मुंबई Sanjay Raut vs Nitesh Rane : शिवसेना ( ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी मुंब्रा येथील शिंदे गटाने कब्जा केलेल्या शाखेला भेट दिली. यावरून मुख्यमंत्री शिंदे यांनी फुसके बार येऊन गेल्याचा टोला लगावला होता. याला आता खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय. मात्र यावेळी संजय राऊत यांनी खालच्या पातळीवर टीका केलीय. तर यावर भाजपा आमदार नितेश रांनीही खासदार राऊत यांना त्याच भाषेत प्रत्युत्तर दिलंय.
शिंदेंना मुख्यमंत्री पदावर बसवलं गेलंय : मुंबईत आपल्या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या टीकेला उत्तर देताना खासदार संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्री आहेत. नाही तर त्यांची औकात काय? त्यांना राज्याच्या मुख्यमंत्री पदावर बसवलं गेलंय. शिवसेना तोडणं हे भाजपचं फार जुनं स्वप्न आहे. पण, ते काही केल्या पूर्ण होत नाही. ईडी, सीबीआयच्या माध्यमातून काही लोकं तोडून शिंदे सरकार बनवलं. जे गेले त्यांना जाऊ द्या. आता आमच्याच लोकांना आमने-सामने करून मराठी लोकांमध्ये फूट पाडण्याचं भाजपचं काम सुरू आहे. हे आता प्रत्येक राज्यात सुरू आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नसते आणि दिवाळी नसती तर ती शाखा आम्हीच काबीज केली असती," असंही राऊत म्हणाले.
राऊतांची खालच्या पातळीवर टिका : आगामी निवडणुकीत शिंदे आणि अजित पवार गटातील काही आमदार हे भाजपामध्ये जातील, अशी भविष्यवाणी आमदार रोहित पवार यांनी केली. यावर बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, ते आत्ताच भाजपामध्ये गेले आहेत. त्यांचे अंतर्वस्त्र पाहिलं तर त्याच्यावर कमळच आहे. त्यांच्या फुल पॅन्टमध्ये खाकी हाफ चड्डी आहे. ती आत्ताच घालायला सुरवात केली आहे. आतमध्ये कमळाची अंडरवेअर आहे. तुम्ही कधी गेला तर त्या ठिकाणी त्यांना विचारा. दाखवा काय आहे ते? त्याशिवाय ते मुख्यमंत्री पदावरती राहू शकत नाही. आत्ताच ते गुलाम झाले आहेत. गुलामाना स्वतःचं मत आणि स्वाभिमान नसतो, अशा खालच्या शब्दांत संजय राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंवर टिका केलीय.
नितेश राणेंचं प्रत्युत्तर : भाजप आमदार नितेश राणे म्हणाले की, "मुख्यमंत्री कुणाची अंतर्वस्त्र घालत आहेत ते तपासायला हवं, असं राऊत म्हणाले. राज्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल अशी अश्लील भाषा बोलताना तुम्हाला लाज वाटली नाही. तुमच्या अंतर्वस्त्रावर नेमका कुणाचा बिल्ला लागलाय. मशाल चिन्ह आहे, घड्याळ आहे की हाताचा पंजा आहे?" असा सवाल त्यांनी राऊतांना केलाय. पुढं बोलताना नितेश राणे म्हणाले की, "संजय राजाराम राऊत यांना थोडी आठवण करून देईन, राज साहेबांनी जेव्हा शिवसेना सोडली. तेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यांनी तुमची गाडी का फोडली? ठाकरे घराण्यात ज्या काही काड्या आणि भांडण लावत होता, त्यामुळं तुम्हाला फिरायला दिलं नाही. पवार घराण्यामध्ये तुम्ही काय काड्या लावल्यात, काय काय तमाशा केलात? ही माहिती महाराष्ट्राला दिली तर कुणी तुम्हाला घरातदेखील उभं करणार नाही, असे गंभीर आरोप नितेश राणेंनी राऊत यांच्यावर केले आहेत.
हेही वाचा :
- Sanjay Raut On CM : मुंब्र्यात विरोधकांच्या छातीवर पाय देऊन समाचार घेणार; संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल
- Sanjay Raut News : '31 डिसेंबरनंतर दूध का दूध, पाणी का पाणी होणार', मुंब्रा शाखेवरून संजय राऊतांचा इशारा
- Shinde Group Criticizes Sanjay Raut : संजय राऊत विकृती, शिंदे गटाचा राऊतांवर हल्लाबोल