ETV Bharat / state

Sharad Pawar Meeting : राज्याच्या इतिहासात असा मुख्यमंत्री पाहिला नाही - शरद पवार

शरद पवार यांनी वाय बी चव्हाण सेंटरला राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला राष्ट्रवादीच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांनी व्हीप जारी केला आहे. दुसरीकडे अजित पवार यांनीही मुंबईत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली असून सगळ्या आमदारांना नोटीस बाजावण्यात आली आहे.

Maharashtra Political Crisis
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Jul 5, 2023, 8:09 AM IST

Updated : Jul 5, 2023, 4:18 PM IST

मुंबई : शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने मंगळवारी सर्व आमदारांना व्हीप जारी करून बुधवारी महत्त्वाच्या बैठकीला उपस्थित राहण्यास बजावले आहे. तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील प्रतिस्पर्धी गटानेही स्वतंत्र बैठक बोलावली आहे. अजित पवार यांच्या बंडखोर आमदारांची मुंबईत बैठक पार पडणार आहे. शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख, शरद पवार यांचे विश्वास सहकारी श्रीनिवास पाटील, राजेंद्र शिंगणे, प्राजक्त तणपुरे हे देखील वाय बी सेंटरला पोहोचले आहेत. तर आमदार रोहीत पवार यांनी यावेळी ईव्हीएम मशीनवरुन भाजपवर हल्लाबोल केला आहे. वाय बी सेंट्रला सध्या अकरा आमदार पोहोचल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शरद पवार वाय बी सेंटरला पोहोचले आहेत.

  • #WATCH | NCP chief Sharad Pawar arrives at YB Chavan in Mumbai. Sharad Pawar's NCP and other party leaders display a show of strength as they gather at YB Chavan in Mumbai.

    (Source: NCP (Sharad Pawar faction) pic.twitter.com/xdJN20Lmfw

    — ANI (@ANI) July 5, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

शरद पवारांचा फोटो का वापरला, जितेंद्र आव्हाडांचा आक्षेप : शरद पवार यांनी अजित पवार यांच्या गटाने आपला फोटो वापरु नये, अशी तंबी दिली आहे. मात्र त्यानंतरही अजित पवार गटाच्या बॅनरवर शरद पवार यांचा फोटो वापरण्यात आला आहे. मात्र हा फोटो वापरण्यावरुन जितेंद्र आव्हाड यांनी हल्लाबोल करण्यात आला. शरद पवार हे त्यांची प्रॉपर्टी आहे का असेही जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीसाठी जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांच्यासह ठाणे शहर, कळवा, मुंब्रा, वागळे इस्टेट आदी भागातून सुमारे ९१ बसगाड्यांमधून हजारो कार्यकर्ते रवाना झाले आहेत.

रोहीत पवारांचा ईव्हीएमवर हल्लाबोल : भाजपने आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या जास्तीत जास्त जागा येण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळेच भाजपने अगोदर शिवसेना फोडील आहे. त्यानंतर आता पुन्हा भाजपने राष्ट्रवादी फोडली आहे. कर्नाटकमध्ये भाजप हरली आहे. तसेच हरियाणाआणि पंजाबमध्ये होणार असल्याचे दिसून येणार आहे. मात्र महाराष्ट्रातील काही अधिकाऱ्यांनी सध्या ईव्हीएम दुरुस्ती करण्यासाठी सूचना दिल्याचा दावा रोहीत पवार यांनी केला. त्यामुळे आगामी डिसेंबर महिन्यात निवडणूक लागण्याची शक्यता रोहीत पवार यांनी वर्तवली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी जारी केला व्हीप : शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची आज वाय बी सेंटर येथील कार्यालयात बैठक आयोजित केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी हा व्हिप जारी करत आमदारांना उपस्थित राहण्याबाबतची तंबी दिली आहे. शरद पवार यांनी 5 जुलै रोजी वाय बी चव्हाण सेंटर येथे दुपारी 1 वाजता बैठक बोलावली असून, सर्व आमदारांची उपस्थिती अनिवार्य असल्याचे या व्हिपमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

  • #WATCH | Sharad Pawar loyalists raise slogans in his support as leaders of his faction of NCP arrive at YB Chavan Centre in Mumbai, for the party's meeting. pic.twitter.com/MRGaSFPu5E

अजित पवार गटानेही बजावली नोटीस : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंड करत सरकरामध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. मात्र राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांना व्हिप म्हणून नियुक्त केले आहे. तर अजित पवार गटानेही सुनिल तटकरे यांच्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देत आपला सवता सुभा स्थापन केला आहे. शिवाजीराव गर्जे यांनी नोटीस बजावून पदाधिकाऱ्यांना बैठकीला उपस्थित राहण्यास सांगितले आहे. बुधवारी सकाळी मुंबई उपनगरातील वांद्रे येथील एमईटी संस्थेच्या आवारात अजित पवार यांच्या गटाची बैठक होणार आहे.

जयंत पाटील, जितेंद्र आव्हाडांना अपात्र ठरवण्याची मागणी : अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर आज दोन्ही गटाची मुंबईत बैठक होत आहे. या बैठकीसाठी शरद पवार यांच्या गटाकडून जितेंद्र आव्हाड यांनी व्हीप बजावला आहे. मात्र अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांना अपात्र ठरवण्यासाठी विधानसभा अध्यक्षांकडे पत्र दिले आहे.

  • #WATCH | Former Maharashtra HM & NCP (Sharad Pawar faction) leader Anil Deshmukh, says "We will see a huge number of supporters joining Sharad Pawar when he will go out of Maharashtra" pic.twitter.com/jUXaix2cbh

प्रफुल्ल पटेल यांनी घेतली अजित पवारांची भेट : शरद पवार यांनी पक्षातून हकालपट्टी केलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी सोमवारी अजित पवार यांची काल रात्री उशीरा भेट घेतली. त्यामुळे आजच्या बैठकीत नेमके काय होणार याची रुपरेषा अजित पवार यांनी ठरवली असल्याचे राजकीय तज्ज्ञ कयास लावत आहेत. रविवारी मंत्रिपदाची शपथ घेणारे अनिल भाईदास पाटील हे अजित पवार गटाचे व्हीप राहणार आहेत. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे याचिका दाखल केली आहे. या याचिकेत त्यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या इतर आठ आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे. सध्या महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे 53 आमदार असून कोणत्या गटाकडे नेमके किती आमदार आहेत, हे आज स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा -

  1. Maharashtra Political Crisis Updates: शरद पवार व अजित पवारांच्या दोन ठिकाणी होणार बैठका, कुणाकडे किती आमदार आज होणार स्पष्ट
  2. Maharashtra Political Crisis : शरद पवार भेटीत काय बोलले? अमोल कोल्हेंनी खासदारकीचा राजीनामा द्यायचा निर्णय केला रद्द

Last Updated : Jul 5, 2023, 4:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.