासाठी गृहीत धरली जाईल.

पालिका स्वतंत्र प्रशासकीय घटक असतील

२०११ च्या जणगणनेनुसार, 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व महानगरपालिका जसे की, बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, औरंगाबाद, नाशिक यांना कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून समजण्यात येईल. या पालिकांच्या क्षेत्रांव्यतिरिक्तचा जिल्ह्यातील उर्वरित भाग हा वेगळा प्रशासकीय घटक राहिल.

पॉझिटीव्हीटी दर 10 टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या जिल्हे व पालिकांसाठी नियम

ज्या पालिका किंवा जिल्हा क्षेत्रात कोविड पॉझिटीव्हीटी दर 10 टक्के किंवा त्यापेक्षा कमी असेल. जेथे एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स 40 टक्क्यांपेक्षा कमी असतील. तेथे (१२ मे २०२१ रोजीच्या ब्रेक द चेन आदेशाप्रमाणे) काही निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.

  • सर्व आवश्यक वस्तू व सेवांची दुकाने, जी संध्यासकाळी ७ ते ११ या वेळेत सुरु आहेत, ती सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरु ठेवता येतील.
  • सर्व आवश्यक गटात नसलेल्या इतर दुकानांना उघडणे आणि त्यांच्या वेळा (केवळ एकल दुकाने. मॉल्स किंवा शॉपिंग सेन्टर्स नव्हे) याबाबतीत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्णय घेईल. मात्र, आवश्यक गटातील दुकानांच्या वेळेप्रमाणेच त्यांच्या वेळा असतील. तसेच शनिवार, रविवार ती दुकाने बंद राहतील.
  • अशा भागात आवश्यक वस्तूंच्या जोडीने आवश्यक नसलेल्या वस्तू देखील ई कॉमर्स माध्यमातून वितरीत करता येतील. दुपारी ३ नंतर मात्र वैद्यकीय किंवा इतर आणीबाणीच्या प्रसंगांव्यतिरिक्त येण्या-जाण्यावर निर्बंध असतील.
  • कोरोना विषयक कामे करणाऱ्या कार्यालयांव्यतिरिक्त इतर सर्व शासकीय कार्यालये २५ टक्के कर्मचारी उपस्थितीनिशी सुरु राहतील. संबंधित विभाग प्रमुखास यापेक्षाही जादा उपस्थिती हवी असेल तर त्या भागातील आपत्ती व्यवस्थापन अधिकारी त्यास परवानगी देतील.
  • कृषिविषयक दुकाने आठवड्याच्या कामाच्या दिवशी दुपारी २ वाजेपर्यंत सुरु राहतील. येणारा पावसाळा व पेरणीच्या तयारीसाठी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन अधिकारी या दुकानांच्या वेळा वाढवू शकतील. तसेच शनिवार, रविवारी अशी दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी देऊ शकतील.

पॉझिटीव्हीटी दर 20 टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या जिल्हे व पालिकांसाठी नियम

ज्या पालिका किंवा जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्हीटी दर 20 टक्क्यांपेक्षा जास्त असेल. तसेच, एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स 75 टक्क्यांपेक्षा जास्त असतील. तेथे (१२ मे २०२१ रोजीच्या ब्रेक द चेन) काही निर्बंध वाढविण्यात आले आहेत.

  • अशा जिल्ह्यांच्या सीमा पूर्णपणे बंद करण्यात येतील. कोणत्याही व्यक्तीला जिल्ह्यातून बाहेर जाण्यास वा प्रवेश करण्यास परवानगी राहणार नाही. केवळ कुटुंबातील मृत्यू, वैद्यकीय कारण आणि आवश्यक, आणीबाणीच्या कोविड प्रसंगीची सेवा देणाऱ्या व्यक्तींचा अपवाद असेल.
  • उपरोक्त प्रशासकीय घटकांमध्ये न येणाऱ्या इतर सर्व जिल्हे व पालिकांच्या ठिकाणी ब्रेक द चेनचे निर्बंध नेहमीप्रमाणे लागू राहतील.
  • दुकानांना पुरवठा केल्या जाणाऱ्या वस्तूंच्या वाहतुकीवर निर्बंध नसतील. मात्र, दुकानांना ठरवून दिलेल्या वेळेनंतर ग्राहकांना विक्री करता येणार नाही. या नियमांचा भंग केल्यास कोरोना साथ जोपर्यंत संपत नाही, तोपर्यंत दुकाने बंद ठेवण्याची कारवाई केली जाईल. तसेच दंडही आकारण्यात येईल. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी निश्चित केलेल्या वेळेनुसार होम डिलिव्हरी सुरूच राहतील.

'ब्रेक दि चेन' चे आदेश

  • कोणत्याही वाहनातून महाराष्ट्र राज्यामध्ये दाखल होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे RT-PCR निगेटिव्ह चाचणी अहवाल असणे अनिवार्य आहे. हा अहवाल राज्यामध्ये प्रवेश करण्याच्या जास्तीत जास्त 48 तास अगोदर केलेल्या चाचणीचा असावा.
  • यापूर्वी 18 एप्रिल आणि 1 मे 2021 रोजी जाहीर केलेल्या निर्बंधांमध्ये महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या संवेदनशील भागातील व्यक्तींसाठी असलेले नियम आता देशाच्या कोणत्याही भागातून महाराष्ट्रामध्ये दाखल होणाऱ्या व्यक्तींसाठी लागू राहतील.
  • मालवाहतूक करणाऱ्या एका वाहनांमध्ये फक्त दोन व्यक्ती (चालक आणि क्लिनर/हेल्पर) यांना प्रवास करण्याची मुभा असेल. जर हे मालवाहक वाहन महाराष्ट्राच्या बाहेरून येत असेल तर त्यातील दोघांना RT-PCR निगेटिव्ह चाचणी अहवाल द्यावा लागेल. हा अहवाल राज्यात दाखल होण्याच्या जास्तीत जास्त 48 तासापूर्वीचा असावा. हा अहवाल 7 दिवसांकरिता वैध राहिल.
  • स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासन (डीएमए) हे ग्रामीण बाजारपेठ आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कामावर नियंत्रण ठेवतील. कोरोना निर्बंधांचे काटेकोर पालन केले जात आहे की नाही? यावर लक्ष ठेवतील.
  • जर ‘डीएमए’ला असे आढळले की, अशा काही ठिकाणी शिस्तीचे पालन होत नाही, तर त्या ठिकाणच्या ग्रामीण बाजारपेठा आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कामकाज बंद करण्याचा निर्णय किंवा अधिक निर्बंध लावण्याचा निर्णय त्यांना घेतला जाईल.
  • दुध संकलन, दुधाची वाहतूक आणि प्रक्रिया हे सर्व कोणत्याही निर्बंधांशिवाय चालू ठेवता येईल. परंतु, लागू असलेल्या सर्व निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करून आवश्यक वस्तू विक्रीसाठीची परवानगी असलेल्या दुकानांसाठी किरकोळ दुध विक्रीला मुभा असेल किंवा ते ‘होम डिलिव्हरी’ करू शकतील.
  • कोविड-19 व्यवस्थापनाच्या कामासाठी औषधी आणि इतर साहित्यांची मालवाहतूक करण्याच्या कामात सहभागी असलेल्या विमानतळ आणि बंदर सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल, मोनो आणि मेट्रो रेल्वेने प्रवास करण्याची मुभा असेल.
  • स्थानिक डीएमए आपल्या अखत्यारीतील विशेष भागांमध्ये अधिक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेऊ शकतात. परंतु याची कल्पना राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला (एसडीएमए) द्यावी लागेल. हे निर्बंध लागू करण्याच्या 48 तास अगोदर त्याची जाहीर घोषणा त्यांना करावी लागेल.

हेही वाचा - राज्यातील लॉकडाऊनमध्ये 15 दिवसांची वाढ; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

Last Updated : May 31, 2021, 1:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.