ETV Bharat / state

Monsoon Session 2023: सातव्या दिवशी विरोधक आक्रमक, भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सत्ताधारीविरोधात विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन - विरोधक आक्रमक

विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातील सातव्या दिवशी विरोधक आक्रमक झाले. महायुती सरकारमधील कृषी खात्यातील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून, शेतकरी प्रश्न, टोमॅटो दरावरून विरोधकांनी सरकार विरोधात आज विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले.

monsoon session 2023
पावसाळी अधिवेशन 2023
author img

By

Published : Jul 25, 2023, 2:16 PM IST

पावसाळी अधिवेशनात विरोधक आक्रमक

मुंबई : पावसाळी अधिवेशन चांगलेच वादळी ठरत आहे. विविध प्रश्नांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना चांगलेच घेरत असल्याचे दिसत आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या सातव्या दिवशी कामकाज सुरु होण्यापूर्वी विरोधक चांगलेच आक्रमक झाले. राज्यामध्ये शिंदे फडणवीस सरकारला एक वर्ष होऊन गेले आहे. या काळात कृषी, अन्न आणि औषध खात्यात भ्रष्टाचार झाला, असा आरोप विरोधकांनी केला आहे. त्या पार्श्वभूमीवर कृषी खात्यात भ्रष्टाचार करणाऱ्या मंत्र्याचा धिक्कार करत विरोधकांनी आज सरकारला धारेवर धरले होते.

भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून आज विरोधक आक्रमक : अन्न व औषध प्रशासन विभागामधील घोटाळे, महसूल विभागातील बदली भ्रष्टाचार असे मुद्दे घेऊन विरोधक आज आक्रमक झाले. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गटाच्या आमदारांनी शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्र्यांच्या विभागात त्यांनी भ्रष्टचाराचा आरोप केला. हातात फलक घेऊन, सरकार विरोधात घोषणाबाजी करून त्यांनी सरकारचा निषेध व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे गट आणि काँग्रेस पक्षाचे आमदार आंदोलन करताना पाहायला मिळाले. काँग्रेस जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसकडून रोहित पवार ठाकरे गटाचे सचिन अहिरसह विरोधी पक्षाचे आमदार यावेळी उपस्थित होते.

विरोधकांची जोरदार घोषणाबाजी : 'भ्रष्ट मंत्र्याचे करायचे काय? खाली डोक वर पाय', 'कृषी खात्यात भ्रष्टचार करणाऱ्या मंत्र्यांच्या विरोधात धिक्कार असो', 'अन्न व औषध प्रशासनामध्ये घोटाळे करणाऱ्या मंत्र्यांचा धिक्कार असो', महसूल विभागातील बदल्यांमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या मंत्र्यांचा धिक्कार करत घोषणाबाजी करण्यात आली. त्यासोबत शेतकरी प्रश्नांशी निगडीत घोषणा देखील विरोधकांकडून देण्यात आल्या. विरोधकांनी शेतकरी प्रश्नांशी निगडित वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सरकारचा निषेध केला गेला. कांद्यात कांदे सफेद कांदे, मंत्र्यांचे झालेत वांदे, पीएने केला मोठा झोल मंत्र्यांचे झाले पोल खोल, खोक्यांवर खोके एकदम ओके, अशा प्रकारच्या गोष्टी विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर दिल्याचे पाहायला मिळाले. पोलिसांकडून पंढरपूर येथे वारकऱ्यांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जवरुन देखील विरोधक आक्रमक झाल्याच्या पाहायला मिळाले होते. विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवरती सरकारविरोधात आंदोलन केले होते.

हेही वाचा :

  1. Maharashtra Monsoon Session 2023 : वारकऱ्यांवर लाठीचार्ज केल्याप्रकरणी विरोधक आक्रमक; विधानभवनाच्या पायऱ्यावर सरकारच्या निषेधार्थ वाजवली टाळ
  2. Parliament Monsoon Session 2023 : मणिपूर हिंसाचारावरुन पुन्हा गदारोळ; लोकसभा 2 वाजेपर्यंत तहकूब, राज्यसभेत विरोधक आक्रमक
  3. Monsoon Session 2023 : मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने अधिवेशन कामकाजावर परिणाम? मंत्र्यांची अनुपस्थिती चर्चेत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.