ETV Bharat / state

Maharashtra Monsoon session 2023 Updates: सावित्रीबाई फुले यांच्यावरील वादग्रस्त विधान करणाऱ्यांवर कारवाई करा, विरोधकांचा सभात्याग - Pavsali Adhiveshan २०२३

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातील दुसऱ्या आठवड्यातही विरोधी पक्षनेत्याची निवड झाली आहे. विरोधी पक्षांनी आक्रमकपणे विविध मुद्द्यांवर सत्ताधारी पक्षाला घेरले आहे.

Maharashtra Monsoon session 2023 Update
विरोधी पक्ष आज कोणत्या मुद्द्यांवरून रान उठविणार
author img

By

Published : Jul 27, 2023, 10:58 AM IST

Updated : Jul 27, 2023, 12:53 PM IST

मुंबई: विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात महिलांची सुरक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न व कामगारांचे प्रश्न आदी प्रश्न चर्चेला आले आहेत. विरोधी पक्ष आज कोणत्या मुद्द्यांवरून रान उठविणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Live Updates-

  • क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबाबत अत्यंत चुकीचे लिखाण करणारा अजूनही मोकाट आहे. सरकारने असे विकृत लिखाण करणाऱ्या गुन्हेगाराला मुसक्या बांधून आणले पाहिजे आणि रस्त्यावरून फिरवले पाहिजे, सरकार हे कधी करणार आहे? असा संतप्त सवाल काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी सभागृहात उपस्थित केला. यासंदर्भात सरकार संबंधित ट्विटर हँडल वापरणाऱ्या व्यक्ती विरोधात कारवाई करत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. मात्र सरकारच्या उत्तराने समाधान न झालेल्या विरोधकांनी सभात्याग केला.
  • पावसाळी अधिवेशन कालावधी संदर्भात आज कामकाज सल्लागार समिती बैठक असल्याचा समजत आहे. अधिवेशन कालावधी आधी ठरल्याप्रमाणे पूर्ण केला पाहिजे. कारण अनेक प्रश्न प्रलंबित असल्याचे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. राज्यात पाऊस पडतो हे खरे जरी असले तरी राज्यातील काही भागात पाऊस नाही. काही ठिकाणी जास्त पाऊस आहे. तर काही ठिकाणी कमी पाऊस आहे
  • विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातील चौथ्या दिवशी विरोधक आक्रमक झाले आहेत. धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात आंदोलन करत विरोधकांनी विधानभवनाच्या विधान भवनाच्या पायऱ्यावर निदर्शने केली आहेत.

बुधवारी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात काय झाले?

  • मुंबईतील विविध प्रकल्प बाधितांसाठी राज्य सरकारच्या वतीने आणि महानगरपालिकेच्या वतीने आगामी काळात पंधरा हजार घरे बांधण्यात येत असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली आमदार विद्या ठाकूर यांनी विचारलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना ते बोलत होते. आमदार वर्षा गायकवाड यांनी महानगरपालिका एसआरए आणि राज्य सरकार यांच्यात समन्वय नसल्याचे सातत्याने दिसून आल्याचे निदर्शनास आणून दिले. हा समन्वय साधण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात यावी अशी मागणी केली तसेच या प्रकल्पांसाठी नेमण्यात आलेल्या अधिकाऱ्यांनी अनेक वेळा ताबा घेतल्याचे दिसत नाही. त्यांनी आपल्या पदाचा ताबा घ्यावा यासाठी त्यांना बाध्य करण्यात यावे अन्यथा त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी ही गायकवाड यांनी यावेळी केली.
  • या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, ज्या अधिकाऱ्यांनी नियुक्तीपत्रे मिळूनही अद्याप ताबा घेतला नाही त्यांना ताबडतोब ताबा घेण्यास सांगितले जाईल. जे घेणार नाही त्यांच्यावर कारवाई केली जाईल. तसेच विकासकांनी जर काही गाळे विकले गेल्याची तक्रारी समोर आले असतील तर त्याची चौकशी करून संबंधितांवर ही योग्य कारवाई केली जाईल. मात्र कोणत्याही परिस्थितीत माहुल येथे प्रकल्प बाधितांचे स्थलांतरण करण्यात येणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले.
  • मुंबई महानगर पालिकेतील सफाई कामगारांच्या आरोग्यविषयक तसेच त्यांच्या घरासंदर्भात विधानपरिषदेत भाजप आमदार भाई गिरकर यांनी मुद्दा उपस्थित केला होता. याबाबत सभागृहात सविस्तर चर्चा झाली. या चर्चे दरम्यान सफाई कामगारांच्या प्रश्नना बाबत पालिका अधिकाऱ्यांना वेळोवेळी सूचना दिल्या गेल्या असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. पण पालिका अधिकारी जाणीवपूर्वक या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतात असा थेट आरोप उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केला आहे. मुंबई महापालिकेत एकूण २९७०० सफाई कर्मचारी असून त्यापैकी ५५९२ सफाई कामगारांना घरे देण्यात आली आहेत. तर उर्वरित सफाई कामगार आजही बेघर असल्याने त्यांना कधी पर्यंत घरे देण्यात येतील हा मुद्दा यावेळी चर्चेला आला.
  • मंगळवारी महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मुस्लिम समाजाला त्यांच्या मागासलेपणाच्या आधारावर शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये पाच टक्के आरक्षण देण्याची मागणी केली. त्यामुळे आगामी लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असतानाच आता पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा चर्चेला आला आहे. त्यातच महाराष्ट्राच्या सरकारची हिंदुत्ववादी सरकार अशी ओळख आहे. अनेकदा स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील 'हे हिंदूंच सरकार' असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे नसीम खान यांच्या मागणीला हे सरकार न्याय देणार का? अशा चर्चा सध्या सुरू आहेत. अशातच सरकारमधील आमदार बच्चू कडूंनी मात्र या आरक्षणाचे समर्थन करत मुस्लिम समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे असे म्हटले आहे.

हेही वाचा-

  1. Monsoon session 2023 : महापालिका मुख्यालयातील मंत्र्यांच्या कार्यालयावरून विधानसभेत रणकंदन
  2. Maharashtra Monsoon Session 2023: गोपीचंद पडळकर यांना निषेध करणे भोवले! उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी 'ही' सुनावली शिक्षा

Last Updated : Jul 27, 2023, 12:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.