मुंबई: महाराष्ट्रातील घडामोडींना वेग आला आहे. शिंदेंच्या बंडात सामिल होत असलेल्या आमदारांची संख्या वाढत आहे. उध्दव ठाकरे यांनी केलेल्या भावणीक आवाहनाचा फारसा परीणाम झालेला दिसत नाही. यातच शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा आम्ही फ्लोअर टेस्टला सामोरे जाण्यास तयार असल्याचे सांगत अजुनही अनेक आमदार वापस येतील आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत असा आशावाद व्यक्त केला आहे. यात राष्ट्रवादी काॅंग्रेसने आम्ही शिवसेना आणि उध्दव ठाकरे यांच्या पुर्ण पाठीशी असल्याचे सांगितल्यामुळे घडामोडी कोणते वळण घेणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. शरद पवार आणि उध्दव ठाकरे नवा चमत्कार करत शिंदेंचे बंड थंड करु शकतात का याकडेही राज्याचे लक्ष लागले आहे.
उद्धव ठाकरे यांना आवश्यक ती मदत करण्याची राष्ट्रवादीची भूमिका आहे. येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर गेलेले शिवसेनेचे विधानसभेचे आमदार परत येतील, असा असा आम्हाला विश्वास आहे. आमदार आल्यावर चित्र अधिक स्पष्ट होईल. महाविकास आघाडीचे नेतृत्व उद्धव ठाकरे करत असल्यामुळे त्यांना पूर्णपणाने या महाविकास आघाडीचे नेतृत्व करण्यासाठी आमचा यापूर्वी पाठिंबा आहे आणि आताही त्याला पूर्ण पाठिंबा राहणार असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस सरकार वाचवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करेल, असे सुचक विधानही त्यांनी केले आहे. तर शरद पवार यांनी उध्दव ठाकरे यांना संघर्षाची तयारी ठेवा आणि कणखर भूमिका घ्या असा सल्ला दिला आहे.
तर दुसरीकडे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे की, शिवसेना हा स्वतंत्र पक्ष आहे . केंद्रीय तपास यंत्रणांच्या दबावाला बळी पडून जर काही आमदार पळाले असतील तर ते म्हणजे शिवसेना नाहीत. खरी शिवसेना ही रस्त्यावर आहे. ज्यांनी संघर्ष केला आहे. हा पक्ष उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मजबूत आहे. अजून देखील आम्ही या सर्वांच्या संपर्कात आहोत. त्यांच्याशी बोलतोय . तिकडचे काहीजण आम्हाला सांगतायत आम्हाला इकडे जबरदस्तीनं आणण्यात आलंय. दोन बंडखोर परत आले आहेत. येणाऱ्या काळात गेलेले शिवसेनेचे विधानसभेचे आमदार परत येतील, असा आम्हाला विश्वास आहे. विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याची तयारी असल्याचेही त्यांनी म्हणले आहे.
गुवाहाटी येथे बंडखोर आमदारांची संख्या दररोज वाढत आहे. तीकडे वाढणाऱ्या संख्येने शिवसेनेची डोकेदुखी वाढवली आहे. तर राष्ट्रवादी आणि काॅग्रेस या सगळ्या परस्थितीत शिवसेने सोबत आहेत. संजय राऊतांची विधाने विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याची तयारी, राष्ट्रवादी काॅंग्रेसने पुर्ण साथ देण्याची केलेली घोषना शरद पवार यांनी उध्दव ठाकरे यांना दिलेला धीर आणि सुचक सल्ला. महाराष्ट्राच्या राजकारणात चमत्कार घडवेल का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तसा काही प्रयत्न सुरु असेल तर शिंदेंच्या बंडाचे नेमके काय होणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.
हेही वाचा : Maharashtra Political Crisis : 'त्या' आमदारांनी पुन्हा निवडून येऊन दाखवावं, संजय राऊत यांचा इशारा