ETV Bharat / state

Maharashtra Political Crisis : शरद पवार पक्षाचे अध्यक्ष तर पटेल-तटकरेंवरील कारवाई मान्य आहे का, जितेंद्र आव्हाडांची रोखठोक सवाल - Sharad Pawar

अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेला जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले आहे. 'तुम्ही शरद पवार यांना अध्यक्ष मानता तर त्यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचे केलेले निलंबन मान्य करणार का?', असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला.

Jitendra Awhad
जितेंद्र आव्हाड
author img

By

Published : Jul 3, 2023, 9:26 PM IST

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी जयंत पाटलांच्या जागी सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केल्याची घोषणा केली. तसेच त्यांनी पक्षाच्या इतर नव्या नियुक्त्यादेखील यावेळी जाहीर केल्या. आता त्यांच्या या कृतीला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले आहे.

'पदांच्या वाटपाला कायदेशीर मान्यता होती का?' : जितेंद्र आव्हाड म्हणाले की, 'आताच काही जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध पदांचे वाटप केले. पण त्यांच्या या वाटपाला कायदेशीर आणि संविधानिक मान्यता होती का?' ते पुढे म्हणाले की, 'शरद पवार यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना निलंबित केलं आहे. ते पक्षाचे अध्यक्ष आहे. त्यांना अध्यक्षांनी कायदेशीररित्या निलंबित केले आहे. त्यामुळे इतर कोणाला नेमणुका करण्याचा अधिकार नाही'. शरद पवार हे पक्षाचे अध्यक्ष आहेत, असं तुम्ही म्हणत आहेत. तुम्ही त्यांना अध्यक्ष मानता तर त्यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचे केलेले निलंबन मान्य करणार का?, असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला.

'व्हीपची नियुक्ती फक्त राजकीय पक्ष करु शकतो' : जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले, 'सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये म्हटलं आहे की व्हीपची नियुक्ती हे फक्त राजकीय पक्ष करु शकतो. राजकीय पक्ष आणि विधीमंडळ पक्ष वेगळे आहेत. निवडून आलेल्या 40 आमदारांचा पक्ष होत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातून स्पष्ट झाले आहे'. त्यांनी पुढे दावा केला की, 'विधानसभेतला एक गट बाहेर जाऊन तो पक्ष असल्याचा दावा करतो. मात्र त्या गटाला तसा अधिकारच नाही. त्या गटाला मर्ज होण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

'पक्षाचे संविधान शरद पवारांकडे आहे' : आव्हाड पुढे म्हणाले की, तुमची संख्या कितीही असली तरी तुम्हाला पक्ष म्हणून मान्यता देता येणार नाही. तुमच्याकडे 40 आमदार असले तरी त्या आमदारांच्या जीवावर तुम्ही पक्ष ठरवू शकत नाही. पक्षाची खरी ताकद कार्यकर्ते असतात. पक्ष हा संविधानाने चालत असतो. आणि निवडणूक आयोगाने मान्यता दिलेले पक्षाचे संविधान हे शरद पवारांकडे असल्याचे जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले.

हेही वाचा :

  1. Maharashtra Political Crisis : अजित पवारांनी प्रदेशाध्यक्ष बदलला, म्हणाले, 'राष्ट्रीय अध्यक्ष...'
  2. Maharashtra Political Crisis : 'ज्यांना भ्रष्टाचारी म्हटले त्यांनाच...', राष्ट्रवादीतील बंडावर देशभरातील नेत्यांच्या प्रतिक्रिया
  3. Maharashtra Political Crisis : प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंवर कारवाई करा, सुप्रिया सुळेंचे शरद पवारांना पत्र

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.